दिनांक 19/09/2024
*तालुका प्रतिनिधी*
अटल आनंदवन घनवन योजना ही प्रदूषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व मुबलक प्राणवायुयुक्त पर्यावरण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाची आहे,वृक्षलागवड व संवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर यांनी लिंबोटी येथे वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,सामाजिक वनीकरण विभाग लोहा,प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने लिंबोटी येथे अंतर्गत दहा हजार (10000) वृक्षलागवडीचा शुभारंभ लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर,सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी विश्वंभरराव मंगनाळे,परीक्षेत्र वन अधिकारी सामाजिक वनीकरण लोहा एस.टी.काळे,संजय शिक्षण संस्था कंधार चे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर,यशवंत पाटील भोसीकर,यावेळी मुख्याध्यापक अशोक सापनर,तानाजी मारकवाड,एन.एच.काजी(वनपाल) एस.जी. मुंढे (वनरक्षक),आर.आर.नांदुरे (वनरक्षक) यांच्या उपस्थितीत वृक्षलागवडी चा शुभारंभ करण्यात आला,
या प्रसंगी लोहा-कंधार विधानसभा कॉग्रेस पक्ष निरीक्षक संजय भोसीकर म्हणाले की,अटल आनंदवन घनवन योजना ही मानवी जीवनाला वाचवण्यासाठी प्रदूषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व मुबलक प्राणवायुयुक्त पर्यावरण निर्मितीसाठी महत्वाची आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करणे महत्वाचे व काळाची गरज आहे.कमीत कमी जागेत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व त्यातून घन वनाची निर्मिती ही अत्यंत स्वस्त, यशस्वी ठरलेली संकल्पना आहे. स्थानिक जैविक संसाधने टिकविणे,ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचेही भोसीकर म्हणाले.याप्रसंगी एस.टी.काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन अटल घनवन योजनेची सविस्तर माहिती दिली,यावेळी राजाराम नाईकवाडे,नागेश नाईकवाडे,आदींसह शाळेतील शिक्षक शिक्षीका शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.