लोहा,प्रतिनिधी
लोहा कंधार मतदार संघात निवडणुकीचे नवे क्रांती करणारे वारे वाहू लागले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवा नरंगले यांना निवडणुकीसाठी माळाकोळी येथील नागरिकांनी तब्बल पाच लाख 55000 चा निधी संकलित करून दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे लोहा कंधार मतदार संघाचे अधिकृत उमेदवार शिवा नंरंगले यांना मतदार संघातील सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत असून या मतदारसंघातील मतदार आता प्रस्थापितांच्या भुलथापांना बळी पडणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिवा नरंगले यावेळी या मतदारसंघात वंचित कडून विधानसभा निवडणुक लढवीत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पहिल्या यादीतच शिवा नरंगले यांना या मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली आहे. यावेळी काहीही झाले तरी शिवा नंरंगले यांना आमदार म्हणून सभागृहात पाहणार असल्याचे मत या मतदारसंघातील अनेक गावातील नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहे.
शिवा नरंगले यांना केवळ मतदान देणार नाही तर त्यांना आर्थिक मदतही करून या धनदांडगे यांच्या यांच्या विरोधात जिंकून अनु असं संकल्प या मतदारसंघातील सर्व बहुजन समाजातून केला जात आहे.
आतापर्यंत अनेक गावातून शिवा नरंगले यांना निवडणुकीसाठी आर्थिक मदत दिली गेली असून आज लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील नागरिकांनी तब्बल पाच लाख 55 हजार रुपयाची मदत शिवा नरंगले यांना केली आहे.
दोन लाख 51 हजार रुपयांचा हार गळ्यात टाकून त्यांना ही मदत केल्या गेली तर उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. ही मदत केवळ एकट्या माळाकोळी येथील नागरिकांचे असून आगामी काळात माळाकोळी सर्कल मधून 25 लाखाच्या वर निधी संकलित करून शिवा नरंगले यांना निवडणुकीसाठी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी माळाकोळी येथील जालिंदर कागणे, माऊली गीते, ओम साखरे, संतोष केंद्रे, प्रतीक जोंधळे, प्रकाश मस्के, दिव्यांग बांधव महावीर गायकवाड यांच्यासह अनेक नागरिकांनी केले आहेत. ज्या मतदारसंघात केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक लढवली जाते त्या मतदारसंघात ही नवी क्रांती मानली जात असल्याची जाणकारांची मत आहे…