माता वैष्णवी देवीला पायी जायचं म्हणुन पहाटे ५ च्या दरम्यान यात्रेकरू तयार होऊन हॉटेल बाहेर माझी वाट पहात होते.अनेकानी आधीच दर्शनासाठी आरएफआरडी कार्ड काढले होते. दरवर्षीप्रमाणे आम्ही ऑनलाईन यात्रा परची नांदेडलाच काढली होती पण तिला कोणी विचारले नाही. त्यामुळे वाचकांनी यापुढे ऑनलाइन यात्रा परची काढण्याची आवश्यकता नाही.आरएफआरडी कार्ड काढण्यासाठी स्वतः चे आधार घेवून बस स्टँड जवळील सेंटर जावे लागते. बस स्टॅन्ड ते बाणगंगा हा प्रवास ऑटोतून केला. बाणगंगाच्या पुढे कोणतेही वाहने जात नाही. ज्यांना डोली अथवा घोडे करायचे होते त्यांना ते ठरवून दिले. नियमापेक्षा जास्त पैसे मागणाऱ्यांना हो म्हणा पण आल्यानंतर त्यांना देवस्थान ने ठरविल्या दराप्रमाणे पैसे द्या आणि तो ऐकत नसेल तर त्याची कंप्लेंन मिलिटरी वाल्यांकडे करा अशा सूचना मराठीतून सर्वांना दिल्या. अंगात अमरनाथ यात्री संघाचा टी-शर्ट, डोक्यावर टोपी, कपाळावर जय मातादी ची चुनरी पट्टी, हातात काठी घेऊन आमची पदयात्रा सुरू झाली. थोड्याच वेळात ढोल वाला आमच्यात सामील झाला.माझ्या सह योगेश पटेल,शाम हुरणे, सुभाष देवकते,मुकेश पटेल,अक्षय हूरणे, प्रिया त्रिमुखे, नवनाथ सोनवणे, रेणुका व माधवराव उल्लेवाड, सचिन उल्लेवाड, स्वाती व प्रदीप माळेगावे, डॉ. शिवाजी डिग्रसे, सुजाता मुखडे, श्रीकांत मुखेडकर, सिंधू व बालाजी इंगोले, अर्चना व उमाकांत कदम, मृदुला व बलभीम पत्की, अरुणा व प्रफुल्ल नागरगोजे,महादेवी व आनंद साताळे,, रेखा भताने, सारिका केंद्रे, जयमाला लटपटे,संगीता व डॉ.नारायण भुस्से यांनी ढोल च्या गजरात नाचत गात, जय मातादी चा जयकारा करत पायी येणे जाणे केले. चालताना योगेश पटेल यांनी तर अशी कमाल केली की, एकापेक्षा एक सरस भजने म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तीन ते सव्वा तीन तासात आम्ही भवन ला पोहोचलो. मोबाईल, बॅगा, कंगवा, बोट, गोळ्या, चामड्याच्या वस्तू आत मध्ये नेता येत नसल्यामुळे लॉकरमध्ये ठेवल्या. दर्शन रांगेत सर्वजण थांबलो.गुहेत सरस्वती, वैष्णवी व महाकाली यांचे दर्शन पिंडी रुपात घ्यावे लागते. दर्शन घेताना मी एक हुषारी केली. आमच्या सोबत असणाऱ्या सर्वांना एका रांगेत उभे केले. पिंडी समोर दिसल्या की, मी बाजूला सरकलो आणि सर्वांना पुढे जाण्याचा इशारा केला. जवळपास चार ते पाच मिनिटे मला मनसोक्त दर्शन घेता आले.
मी आतापर्यंत २६ वेळा वैष्णोदेवीचे व भैरव चे दर्शन पायी घेलेलेले आहे. पण पहिल्यांदाच मी वैष्णवी देवी भवन ते भैरव हा प्रवास केबल कार (गंडोला)ने केला.योगेश पटेल,सुभाष देवकते, रेखा भताने, सारिका केंद्रे, जयमाला लटपटे यांनी तर अनवाणी दर्शन घेतले. जाताना पायी त्यानंतर रोपवे व येताना घोड्याचा वापर करणाऱ्यांमध्ये प्रणिता व कुमार कुलकर्णी, वेणूताई व गणपतसिंह ठाकूर, माधुरी व सूर्यकांत सुवर्णकार यांचा समावेश आहे. सुरेश त्रिमुखे यांनी डोली, बॅटरी कार व रोपवेने अंतर पूर्ण केले. नारायण गवळी व आशुतोष मुखाडे यांची रात्री प्रकृती ठीक नव्हती.त्यामुळे मी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण मी पायी निघाल्यानंतर त्यांनी गुपचूप डोली करून दर्शन घेतलेच. वर्षा व डॉ. अरुण हिवरेकर, जयश्री व मधुकर पाष्टे, रेखा सोनवणे, ज्योती वाघमारे,वैशाली व डॉ.द्वारकादास नखाते यांनी डोली,रोपवे चा वापर जाताना केला पण येताना मात्र पायी येणे पसंत केले.संगीता व प्रदीप दांडेगावकर, उर्मिला व अनंत कवठेकर, अपर्णा व कल्याण शिर्शीकर , माया डीग्रसे, डॉ.स्नेहराणी व डॉ.महेश बिरादार यांनी घोडा व रोपवे च्या मदतीने १४ किलोमीटर आंतर पूर्ण केले. डोली व रोपवेद्वारे येणे जाणे करणारे वैशाली व डॉ. द्वारकादास नखाते, वंदना व केदार मालपाणी या दोन जोडप्यांचा समावेश आहे. अंजली कुलकर्णी, सुरेखा रहाटीकर, श्रीहरी व अपर्णा कुलकर्णी यांनी मात्र बॅटरी कार ,रोपवे, घोडे, पालखी व पायी अशा प्रकारे सर्व साधनाचा वापर केला.भैरव सह सर्व प्रवास पायी केल्यामुळे कैलाश घागरदरे यांनी ठेवलेले एक हजार रुपयाचे पहिले बक्षीस गोपी स्वामी यांनी तर रेखा भताने यांनी ५०० ₹ चे दुसरे बक्षिस पटकावले.
यावेळी चालताना थोडा थकलो असल्यामुळे परतीचा प्रवास घोड्यावर करावा असा विचार होता. पण सर्वांनीच धरला की, भाऊ कसे करून पायी खाली चला. मी एवढेच म्हटले की, माझ्यासोबत जे जे पायी येणार असतील, त्यांनी रस्त्यात पडलेले बिस्किटाची कव्हर, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा जमा करून डस्टबिन मध्ये टाकत असाल तरच येतो. सर्वांनी या माझ्या विनंतीचा मान ठेवून उतरताना तंतोतंत अंमल केला. सहज बोलता बोलता विषय निघाला तंबाखू खाण्याचा. प्रफुल्ल नागरगोजे आणि बलभीम पत्की यांच्या धर्मपत्नींनी कितीतरी वेळा प्रयत्न करून देखील नवऱ्याची तंबाखू सुटत नव्हती. मी या दोघांना उभे करून प्रतिज्ञा घ्यायला लावली की, यापुढे कधीच तंबाखू खाणार नाही. ही मात्रा बरोबर लागू पडली. नागरगोजे यांच्या धर्मपत्नी अरुणा यांनी हात जोडत माझे आभार मानले.आमच्या सोबत असणाऱ्या एका यात्रेकरूने गुपचूप मला पाच हजार रुपये दिले व सांगितले की, तुम्हाला जिथे खर्च करायचे असेल तिथे हे खर्च करा, पण माझे नाव काही जाहीर करू नका. त्या पैशातून ढोल वाल्याचा, चहा फराळाचा व जेवणाचा खर्च भागविला. संध्याकाळी सहा वाजता खाली उतरलो. ऑटो ने हॉटेलला पोहोचल्यानंतर मसाज वाल्याला बोलून मस्तपैकी तेल मालिश केली. त्यानंतर गरम पाण्याने मनसोक्त आंघोळ केली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था दरवर्षी प्रमाणे रेखा व नवनाथ सोनवणे उदगीरकर यांच्यातर्फे करण्यात आली होती करण्यात आली होती. प्रशस्त बेडरूम मध्ये आल्यानंतर गाढ झोप कधी लागली हे कोणालाही कळाले नाही.
*(क्रमशः)*