दि-१२ऑगस्ट २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून वेदधारिणी विद्यालय पिंपळगांव ता.जि. यवतमाळ येथे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालया यवतमाळ द्वारा ” प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा ” घेऊन शालेय विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे धडे देण्यात आले.
जगातील तरुणाचे आकर्षण असलेल्या स्काऊट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.
या प्रशिक्षणास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक निरज डफळे उपस्थित होते.जिल्हा संघटक(स्काऊट) गजानन गायकवाड आणि जिल्हा संघटक(गाईड) मनिषा तराळे यांनी प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळेस मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात प्रथमोपचार म्हणजे काय?प्रथमोपचाराचे सुवर्ण नियम , प्रथमोपचार पेटीतील साहित्य,प्रथमोपचार करणाऱ्याचे गुण, प्रथमोपचार करतांना उपयुक्त गाठी, विविध बॅडेज प्रकार व त्याचे प्रात्यक्षिके , रुग्णवाहून नेण्याचे विविध पद्धती ,स्ट्रेचर प्रकार व घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहिती देऊन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. तर ज्येष्ठ स्काऊटर नागोराव काकपूरे यांनी स्कार्फची गुंडाळी करून परिधान करण्याचे सादरीकरण केले. शाळेतील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने प्रशिक्षणात सहभाग घेतला.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेकरिता स्काऊटमास्टर निशांत सिडाम, कनिष्ठ लिपिक विद्यानंद कोमलवार आणि शाळेतील स्टाफने परिश्रम घेतले.