मला संगीतातील काहीही कळत नाही.. पण काल मढे घाटाकडे जाताना रस्त्याच्या कडेला शेती दिसली.. काही ठिकाणी फक्त दाढ आली होती.. काही ठिकाणी लावणी लावत होते.. काही ठिकाणी लावून झाली होती.. एके ठिकाणी एका बाईच्या डोक्यावर इरलं पाहिलं आणि मी कोकणातल्या आठवणीत गेले.. आमच्याकडे कोकणात लावणी लावताना भलरी गायलं जातं.. खरं तर या कला उपजत असतात आणि परंपरेतुन पण येतात.. अनेकांना तर भलरी , इरलं हे शब्दही माहीत नसतील..
आमच्याकडे कोकणात लग्न मंडपातही बायका गाणी गातात.. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्याचे ते साधन आहे आणि दुसरं म्हणजे लावणी लावताना हिच्या तिच्याबद्दल कुचाळक्या करत बसण्यापेक्षा वर्षातुन एकदा ते शब्द गायिले जातात .. काही वेळा काहीही अर्थ कळत नाही पण कानाला खूपच छान वाटतं.. आजही काही ठिकाणी खेड्यात स्त्रीयांना व्यक्त व्हायला परवानगी नाही त्यामुळे त्यांच्या मनातील भावना त्या अशा पध्दतीने व्यक्त करतात.. इव्हन मला आठवतय स्त्रीच्या अंगात येणं हा प्रकारही असाच आहे.. तिच्या दाबलेल्या भावना ती व्यक्त करते त्यालाच अंगात देवी आली असं म्हटलं जातं.. ती देवी नसते तर मनात साठवलेल्या भावना असतात..
वेल्हे कडुन पुढे जाताना एक वयस्कर जोडपे पाहिले.. शेताच्या बांधावर बसुन भाकरी खात होते.. खातानाचे त्यांचे हावभाव टिपले तेव्हा जाणवलं की , ही एकच वेळ त्यांच्या आयुष्यात असेल ना जिथे ती स्त्री तिच्या नवऱ्याशी मोकळेपणाने बोलु शकत असेल.. ती बोलली असेल की नाही हे माहीत नाही पण अशा अनेक घटना असतात जिथे खेड्यात खुप कमी वेळा नवरा बायकोला एकांत मिळतो नाहीतर मग कुढत राहून त्या भावना ओव्यांच्या रुपात कधी जात्यावर तर कधी उखळावर कान्डताना बाहेर येतात.. सासु , नणंद ,जाऊ अशी नाती एकत्र येउन त्या ओव्या गातात त्यामुळे नातीही मजबूत व्हायला मदत होते…
कांडण , दळण , लावणी लावणे.. दाढ काढणे.. मशागत करणे.. सारवणे.. ही सगळी फक्त कामे नसुन व्यायाम आहेच आणि स्त्रीच्या मनातील व्यथा बाहेर निघण्याचे उत्तम साधनही आहे..
कोकणात खेड्यात पूर्वी स्त्रीया घरी आणि नवरा नोकरीनिमित्ताने मुंबईत असायचा आणि वर्षाने तो घरी यायचा.. अशावेळी स्त्रीला शारीरिक , मानसिक ,स्पर्श या सगळ्याची गरज असायची पण त्या सगळ्या भावना दाबून ती निमूटपणे कधी सासूच्या शिव्या खात संसार करत राहायची..अशावेळी भलरी गीते असतील किवा ओव्या असतील किवा अंगाईगीत असेल अशा सगळ्या कलागुणांना वाव मिळायचा .. कधी रांगोळी काढताना ती गुणगुणायची आणि आता wp .. facebook वर याही स्त्रीया उत्तम कला सादर करताना दिसतात.. हे माध्यम वाईट नाही पण काही जुन्या गोष्टी जसा पत्रव्यवहार असेल किवा तार असेल हे बंद झालय याचं वाईट वाटतं.. भलरी गीतावरुन माझ्या अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि जुने बरेच शब्द आठवत आहेत याचं समाधानही वाटलं.. तुमच्या विभागातल्या काही आठवणी , शब्द जरुर शेअर करा.. पुन्हा बालपणात जाताना खूपच मज्जा येते..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist