“जशी सागराचे पाणी कधी आटणार नाही,
तशीच भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
डॉ.बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्यलढयामधील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते, तसेच ते थोर समाजसुधारक म्हणून देखील ओळखले जातात. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्यांचा संदेश आजच्या पिढीलाही तितकेच गरजेचे आणि आदर्श वाटतात.त्यांनी भारतातील समाजातील तळागळातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्न केले. हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण, स्त्रियांचे मुलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, उच्च-नीच भेदभाव, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, तसेच संविधान अशी महान कार्ये त्यांनी केली.
डॉ. आंबेडकरांचे विचार, त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मुल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेला सक्रीय सहभाग आदींची प्रेरणा म्हणून हा दिवस ओळखला जातो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथल्या ऐतिहासिक समारंभात आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 64 वर्ष, 7 महिने होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यूनंतरची मुक्ती असा होतो, म्हणूनच त्यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. यादिवशी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात.या दिवशी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक शाळा-कॉलेजेसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
“महापरिनिर्वाण” हा शब्द बौद्ध धर्मातून घेतला गेला आहे.हा शब्द एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीच्या अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा मुक्तीच्या अनुशंघाने वापरला जातो. त्यानुसार बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दीन म्हणून ओळखला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागर अशा या महामानवास महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
रूचिरा बेटकर नांदेड.
9970774211