वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश – भाग पंधरावा

एकदा जंगलात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायावर आधारीत लोकशाही स्थापन करण्यासाठी सर्व प्राण्यांची सभा भरली. लोकशाहीचे गुणगान गणारी अनेक भाषण झाली. सिंहोबांनी जंगलात लोकशाही स्थापित झाल्याची घोषणा केली. त्यानिमित्ताने सर्वांना भोजनाची व्यवस्था केली होती. सिंहोबांनी आदेश दिला, ” ससोबा वाढप्याच काम तुम्ही करा.लोकशाहीप्रमाणे सर्वांना भोजन वाढा “
लोकशाहीनुसार ससोबानी सर्वांच्या ताटात सामान भोजन वाढले.
सिंहोबांनी कोल्होबाच्या ताटाकडे पहिले नंतर आपल्या ताटाकडे पहिले आणि एकदम ओरडले, “*अशी लोकशाही असते का? हा ससा लोकशाहीत लोकशाहीत नको,याला जंगलाच्या बाहेर काढा आणि कोल्होबा तुम्ही वाढा.*
कोल्होबा पुढे सरसावले आणि भोजन वाढायला सुरुवात केली. पहिलं ताट सिंहोबाचे, कोल्होबानी अर्धा भाग तर सिंहाच्या ताटात वाढला आणि बाकी सर्वांना तोंड बघून वाटप केलं. सिंहोबा म्हणाले,” *याला म्हणतात लोकशाही*
बिचारा ससा बाहेर पडला.
कोल्होबा म्हणतात कसे? “*बघा किती घमेंडी, हेकेखोर आहे हा ससा. महाराजांनी बोललं तर काय झालं?असं तडक निघून जातात का?एखादी पोळी त्याला देणार होतो.*
संध्याकाळी पत्रकार परिषद भरली.. पत्रकारांनी विचारलं. ससोबा का बाहेर पडले?
कोल्होबानी बोलायला सुरुवात केली आम्ही ससोबांना एक पोळी देणार होतो, सॉरी दोन पोळ्या देणार होतो.(बाजूला बसलेल्या वाघोबानी कोपराने खुणावताच कोल्होबा म्हणाले ) पाच पोळ्या देणार होतो (आता सिंहाबानी कोपर मारताच कोल्होबा म्हणाले ) सात पोळ्या देणार होतो…. पत्रकारांनी विचारलं तुम्ही एकदा म्हणाले एक पोळी देणार, नंतर म्हणाले दोन पोळ्या देणार, आता म्हणाले सात पोळ्या देणार होतो. कोल्होबा म्हणाले मी असं काही बोललोच नाही तुम्ही तुमचे कान चांगल्या डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. माझी उभी हयात गेली पत्रकार परिषद घेण्यात. उगीचच काहीतरी बोलायचं का? चूप!
आम्ही त्यांना सात पोळ्या देणार होतो हे फायनल होतं पण त्यांना हे पटलं नाही, बरोबरीचा हिस्सा मागत होते.
दुसऱ्या दिवशी सर्व प्रिंट मीडिया, सोशल मीडियावर बातम्या झळकल्या… *हेकेखोर पणा नडला, ससोबा लोकशाही च्या बाहेर*………

काल ही अशीच एक पत्रकार परिषद पार पडली एक नेता म्हणत होता धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊनये म्हणून आम्ही खूप कोशिश केली पण आंबेडकर साहेबांनी ऐकलं नाही आम्ही त्यांना सात जागा देणार होतो
पण ते ऐकले नाहीत. म्हणून वंचित राहिले. उगीचच ओरड केली… म्हणे आघाडीची बैठक चालू असताना आम्ही त्यांना बाहेर बसवलं…..
आत शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नानासाहेब पटोले यांची मिटिंग चालू होती. आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे होते की काय?….*म्हणजे आपणास अजूनही वंचित, भटके आपल्या मांडीला मांडी लावून बसलेले चालत नाही त्यांचा विंटाळ होतो. त्यांची मते चालतात पण मांडीला मांडी लावून बसलेले चालत नाही*
खरा आंबेडकरवादी रामदास आठवले आहेत असं म्हटलं तर?……

या लबाडाच्या उलट्या बोंबा. एक म्हणतो सर्वांना बोलवायला आम्ही काय सत्यनारायणाची पूजा घातलेली आहे की काय? एकजन म्हणतो, आंबेडकरांचा बालेकिल्ला आंबेडकर वाद्याकडूनच उध्वस्त करतो.एकजन म्हणतो जोपर्यंत वंचित संपत नाही तोपर्यंत काँग्रेसला चांगले दिवस येणार नाहीत…….
वंचितांच्या विरोधात एवढ्या साऱ्या गोष्टी उघड उघड बोलल्या जात आहेत. वंचितांना संपविण्याची भाषा बोलली जात असूनही आमच्या रिटायर्ड गँगला आघाडीचाच पुळका येतोय. आपल्याच नेत्याच्या विरोधात आमचा वापर केला जातोय हे षडयंत्र या बुद्धिजीविंना कसे लक्षात येत नसेल? प्रादेशिक पक्ष संपविण्याचे कटकारस्थान केल्या जात आहे. आता विधानसभेची निवडणूक जाहीर होताच अजूनही काही षडयंत्र केले जाईल. म्हणतील लोकसभा निवडणूकीत आम्ही यांना बारा जागा देणार होतो. पण ते ऐकले नाहीत… तेव्हा संविधान धोक्यात होतं आता आरक्षण धोक्यात आहे असा कांगावा करतील आणि कर्नाटकतेलंगणात आरक्षणाचे वर्गीकरण करतील…. वर सारी सेटलमेंट झालेली आहे. आम्ही तुमच्या सरकारला सपोर्ट करतो तुम्ही आमच्या चौकशा बंद करा. सरकार तुम्हीच चालवा. फक्त आमच्या महत्वाच्या जागा निवडून आणा….. त्याप्रमाणे आता विधानसभेलाही काट्याची टक्कर दाखवली जाईल. काही इकडचे दिग्गज पाडले जातील तर काही तिकडचे दिग्गज पाडले जातील.

वंचितांच्या मताची पळवा पळवी करून आम्हीच जिंकलो म्हणतील. कमी जास्तीला आपल्यातीलच काही बिभीषण हाताशी धरले जातील मेनाच्या पुतळ्यात प्राण फुंकला जाईल. मग हे पुतळे गवोगावं फिरविले जातील रक्ताच्या वारसाचे काय घेऊन बसलात? विचाराच्या वारसदारा सोबत चला म्हटले जाईल. निवडणूक झाली की मेनाचे पुतळे अडगळीस फेकले जातील काही वितळून जातील जेव्हा खैरलांजी सारखा जातीय अत्याचार होईल तेव्हा सारे एक होऊन अपराध्याची पाठराखण करतील मग आमची रिटायर्ड गँग कविता करत बसेल….. आरक्षणाच्या लाभार्थ्यांनी आता विचार केला पाहिजे. आपली झोपडी शाबूत ठेवायची की शत्रूपक्षांस सामील होऊन आपल्याच हाताने झोपडीची राख रांगोळी करायची

गणपत गायकवाड नांदेड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *