वसंतरावांचे कार्य अभूतपूर्व व चकित करणारे – प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांचे प्रतिपादन

 

कंधार ; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कृषी कोहिनूर वसंतराव नाईक यांनी अकरा वर्ष राज्याची यशस्वी धुरा सांभाळली. ते एक निष्णांत कार्यकर्ते आणि सच्चे समाजसेवक होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कालावधीत जनसामान्यांकरिता अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. या काळात त्यांनी कृषी व सामाजिक क्षेत्रात जे क्रांतिकारी कार्य केले ते अभूतपूर्व व चकित करणारे होते. असे स्पष्ट प्रतिपादन श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी केले.
            माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्यावतीने गोलेगाव पाटी येथे १ जुलै २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग जाधव, विशेष उपस्थिती प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, व्हि.जी. चव्हाण, प्राचार्य डॉ.अशोक गवते,प्राचार्य डॉ.सूर्यकांत जोगदंड प्रा.डॉ.मनोज धर्मापुरीकर,सखाराम राठोड, यादवराव राठोड,परसराम आडे,संजय जाधव,किशन जाधव,रामराव जाधव आदी उपस्थित होते.
     पुढे बोलताना प्रा.पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि डॉ.भाई केशवराव धोंडगे हे विधानसभेतील सहकारी होते.आणि सच्चे मित्र होते. वसंतराव नाईकांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला.डॉ.भाईंनी वाडी तांड्यावर शाळा सुरू करण्याची मागणी केली आणि ती मागणी वसंतराव नाईक यांनी मान्य केली.आणि ५२ वाडी तांड्यावरील शाळा सुरु करण्याची परवानगी दिली.डॉ.भाई धोंडगेनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पहिली जयंती संस्थेच्या वतीने चालू केली आणि ती परंपरा आम्ही कायम ठेवू असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेतील विविध शाखेतील प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *