१६ सप्टेंबरआंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिवस

आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिवस..


      संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार १९९५सालापासून १६ सप्टेंबर हा”आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण” दिवस म्हणून पाळला जातो.क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूला छिद्र पडत आहेत.आपण वेळीच सावधान होउन पृथ्वीला यापासून वाचवायला हवे.कारण,या प्रदूषणामूळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर येत आहेत.आपल्या काही चूकामूळे या ओझोन थराचा -हास होत आहे.सध्याच्या स्थितीमध्ये ओझोनचा थर हळूहळू पूर्ववत होत आहे.आपल्या मानवी शरीराला व पृथ्वीला धोकादायक असणा-या अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव करण्यासाठी ओझोन थराची महत्वपूर्ण भूमिका असते.१९३०मध्ये भौतिक शास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.         

 ओझोन थराचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.त्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावायला हवा.त्यासाठी ऊर्जैचा जपून उपयोग करणे,मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड करुन पृथ्वीचे हरित कवच आपल्याला आबाधीत राखता येईल.वातावरणातील कार्बन

मोनाॅक्साइड,मिथेन,सल्फरडायआॅक्साइड,नायट्रस आॅक्साइड यांसारख्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वीचा जीवनरक्षक ओझोन वायूला धोका निर्माण झाला आहे.पृथ्वीच्या वातावरणात १५ते४०किलोमीटर अंतरावर ओझोन वायूचा थर असतो.उत्तर धुव्रावर ओझोन वायूचा थर विरळ झाला आहे.त्याला कारणीभूत मानवप्राणीच आहे.फ्रीज,एसी,विमानातील एअर ज्वेल,कीटकनाशक फवारणी यातून बाहेर पडणारा क्लोरोफ्लोरो कार्बन हा वायू ओझोनचा थर विरळ करण्यास कारणीभूत आहे.   

   ओझोनच्या थरात घट होणे ही पृथ्वीला हानीकारक गोष्ट आहे.जर ही स्थिती अशीच राहिली तर भविष्यकाळात अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे वनस्पती व प्राणीमात्रांवर त्याचा विपरीत परिणाम होइल.तसेच अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढेल.तसेच अल्ट्राव्हायोलेट किरणे शोषले गेल्याने उष्णता निर्माण होण्याची क्रिया मंदावेल.त्यामूळे वातावरण थराच्या तापमानात घट होउन त्याचा परिणाम वातावरणातील वा-याच्या दिशा आणि गतीवर होइल,त्यामूळे त्सुनामी सारखी संकटे वाढतील.आणि एक दिवस या जीवीत सृष्टीचा विनाश होईल.त्यामूळे सर्वांनी सावध होउन वेळीच ओझोन थराचे संरक्षण करण्याचा संकल्प करुन पृथ्विला वाचवू या.

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh


रुपाली वागरे/वैद्यनांदेड

९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *