@मी …तू… आणि शेकोटी…

 

सध्या थंडीने चांगलीच हुडहुडी भरवलीय…अशा थंडगार वातावरणात एकदा तरी शेकोटीची उब घेण्याचा अनुभव काही निराळाच …हातावर हात चोळत शेकोटी च्या भोवती बसून गप्पांची एक मैफल रंगवून जाते…अंगावर येणार्या थंडगार वार्यांना परतून लावण्यासाठी पेटवली जाणारी शेकोटी म्हणजे..एक न्यारीच उब…
आसमंतात अदृष्य गारव्याचा काहूरा कोंडलेला राहतोय आणि त्यामुळे दिवसाढवळ्या अंधार वाटु लागतोय.
गारेगार थंडीत गरमागरम पदार्थांवर ताव मारून शेकोटीभोवती रंगलेली गप्पांची मैफल, कानावर पडली… आणि मी कसलाही विचार न करता तिथे पोहचले…ईथे
हॉररपासून म्युझिकपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या अन्फरगॉटेबल ठरत होत्या. कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटल्यावर मनाचे सगळे कप्पे एक एक करून खुलत होते. गप्पां करत आठवणींचे दारे उघडत होते फुल्ल नाइट गप्पांचा फड रंगणार होता. त्यात कोणताही विषय वर्ज्य नसणार होतो.अश्यात हातामध्ये
गरमागरम वाफाळत्या कॉफी चे झुरके मारत केलेल्या गप्पा, गोष्टी त…मला तुझी आठवण येणं हे नक्कीच होतं…आता ही शेकोटी ची, धग हवीहवीशी वाटतं होती. एकूण काय तर
आकाशात उडणाऱ्या शिकोटीच्या चिटोर्या सह स्वप्नरंजनाचे आकर्षण होऊ लागले….अश्याच एका आठवणीत माझं मन तुझ्यात रंगल….

पश्चिमेला सूर्य मावळत असताना सूर्याची किरणे अंगावर घेताना आपण नितांतसुंदर वाहणार्या एखाद्या नदीच्या काठावर बसलो होतो… सोबतीला तू होतास..अर्थात तु हवाच होतास सोबतीला ….
त्या गुलाबी थंडी मध्ये आपण होतो…आणि समोर होती धगधगती शेकोटी…धगधगत मन…
पण तिथे आपल्या आपण असण्यामध्ये मी संपून गेले होते आणि तू देखील… चांगल्या वाईट व्यवहाराच्या पलीकडे फक्त भावनांची अभिव्यक्ती उरली होती…या भावनांना शब्दच उरले नव्हते… उरले होतं फक्त कुतूहल, उत्कंठा ,एक अनामिक पीडा ते कधी ही संपणार नसल्याचे भासतं होते… अशा स्थितीत एक वेळ अशी होती की हे क्षण संपणार तर नाहीत ना याची भिंती वाटायला लागली होती… मग नकळत एका अलौकिक प्रवासावर आपण दोघे निघालो होतो… हा प्रवास कुठेही जाण्यासाठीचा नव्हता … तर स्वतः मधली पोकळी बाजूला सारून एकरूप होण्याचा प्रवास… समरूप होण्याचा प्रवास… या प्रवासात वेदना आहे,.. दुःख आहे… तरीही सहप्रवासी म्हणून दोघे खूप खुश होतो.. शेवटी कुठेतरी भावविभोर होऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली होतीच…जे या मनःपटलावर गुलाबी थंडी मुळे चे सुखद व हव्याहव्याश्या वाटणार्या अनुभूतीची अभिव्यक्ती देत होते… म्हणजे ते अश्रू नव्हते तर सुखद ,समाधानाच प्रतिक होतं…आता तू व मी असे दोघे नसून…आता एक झाले होतो…आपण … तिथे कायमचं राहणार होतो एका आठवणींच्या पांघरुणात गुंडाळून… खरतर आपल्याला आपण असण्यासाठी शरीर व किंबहूना या मनाची देखील गरज नव्हती. या गुलाबी थंडी मुळे आपण म्हणजे तू… मी आणि मी …तू… म्हणून उरले होतो… पुन्हा असं वाटतं की चल जाऊ त्या गुलाबी थंडी मध्ये जिथे मी मी राहणार नाही… तेथे तु…तू राहणार नाही… अश्या आठवणींच्या प्रवासावर…

रात्र कधी…? कशी…? संपली हे कळलंच नाही…
दिवस उजाडलेला होता…दिवस आणि मी आठवणीत गोठलेलेच राहिलोत असंच वाटतयं…आकाशात मळभ ही दाटून आलेलं.भर दिवसादेखील अंगावर सूर्यप्रकाश पडला तरी तो तापदायक वाटत नाही या सूर्याची किरणे अगदी सोनेरी वाटू लागतायत आणि अंगावर येणारी वाऱ्याची झुळूक …. माझ्यातल्या तु ची आणि तुझ्यातल्या मी ची आठवण करून देऊ लागली होती…

 

सौ.रूचिरा बेटकर नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *