मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  भारतीय संस्कृती ही जगातील एक महत्वपूर्ण संस्कृती म्हणून ओळखली जाते. मराठवाडा मुक्ती लढा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण लढा म्हणून ओळखला जातो . भारत देशाला प्राचीन काळापासूनचा इतिहास निर्माण झालेला आहे. आपल्या भारत देशावर ब्रिटिशांनी राज्य निर्माण केलं होतं आणि भारताचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणा मध्ये ब्रिटिशांनी केलेले होते. ब्रिटिशांनी भारतावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केलेला होता .ब्रिटिश भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले ब्रिटिशांनी आपणाला भयानक अशा स्वरूपाचा त्रास दिलेला होता .या छळाला आपली भारतीय जनता कंटाळून गेली होती. अशावेळी अनेक समाजसुधारक ,आंदोलक क्रांतिकारक हे पुढे आले. आणि ब्रिटिशांची कट कारस्थाने उधळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या क्रांतिकारकांनी आपल्या भारतीय देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाला जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी महाराष्ट्रातील आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेले नव्हते .म्हणून भारतातील महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचे घटक राज्य आहे .महाराष्ट्रात मराठवाडा हे प्रादेशिक नाव असून या प्रदेशात हैदराबादचा निजाम याने आपल्या राजवटीमध्ये विविध भाषा बोलणाऱ्या लोकांचा व प्रदेश म्हणून ओळखला जायचा बोलीभाषे वरून प्रत्येक प्रदेशाची ओळख होती .मराठी भाषा बोलणारे या प्रदेशाला मराठवाडा या नावाने ओळखले जायचे मराठवाडा प्रदेश निजामाच्या राजवटीखाली होता .जरी आपल्या भारत या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले असले तरी आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. म्हणून निजाम -उल- मुल्क यांनी मोगल बादशहाच्या दुर्बलतेचा फायदा घेवून दक्षिण भारतातील हैदराबाद या ठिकाणी स्वतंत्र राज्याची स्थापना 1724 मध्ये केली निजाम उल मुल्क यांच्या वंशजानी जवळपास 224 वर्षे सत्ता उपभोगण्याचे कार्य केले होते .आणि निजामाचं राज्य मराठवाडा, तेलंगणा ,आणि कर्नाटक या प्रदेशावर होते. पहिला निजाम निजाम उल मुल्क होता. आणि शेवटचा निजाम मिर उस्मान अली हा होता निजाम सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले होते .मराठवाडा ,तेलंगणा कर्नाटकच्या प्रदेशातील जनतेवर छळ मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचे कार्य केले होते .जनता या छळाला कंटाळलेली होती. निजामाची विचारसरणी सरमजामशाही व हुकूमशाही स्वरूपाची होती निजामाला जनते बद्दल अजिबात प्रेम नव्हते राजकीय दडपणाखाली असलेला समाज जागृत होण्यासाठी विसावे शतक उजाडावे लागले आणि राजकीय जागृती घडून आली समाज संघटित होऊन एकत्र आला निजामाच्या विरोधात सर्व समाज पेटून उठला होता निजामाने हिंदू प्रजेवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला होता .आणि संस्थांना मध्ये रजाकार देखील मोठ्या प्रमाणात आणण्याचा कट करत होता आपल्या भारत देशाचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी अत्यंत संयमाने व मुसद्दीपणाने ५६५ संस्थांनापैकी बऱ्याच संस्थानाचे 1947 पूर्वी विलीनीकरण करून घेतले होते. परंतु सातवा निजाम मिर उस्मान अली खान हा स्वतंत्र भारतामध्ये विलीन होण्यास तयार नव्हता हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांची ओळख होती. स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली 1938 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी अत्यंत संयमाने लढा दिला .अनेक वेळा तुरुंगवास भोगला होता जवळपास 50 हजार लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याचे कार्य केले होते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ ,गोविंद भाई बाबासाहेब परांजपे ,दिगंबरराव बिंदू ,अ.कृ.वाघमारे, आनंद भालेराव यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले त्याचप्रमाणे विद्यार्थी आंदोलन हैदराबाद संस्थाना मध्ये घडून आले होते.

परिस्थिती बिकट होत चाललेली होती म्हणून छत्रपती संभाजी नगर येथील कॉलेजमधील राष्ट्रभक्त तरुणांची संख्या जास्त प्रमाणात वाढत होती. अनेक विद्यार्थ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे वंदे मातरम अशा स्वरूपाचे नारे दिले आपल्या हातातला झेंडा पडू दिलेला नाही मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले .म्हणून नांदेड जिल्ह्यातील भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब, यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हातात झेंडा घेवून हातात झेंडा वंदे मातरम चा नारा दिला म्हणून हैदराबाद मुक्त लढ्याची सुरुवात विद्यार्थी आंदोलनापासून झाली. आणि ७ नोव्हेंबर 1947 मध्ये भारत सरकारने जैसे थे करार केला पण निजाम पाकिस्तान मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु आपल्या सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामा विरुद्ध पोलीस कारवाई केली. आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला .निजामाच्या तावडीतून हैदराबाद संस्थान मुक्त झाले .आणि हैदराबाद संस्थानांतर्गत मराठवाडा, तेलंगणा ,कर्नाटक प्रदेश आपल्या भारतात विलीन झाले. मराठवाड्यातील शूरवीरांनी हा लढा यशस्वी करण्याचे कार्य केले त्यामुळे आपणाला 17 सप्टेंबर 1948 रोजी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील मराठवाडा या प्रांताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कल्हाळी या गावचा इतिहास गौरवशाली अशा स्वरूपाचा आहे. कल्हाळी या गावांमध्ये जवळपास 35 विर हुतात्मे झालेले होते. जून महिन्यामध्ये 1948 रोजी महसूल गोळा करण्याचे कार्य करण्यात आले होते. यामध्ये अप्पासाहेब नाईक यांनी सारा भरण्यास नकार दिला त्यावेळेस अप्पा साहेबांची बातमी हैदराबादला कळविण्यात आली त्यावेळी कलहाळी या ठिकाणी सशस्त्र पोलिसांची टोळी पाठवण्यात आली .29 व 30 जून , 01जुलै 1948 रोजी कल्लाळी या गावावर हल्ला करण्यात आला. अप्पासाहेब नाईक शहीद झाले. अप्पासाहेब नाईक यांच्यासोबत जवळपास 35 व्यक्ती शहीद झाले. नांदेड जिल्ह्यातील भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या अंतर्गत 2008 पासून मराठवाड्यामध्ये मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुक्ती शहीद झालेल्या हुतात्म्यांना त्यांच्या स्मारकास व त्यांच्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी रणयात्रा आयोजित केली जाते. 13 सप्टेंबर व 14 सप्टेंबर अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व शहिदांच्या नातेवाईकांना भेट देवून या शहिदांचे पुण्यस्मरण केले जाते. अशा स्वरूपाची रणयात्रा ही महाराष्ट्र राज्यातील भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांनी ही परंपरा घालून दिलेली आहे .आज ही परंपरा जपली जाते . भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांचे हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचे योगदान आहे.

 

*श्री .सूर्यवंशी एम .एस.(सहशिक्षक) श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लोहा ता. लोहा जि. नांदेड*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *