*कंधार/प्रतिनिधी संतोष कांबळे*
कंधार तालुक्यात व शहरातही चढ्या भावाने खाद्य तेल व किराणा मालाची विक्री होत आहे असे जनतेतुन सध्या सुर निघत आहे.किराणामालाचे भाव ही गगनाला पोहोचले आहेत. त्यातच घरातील खाद्यतेल महाग झाल्यामुळे भाजीला फाेडणी द्यावी की नाही असा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे. त्यामुळे गृहणीचे घरातील बजेट कोलमोडले असून भाज्याही महागल्या आहेत. दरवाढीमुळे आता गरीबांना पोटभर खाणे परवडणारे नाही.
महिन्याला काटकसर करून किराणा घेतला जातो. यात महिन्याला साधारणत: चार ते पाच किलो तेल लागते. आता तेल विकत घेताना वाढलेले दर पाहून गृहिणीना धक्काच बसला आहे . दरवाढीमुळे महिन्याच्या बजेटमध्ये आणखी वाढ झाली आहे, असे गृहणीचे म्हणणे आहे. महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबीयांना दर महिन्याला खर्चाचे नियोजन करणे अवघड होत चालले असून दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंमागे प्रति ३० ते ४० भाववाढ झाली तर आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न महिलावर्ग विचारत आहे.जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश अशी ओळख भारताची आहे . स्वयंपाकातील तेलाचा बाजारभाव वाढल्याने भाजीतील तेल कमी करून कसे चालेल. स्वयंपाकातील तेल हे पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. तेल महाग झाल्याने स्वयंपाकातील चव गायब झाली आहे. सरकारने गोडतेल रेशनवर द्यावे अशी मागणी जनतेतून होत असून यावर सरकार ची भूमिका काय राहील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तसेच शासनाने गोड तेलाचे दर कमी करण्याची गरज आहे. महिनाभरात अचानक झालेल्या दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमोडले आहे. आता ऐन सणासुदीत खाद्यतेल महाग झाले असून सणासुदीचा काळ जवळ आला असून, सर्वसामान्यांना येत्या काळात खाद्यतेलासाठी अधिकची किंमत मोजावी लागणार आहे.विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचा खुश ठेवण्याच्या प्रयत्नांवर सरकारने पाणी फेरले आहे.
राज्य शासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. खाद्यतेल भाववाढीकडे शासनाने दुर्लक्ष करुन चालणार नाही. गोरगरिब जनतेला खाद्य तेल खरेदी करायला गोडतेल प्रति किलो मागे १४० ते १५० रुपये खर्च करावा लागत आहे. स्वयंपाक, हॉटेल व्यावसायिकांसाठी लागणारा १५ लिटर तेलाचा डबा १३०० रुपये वरून २००० रुपये झाला आहे. मग सांगा बाकी वस्तू खरेदी कश्या करायच्या ? जनतेची व्यथा शासन दरबारी मांडणार कोण? कोण आमचा विचार करणार गोरगरिब जनतेला खाद्य तेल बेभावाने घ्यावे लागत असल्याने जनता हैराण झाली आहे.**
तिन्ही भाऊ ” माझी लाडकी बहिण “म्हणत बहिणींनाच लुटायला बसलेत ! बहिणी बिचाऱ्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत.
सिलेंडर मध्ये भाऊ बहिणीला दर महिन्याला किमान ८३०/-रुपयाला टोपी घालत आहेत.
आणि आता खाद्यतेल प्रति किलो मागे ३०-४० रुपये जास्तीचे काढत आहेत.*चौकट*
लाडक्या बहिणीला १५०० रु महिना देण्यासाठी मेहुन्याने खाद्यतेल केले ४० रु प्रति किलो महाग !
दिला दाजीला रट्टा
झाली बहीनीची थट्टा..
सणासुदीत सर्वसामान्यांना धक्का येत्या काही दिवसांत देशात सणांची संख्या वाढणार असतानाच विविध खाद्यतेलांवरील सीमा शुल्क ही वाढ करण्यात आली आहे. आता सप्टेंबर महिना संपत आला आहे. नवरात्र आणि दसरा सारखे सण पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबरमध्ये येत आहेत. त्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळीचा सण आहे. सणासुदीत खाद्यतेलाचा वापर वाढतो.