अहमदपूर : हिंदू धर्मात एक दोन नव्हे तर तब्बल १६ संस्कार सांगितले आहेत. ती जणू मानवी मुल्यांचा संच आहेत. आईवडील आणि गुरुजनांकडून जे विधी विशेषतः धार्मिक विधी केले जातात, त्यांना संस्कार असं म्हणतात. सात्विक वृत्तीची जोपासना करणे हा या मागचा खरा हेतू आहे. तर सद्गुणांचा विकास हा या संस्कारांचा पाया असतो. यामुळे माणूस जसा नितीमत्तेनं राहतो तसाच तो नामस्मरण आणि इश्वर स्तवन पण करतो. यातून चांगला माणूस, चांगला समाज आणि ओघानेच एक चांगलं राष्ट्र घडू शकतं.
गर्भाधान म्हणजे डोहाळे जेवण, नामकरण म्हणजे बारसे, अन्न प्राशन, अक्षरारंभ, उपनयन आणि विवाह सोहळा ही मुख्य आणि सर्व परिचित संस्कार होत. तसं पाहिलं तर प्रत्येक संस्काराला तेवढंच महत्त्व आणि महात्म्य आहे. अर्थातच ते दिलं तर आणि संस्कार केले तर !! यातील पहिला संस्कार म्हणजे डोहाळे जेवण. बाळ गर्भपात असतांनाच केला जाणारा व आप्तस्वकीयांसह इष्ट मित्रांनाही दिलं जाणारं डोहाळे जेवण होय. कुणीतरी येणार ग् ! ही चाहूल लागल्यावर सातव्या किंवा नवव्या महिन्यात हा संस्कार केला जातो. गर्भवतीचे डोहाळे पुरवले जातात. अर्थातच संस्कारांचा हा सिलसिला जीवनभर चालू असतो. सौ सुप्रिया गजानन भोस्कर यांच्या डोहाळे जेवण प्रसंगी उपस्थित श्री परमेश्वर शि एंम्पले , मन्मथ स धनुरे आणि आप्तेष्ट.