गुणवत्ता वाढीसाठी अहोरात्र झटणारा प्रतिभावंत ,उपक्रमशील ध्येयवेडा शिक्षक; बालाजी पाटील भांगे

 

लोहा जिल्हा परिषद हायस्कूल येथे कार्यरत असलेले व सर्व विद्यार्थ्यांत सदैव रमणारा… शाळा आपले घर समजून गुणवत्ता वाढीसाठी अहोरात्र झटणारा विद्यार्थी प्रिय प्रतिभावंत उपक्रमशील ध्येयवेडा शिक्षक म्हणून ज्यांची लोहा तालुका भर ओळख असलेले सहशिक्षक बालाजी जिजाबाई श्रीपतराव पाटील भांगे यांचा जन्म 3 जुलै 1966 रोजी एका शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात बेळसांगवी तालुका जळकोट जिल्हा लातूर येथे झाला, आई श्रीमती जिजाबाई व वडील श्रीपतराव पाटील यांच्या संस्कारातून बालाजी पाटील भांगे यांनी आपले प्राथमिक शिक्षण बेळसांगवी येथे पूर्ण करून माध्यमिक शिक्षण वाढवणा बुद्रुक तालुका उदगीर येथे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत ए ग्रेड श्रेणी घेऊन उत्तीर्ण केले,

घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाच्या काळात सहशिक्षक बालाजी पाटील भांगे यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मात करून उच्च माध्यमिक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून मुखेड तालुका जिल्हा नांदेड येथे डीएड यशस्वीरित्या पूर्ण केले. डीएड पूर्ण झाल्यानंतर भांगे सरांची प्रथम नियुक्ती शिक्षक म्हणून किनी तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे सहशिक्षक म्हणून प्रथम नेमणूक झाली, भांगे सरांचे वडील श्रीपतराव पाटील व आई श्रीमती जिजाबाई यांचा स्वभाव बेळसांगवी गावांमध्ये सर्वपरिचित असून भांगे सरांचे आई-वडिलांनी बेळसांगवी येथे सर्व धर्म समभाव सर्व जातीपातीच्या लोकांना सोबत घेऊन सामोपचाराने वागणूक दिली व व गावात सामाजिक सलोखा कायम टिकून ठेवला, बेळसांगवी गावातील अनेक अडीअडचणी भांगे सरांचे वडील श्रीपतराव पाटील मिटवत असत, आजही श्रीपतराव पाटलांना बेळसागवी गावात मोठा मानसन्मान आहे, ग्रामीण भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्द, चिकाटी व प्रखर मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर भांगे सरांनी बीए ग्रॅज्युएशन प्रथम श्रेणीत पूर्ण केले,.

जिल्हा परिषदेचे शिक्षक पदाची नियुक्ती स्वीकारात भांगे सरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी अध्यापन कार्य सुरू केले, मागील दीर्घ वर्षापासून अखंडित अध्यापन कार्य करताना शिक्षक सेनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी भांगे सरांचे सर्वानुमते निवड करण्यात आली, सहकारी शिक्षकांच्या विविध अडीअडचणी व समस्या, विविध शैक्षणिक प्रश्नावर भांगे सरांनी सातत्याने शिक्षक सेनेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर बुलंद आवाज उठून अनेक आंदोलने करून सहकारी शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली, जिल्हा परिषद हायस्कूल किनी तालुका भोकर येथे सेवेत असताना सामाजिक, धार्मिक, कार्यासह ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, साक्षरता अभियान, राष्ट्रीय जनगणना, बी. एल. ओ. रक्तदान शिबिरामध्ये स्वयंपुरतीने सहभाग घेतला, सन 2011= 12 या वर्षात भांगे सरांना पंचायत समिती भोकर वतीने गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

किनी येथे अनेक निरक्षकाना साक्षर करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे,दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री. क्षेत्र खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त कला महोत्सवांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल लोहा पंचायत समितीच्या लोहा च्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले. भांगे सरांनी वनराई बंधारे, सांस्कृतिक कार्यक्रम, कुटुंब नियोजन, विविध धार्मिक सण उत्सव, महापुरुषांच्या जयंती, गणेश उत्सव, सामाजिक सलोखा ,यामध्ये हिरारीने भांगे सरांनी सहभाग नोंदवला ,वृक्षमित्र फाउंडेशन नांदेडच्या वतीने भांगे सरांना शिक्षण क्षेत्रासोबतच वृक्ष लागवड व संगोपन हे सामाजिक कार्य केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वनराई बंधारे उभारण्यासाठी भांगे सरांनी अहोरात्र मेहनत घेतली व निसर्गाचे संवर्धन केले हे विशेष.. देवठाणा तालुका भोकर येथे विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी श्रमदानातून भांगे सर व सर्व सहकाऱ्यांनी वनराई बंधारा बांधून तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला या अलौकिक कार्याबद्दल तत्कालीन उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी या वनराई बंधाऱ्याचे भूमिपूजन करून या बंधाऱ्याचे शिल्पकार बालाजी पाटील भांगे यांचा येथोचित सत्कार केला, जिल्हा परिषद हायस्कूल किनी तालुका भोकर येथून सन 2009= 10 ला देवठाणा तालुका भोकर येथे उपक्रमशील शिक्षक भांगे सरांची बदली झाली असता किनी येथील गावकऱ्यांनी भांगे सरांची बदली रद्द करण्यासाठी सलग 10 दिवस किनी जिल्हा परिषद ला टाळे ठोकले असतां शेवटी नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षण अधिकारी यांनी भांगे सरांना परत किनी गावात नियुक्ती देउन किनी गावकऱ्यांची समजूत काढुन किनी जि.प.शाळा सुरू करण्यात आली,असा ध्येयवडा, प्रतिभावंत, विद्यार्थी प्रिय शिक्षकाने अनेकांचे समाजमन जिंकले, भांगे सर जिल्हा परिषद हायस्कूल लोहा तालुका लोहा येथे बालाजी पाटील भांगे यांची बदली 29 मे 2018 ला बदली झाली,

लोहा येथे सहा वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक कारकिर्दीत बालाजी पाटील भांगे यांनी लोहा जिल्हा परिषद हायस्कूला गत वैभव मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. विद्यार्थ्या प्रती प्रचंड आत्मीयता व प्रेम असलेला देव माणूस म्हणून भांगे सरांची ओळख सर्व विद्यार्थ्यां व पालक व नागरिकांमध्ये आहे, शाळेत वेळेच्या अगोदर उपस्थित राहून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान दान करून सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांचे हित व्हावे ही प्रामाणिक अपेक्षा भांगे सरांचे असायची, जिल्हा परिषद हायस्कूलच्या बाजूला असलेल्या निवासी वस्तीगृहातील अनाथ विद्यार्थ्यांना दवाखाना, शालेय साहित्य, कपडे, वेळोवेळी आर्थिक मदत करून गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना बळ देणारे व अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणारे व त्यांना शैक्षणिक कामांमध्ये प्रोत्साहन देऊन वेळोवेळी सहकार्य करणारे सर्व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणून सर्व विद्यार्थ्यांमध्ये भांगे सरां बद्दल प्रचंड आत्मियता व प्रेम आहे,

 

भांगे सरांनी आज पर्यंत किनी तालुका भोकर, देवठाणा तालुका भोकर, दहिलीतांडा तालुका किनवट व सध्या जिल्हा परिषद हायस्कूल लोहा येथे शिक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी हजारो चिमुकल्यांना ज्ञान संस्काराचे धडे दिले, त्यांच्या प्रामाणिक व सुस्कृत संस्काराच्या जोरावर भांगे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक ,ग्रामसेवक, तलाठी ,पोलीस अधिकारी सह विविध शासकीय पदावर विराजमान आहेत ,भांगे सरांच्या अंगी प्रेमळ भावना ,विद्यार्थ्यांच्या प्रती प्रेम, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, परोपकाराची वृत्ती, संघटन कौशल्य, आपल्या शाळेविषयी व आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक भावना जपणारा दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून भांगे सरांकडे पाहिले जाते. शिक्षक सेनेच्या उपजिल्हा अध्यक्ष पदावर भांगे सरांची सर्व शिक्षकांच्या आग्रहाखातर निवड झाल्यानंतर अशैक्षणिक कामे, वेळेवर वेतन, वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शिक्षकांना होणारा त्रास, वरिष्ठ अधिकाऱ्यांची अरेरावी, सहकारी कर्मचाऱ्यांचे असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी भांगे सरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी धारेवर धरले ,सर्व विद्यार्थ्यांच्या वडिलांना विद्यार्थ्यांची प्रगती दाखवण्यासाठी भांगे सरांनी पालक मेळावा वेळोवेळी घेतला,

सन 2012= 13 या शैक्षणिक वर्षांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते भांगे सरांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, भांगे सरांनी वडिलांच्या स्मरणार्थ आईची पुस्तक तुला करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले अशा प्रतिभावंत उपक्रमशील ध्येयवेडा शिक्षक बालाजी पाटील भांगे सर हे प्रदिर्घ सेवेनंतर दिनांक 31 जुलै 2024 रोजी सेवानिवृत्त झालेले असून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दिनांक 24 ऑगस्ट रोजी लोहा येथील तुळजाई मंगल कार्यालयात संपन्न होत आहेत, त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार तथा लातूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई शामसुंदर शिंदे, शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथ दादा पवार, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पाटील शिंदे, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करणवाल, व सर्व राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री. बालाजी पाटील भांगे सर यांचा सेवापूर्ती प्र गौरव सोहळा संपन्न होणार आहे,

विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री बालाजी पाटील भांगे यांना सेवापुर्तींच्या हार्दिक शुभेच्छा सह सेवापूर्ती नंतर भांगे सरांना उत्तम निरोगी दीर्घायुष्यासह सुख समाधान धनसंपत्ती व निरोगी आयुष्य लाभो हीच प्रार्थना व बालाजी पाटील भांगे सर तुमच्या हातून असेच प्रामाणिक शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्य घडो हीच आई तुळजाभवानी भवानी चरणी प्रार्थना….!!!

*अशोक सोनकांबळे*

*पत्रकार तथा लोहा तालुका* *संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *