कंधार ; प्रतिनिधी
गत वर्षभरापासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर आण्विक अत्याचार केले जात आहेत परंतु जागतिक स्तरावरील मानव अधिकार संघटना या संदर्भात कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही त्याच अनुषंगाने दि १० डिसेंबर रोजी सकाळी हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी उमर संस्थांचे मठाधिपती श्री संत महंत एकनाथ नामदेव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय तहसीलदार कंधार यांना निषेदाचे निवेदन देण्यात आले.
बांगलादेशमध्ये ग्रहयुद्धाच्या काळात तेथील अल्पसंख्यांक असणारा हिंदू आणि बौद्ध व इतर अल्पसंख्यांक समुदायावर तेथील स्थानिक नागरिकांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत, धार्मिक स्थळांना नुकसान पोहोचले जात आहे व महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये विटंबना केली जात आहे या प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार संघटनेने कुठलीच कार्यवाही न केल्यामुळे व जागतिक स्तरावर बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधण्यासाठी सकल हिंदू समाज कंधारच्या वतीने तहसील कार्यालय कंधार वर दि १० डिसेंबर रोजी सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले यावेळी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान बंद ठेवून बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत नागरिक सहभागी झाले .
कंधार शहरातील मुख्य रस्त्याने ही बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली या यात्रेत नामदेव महाराज संस्थान उमरज संस्थांचे मठाधिपती श्री गुरू महंत एकनाथ नामदेव महाराज ,गजानन महाराज पाठक, शंकर महाराज स्वामी, संदीप गुरु आलेगावकर, मल्लिकार्जुन स्वामी महाराज यांच्यासह साधुसंत उपस्थित होते यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने नायब तहसीलदार उत्तम मुदीराज यांना निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे आणि मंदिरांचे संरक्षण करणे, हिंदू धर्म धर्माचाऱ्यांची सुटका करणे, हिंदू महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध लावणे ,समाज माध्यमे आणि समाजात होत असलेल्या हिंदू धर्मियांचे उतपीडन थांबवणे असे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी सकल हिंदू समाज उपस्थित होता.