प्रतिनिधी, कंधार
कंधार येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मंगळवारी, १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता माईचे मंदिर, साठेनगर येथून कंधार तहसील कार्यालयावर बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात येणार आहे.
गत वर्षभरापासून बांगलादेशमध्ये हिंदूवर आण्विक अत्याचार केले जात
आहेत. परंतु जागतिक स्तरावरील मानव अधिकार संघटना या संदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही. या अनुषंगाने मंगळवारी, १० डिसेंबर २०२४ रोजी जागतिक मानव अधिकार दिवस असून या संघटनेचे लक्ष वेधण्याकरिता कंधार तहसील कार्यालयावर बांगलादेश हिंदू न्याय यात्रा सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात येणार आहे.कंधार शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत बंद ठेवावी व बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती ॲड गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिली .