प्रशासन कंधारच्या इतिहासाबाबत निरक्षर आहेत का जनतेचा प्रश्न ?* *भुईकोट किल्ल्याचे आमदारांनी केले मौर्यकालीन किल्ला असे नामकरण*

 

*कंधार प्रतिनिधी – संतोष कांबळे*

कंधार शहरातील ३७.३० कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा दि.२५ रोजी आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले.यामध्ये कंधार येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यास पोचमार्ग व स्वच्छता गृह बांधकाम करण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.कंधार येथे भुईकोट किल्ला आहे.नेमके हेच विसरले आमदार महोदय यांनी या किल्ल्याचे मौर्यकालीन किल्ला असा उल्लेख येथील उद्घाटन फलकावर लावला.त्यामुळे कदाचीत किल्याचे नामकरण तर झाले नाही ना ? असा प्रश्न येथील जागरुक जनतेला पडला आहे.
काही दिवसांतच आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.आपण केलेल्या व मंजूर करुन आणलेल्या कामाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन दि.२५ सप्टेंबर रोजी आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले होते.यात कंधार तालुक्यासह शहरातील कामाचा समावेश असला तरी शहरातील तब्बल ३७.३० कोटी रुपयांची कामे आहेत.
कंधार मधील मुख्य रस्त्याच्या कामाचे रुंदी कमी तर कुठे अर्धवट काम झाल्याचे असताना सुद्धा आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ते पूर्ण न करताच लोकार्पण सोहळा ठेवण्यात आला.

शहरातील मध्यवर्ती भागातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य रस्त्याच्या कामासाठी दहा कोटीचा निधी प्राप्त झाला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे.
कंधार शहराला ऐतिहासिक वारसा आहे.येथे राष्ट्रकूट राजघराण्याचे राज्य होते.कंधार शहरावर कधीही मौर्यांचे साम्राज्य राहिले नव्हते.त्यामुळे कंधार व मौर्य साम्राज्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.परंतू आमदार शामसुंदर शिंदे यांनी केलेल्या उद्घाटन सोहळ्यात कंधार येथील भुईकोट किल्ल्याऐवजी मौर्यकालीन किल्ला असा उल्लेख केला आहे.त्यामुळे शहरासह तालुक्यात या उद्घाटन सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.सदर कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार आहे. याची निविदा मे.संभाजी कन्स्ट्रक्शन नांदेड यांना मिळाली आहे.या कामाचे उद्घाटन आज करण्यात आले.
ज्याप्रमाणे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या प्रचार आणि प्रसार करण्यात आला त्या प्रमाणात शहरातील व ग्रामीण भागातील तरुण वर्ग,महिला मंडळ यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.

*भुईकोट किल्ल्यावर तीन ग्रंथ प्रकाशित*

१९८५ मध्ये सर्वप्रथम डॉ. प्रभाकर देव यांनी ‘कंधार एक ऐतिहासिक शहर’ ग्रंथ लिहिला. या ग्रंथात किल्याचे वर्णन केले. २००५ मध्ये इतिहास संशोधक डॉ. अनिल कठारे यांनी ‘राष्ट्रकुटांची राजधानी कंधार’ ग्रंथ लिहिला. या ग्रंथात किल्ल्याची सखोल माहिती देण्यात आली. २०१८ मध्ये जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी ‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ ग्रंथ लिहिला. एकंदरीत कंधार भुईकोट किल्ल्यांवर तीन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

इ.स.८ व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला यांनी भुईकोट किल्ला बांधला. राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा यांनी अत्यंत नियोजनपूर्वक किल्ल्यांचा विकास केला. या किल्ल्याचे क्षेत्रफळ २४ एकर आहे. या किल्ल्यात अनेक वास्तू, मूर्तीशिल्पे, अवशेष व इतर वस्तू पाहायला मिळतात. या किल्यावर अनेक शासकांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.

 

 

*प्रशासन कंधारच्या इतिहासाबाबत निरक्षर आहेत का जनतेचा प्रश्न ?*

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे व स्वच्छता गृहाचे काम केले जात आहे. तर या कामी निविदा मे. संभाजी कंन्स्ट्रक्शन नांदेड यांना मिळाली आहे. या कामाचे उद्घाटन आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरील फलक कोणाकडून लावण्यात आले ? सार्वजनिक बांधकाम विभाग की निविदाधारकाकडून हा प्रश्न निर्माण होत आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आला असेल. तर प्रशासन कंधारच्या माहिती बाबत एवढे अज्ञानी आहे का ? जर निविदाधारकाकडून लावण्यात आले. तर त्यांचे गावच हे असताना अशी चुक का ? का हा जाणुनबुजून केलेली चूक आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *