प्रतिनिधी ; कंधार
——————-
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि.२० जुलै रोजी सकाळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या वसंत नगर स्मेरा निवास नांदेड येथून ही भव्य रॅली सकाळी सहा वाजता निघणार असून पाचलेगावकर महाराज आश्रम येथे भेट व दर्शन , ढवळे कॉर्नर, मारतळा, शिराढोण, उस्माननगर, भोपाळवाडी, पानभोसी, धावरी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे लोहा येथे अभिवादन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन, लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट व बेरळी फाटा बायपास मार्गे कंधारकडे प्रयाण,
कंधार येथे महाराणा प्रताप सिंह महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यास अभिवादन, हाजी सय्याह दर्गा येथे अभिवादन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ह.भ.प. शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तन स्थळी भवानीनगर येथे सकाळी 11 वाजता आशाताई यांचे आगमन होणारा असून कीर्तन कार्यक्रम समारोपानंतर स्मेरा निवास वसंत नगर नांदेड येथे सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे ,
आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा कंधार मतदारसंघात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णांना फळे वाटप, वृक्षारोपण ,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर सह विविध सामाजिक कार्यक्रमाचे मतदारसंघातील शेकापच्या कार्यकर्त्यांकडून स्वयंस्फुर्तीने व उत्स्फूर्तपणे सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत , दिनांक 20 जुलै शनिवारी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत बालाजी मंदिर, भवानीनगर, कंधार येथे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार तथा ह.भ.प.शिवलीलाताई पाटील यांचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शेकापचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत पाटील शिंदे,सौ.अनुजाताई विक्रांत पाटील शिंदे प्रमुख उपस्थित राहणार असून या कीर्तन कार्यक्रमास मतदारसंघातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून किर्तन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शेकापचे जिल्हाध्यक्ष बालाजी इसादकर, शेकापचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे हरबळकर ,
शेकापचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरुभाई, माजी जि.प.सदस्य तथा लोहा संगायो समितीचे अध्यक्ष चंद्रसेन पाटील, कंधार समन्वय समितीचे अध्यक्ष बाबुराव किडे, कंधार कृउबा समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चोंडे, पारडीचे माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे, बोरगाव चे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर , गिरीश मामडे, सद्दाम शेख शेकापचे लोहा तालुकाध्यक्ष नागेश हिलाल, शेकापचे कंधार तालुकाध्यक्ष अवधूत पेठकर,
शेकापचे शहराध्यक्ष महेश पिनाटे, आदींसह लोहा कंधार मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.