(कंधार ; दिगांबर वाघमारे )
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२४ च्या अनुषंगाने तालुका स्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा दिनांक 15/07/2024 रोजी गटसाधन केंद्र, कंधार येथे गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२४ च्या अनुषंगाने शनिवारी केंद्रस्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यातून निवडक स्पर्धकांना दि.१५ जुलै रोजी गटसाधन केंद्र कंधार येथे विषयतज्ञ शिवकुमार कनोजवार यांनी योग्य नियोजन केले होते. त्यानुसार या स्पर्धेसाठी बी.एम. जोशी , पि जी.कारभारी , तुकाराम कल्याणकस्तुरे यांनी परिवेक्षक म्हणून काम केले .
या विज्ञान मेळाण्यात प्रियदर्शनी विद्यालय कंधार येथिल कु स्वरा युवराज शिंदे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकावला तर बारूळ येथिल शिवाजी मा वि येथिल रुपेश रावसाहेब वडजे यांने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच जि प शाळा लाठ (खु .) येथिल प्रिया टिकाराम इंगोले हिने तिसरा क्रमांक पटकावला . या यशस्वी विद्यार्थांना गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी शुभेच्छा दिल्या. या यशस्वी विद्यार्थांची नांदेड येथे स्पर्धा होणार असल्याची माहिती यावेळी विषयतज्ञ शिवकुमार कनोजवार यांनी दिली.विषयतज्ञ ओमप्रकाश येरमे यांनी तालुकास्तरीय विज्ञान मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .