अंगप्रदर्शन म्हणजे नक्की काय ??.

स्त्रीने अंगप्रदर्शन करावे कि नाही ??..किवा का करतात ?? हा विषय माझे वाचक श्रीपाद टाकळकर यांनी सुचवला आहे.. मनापासून आभार आणि अगदी मनापासून मोकळेपणाने मी यावर लिहीणार आहे.. ज्याची वैचारिक लेव्हल उच्च त्याला कायमच सगळ्यात चांगलं दिसतं..
अंगप्रदर्शन म्हणजे नक्की काय ??.. प्रत्येक व्यक्तीगणिक याचा अर्थ बदलतो.. थोडी क्लीव्हेज दिसणं म्हणजे अंगप्रदर्शन कि शॉर्ट कपडे घालणे म्हणजे अंगप्रदर्शन तसं तर साडीही बेंबीच्या खाली नेसली जाते .. साडीतुनही कंबर पोट पाठ दिसते त्यामुळे या प्रश्नाचे उत्तरच मिळु शकत नाही त्यामुळे करावे कि नाही हा प्रश्नच उरत नाही..
मीही स्त्री आहे आणि मीही बिकीनी ते साडी अशा सगळ्या प्रकारचे कपडे घालते किवा घातले आहेत.. त्यामुळे मी घालते म्हणुन ते योग्य कि अयोग्य हे न लिहीता एकंदरीत समाजाच्या दृष्टीने हा विषय मांडायचा प्रयत्न करणार आहे.. वेगवेगळे कपडे ट्राय करायला मला कायम आवडतात आणि कोणाचीही पर्वा न करता मी ते करते आणि इतरांनीही केलं आणि त्यांना किवा त्यांच्या घरच्याना चालत असेल किवा त्यांच्या फिगरला शोभत असेल आणि त्यांना कॅरी करता येत असेल तर इथे समाजाचा प्रश्न येतोच कुठे ??कारण समाज दोन्ही बाजूने बोलतो.. साडीतल्या फोटोलाही लोक हॉट म्हणतात आणि शॉर्टवर काढलेल्या फोटोनाही अशाच कमेंट येतात.. अगदी माझच उदाहरण देते.. अनेकदा अनेक पुरूष मला वैयक्तिक मेसेज करतात आणि विचारतात , मॅम अलीकडे तुम्ही साधे फोटो काढता.. तुमची फिगर चांगली आहे त्यामुळे शॉर्ट कपडे तुम्हाला चांगले दिसतात.. लोकांकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला आवडेल तसं रहा आणि यातील काही मंडळीना साडीत टाकलेले फोटो पाहूनसुध्दा पोटदुखी सुरु होते..
कालच्या माझ्या लेखावर निळ्या साडीतला सुंदर फोटो शेअर केला तर लोकांनी त्यावरही कमेंट केली म्हणजेच काय लोकांना मी काय लिहीते याच्याशी देणंघेणं नसतं तर विनाकारण मी किती सभ्य किवा शहाणा हे दाखवायचं असतं.. तुम्हाला व्हलगर दिसतं हा तुमचा दोष.. मला फोटो काढायलाही आवडतात आणि शेअर करायलाही आवडतात.. ज्यांना पहावत नसेल त्यांनी माझ्या वॉलवर येउन तुमचा वेळ वाया घालवू नये आणि खरच माझ्याकडून काही शिकायचे असेल तर फोटो न पहाता फक्त वाचून त्यावर व्यक्त व्हावं.. आपल्या बायको , बहीण , मुलीने हे करु नये वाटतं पण आपण मात्र गुपचूप लपून दुसऱ्या स्त्रीचे फोटो पहाणारच.. ज्याला शिकायचय त्याला बाईचं शरीर आणि कपडे दिसणारच नाही तर त्याला अभ्यास दिसेल .. सिनेमात बऱ्याचदा ती गरज असते म्हणुन तसे कपडे वापरावे लागतात.. शॉर्ट कपडे घालणाऱ्या मुली तास तास घाम गाळतात ते दिसत नाही का ??.. तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवता का ??.. काही स्त्रीया मेंटेन न रहाता जर अंगप्रदर्शन करत असतील तर ते दिसायला वाईट दिसतं हे बरोबर आहे.. ज्याला शोभत नाही त्यांनी हा अट्टाहास सोडावा..
शॉर्ट कपडे म्हणजेच सौंदर्य का ?? तर अजिबात नाही.. पूर्ण कपड्यातही स्त्री सुंदर दिसतेच पण तिची हौस , आवड , या सगळ्या गोष्टीना आळा घालणारे आपण कोण ??.. प्राचीन काळीही असे कपडे वापरले जायचे हे मी वाचलय.. जुन्या सिनेमात सुध्दा क्लीव्हेज दिसायची.. अध्यात्मिक अंगाने पाहिले तर शरीर हे सुध्दा आत्म्यावरील कपडाच आहे तो बाजुला करुन काय दिसतं पहा.. जशी दृष्टी तशी सृष्टी.. पुरुषांनी बनीयन आणि बर्म्युडात फिरावं आणि स्त्रीयांनी गुडघ्यापर्यंत कपडे घालु नये हा नियम पुरुषांनीच केलाय कारण त्यांच्या मनात त्यांच्या स्वतःबद्दल अविश्वास आहे.. कारण त्यांना माहित आहे कि आपलाच पाय घसरेल.. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवु शकत नाही तो बायकोवर किवा इतर स्त्रीवर काय ठेवणार ???.. ज्याच्या मनात विकृती तोच अशा कमेंट करतो आणि जो खरच वाचक आहे तो वाचून त्यातुन काहीतरी घेतो आणि स्वतःमधे बदल करतो.. कपड्यावरुन चारीत्र्य ठरत नाही तर ते विचारांवर ठरते.. ज्याचे विचारच असे असतील त्याचं चारित्र्य कसं असेल याचा अंदाज येउ शकतो.. लेडीजवर कमेंट करणारा शहाणा नाही तर बावळट ठरतो आणि आपली इज्जत काढून घेतो.. सोशल मिडीयावर तुमच्याही बायका ,मुली असतात त्यामुळे त्यांना कोणी वाईट कमेंट केल्या तर ??.. थोडा विचार करुन पहा.. मला कायम वाटतं , आपली बुरसटलेली विचारसरणी बदलली तर खुप प्रगती होईल.. सोशल मिडीयावर राहुन आपल्याला त्यातील उत्तम वेचायचं आहे … त्या स्त्रीतील सौंदर्य पहा.. तिच्यातील कला पहा.. तिचा आदर करा आणि यातील काहीही जमत नसेल तर मस्त माळ घेउन जप करा.. त्याचा तर भरपूर फायदा आहे..
सोच बदलो.. देश बदलेगा..
( तळटिप.. माझ्या कपड्यांवर नावं ठेवणाऱ्यासाठी… मी रोज सव्वा तास टेकडी चढते .. रोज १६ माळा जप करते.. मद्यपान मांसाहार कधीही करत नाही .. पार्ट्या नाहीत.. शक्यतो खोटं बोलत / वागत नाही .. कोणावरही कधीही कमेंट करत नाही.. घरातील सगळी कामे स्वतः करते.( कुठल्याही कामाला बाई नाही ) . सामाजिक काम आहेच ..
… रोजचं लिखाण वाचन आहेच.. काउंसीलींग आहे.. भगवद्गीता शिकतेय.. श्रीमद्भागवत जाणून घ्यायचा प्रयत्न करते.. लैगिंकता आणि अध्यात्म याची सांगड घालून त्यावर मार्गदर्शन करते.. तुम्ही यातलं काय करता ??

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *