मुखेड : (दादाराव आगलावे)
येथील जोशी इन्फोटेक या संगणक प्रशिक्षण केंद्राने महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा स्वच्छ व सुंदर केंद्र म्हणून नांदेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या वार्षिक विभागीय बैठकीत जोशी इन्फोटेक मुखेड या एम एस सी आय टी संगणक प्रशिक्षण केंद्राने तब्बल तीन पुरस्कार पटकावले, “स्वच्छ व सुंदर केंद्र” म्हणून नांदेड जिल्ह्यात प्रथम, “फ्युचरवेध प्रवेशात” नांदेड जिल्ह्यात प्रथम, आणि “एम एस सी आय टी प्रवेशात जिल्ह्यात द्वितीय” असे तीन पुरस्कार पटकावले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वीणा कामत, मुख्य व्यवस्थापक श्री अतुल पतोडी, श्री अमित रानडे, श्री नटराज कनकधोंड, विभागीय व्यवस्थापक श्री कोशल ओहोळ, विभागीय समन्वयक श्री महेश पत्रिके, श्री जीवन लेंभे, जिल्हा समन्वयक श्री पंढरीनाथ आघाव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. जोशी इन्फोटेक गेल्या 23 वर्षापासून मुखेड शहरात आणि तालुक्यात प्रसिद्ध असून आतापर्यंत 22 हजार विद्यार्थ्यांना संगणक कौशल्य देवून प्रशिक्षित करत आहे, इथे शिकलेले हजारो विद्यार्थी आज शासकीय, खाजगी नौकरी मध्ये कार्यरत आहेत, तसेच अनेक विद्यार्थी डि टी पी आणि ऑनलाईन केंद्र सुरू करून स्वतः चा व्यवसाय करत आहेत. जोशी इन्फोटेकच्या यशाबद्दल डॉ. दिलीप पुंडे, प्राचार्य बी. टी. लहाने, प्राचार्य एस. बी. अडकीने, डॉ. अशोक कौरवार, पत्रकार दादाराव आगलावे, बलभीम शेंडगे, जिप्सी मॉर्निंग ग्रुप, सुप्रभात ग्रुप, संजीवनी ग्रुप तसेच अनेक प्रतिष्ठित लोकांनी कौतुक केले आहे.