आयुष्य समृद्ध होण्यासाठी कलेचं स्थान..

हा विषय सुचवलाय.. माझे वाचक संजय गोसावी यांनी.. अतिशय सुंदर विषय आहे . यावर लिहायला जास्तच मज्जा येणार आहे..
मीही एक कलाकार आहे..
पुं. ल. देशपांडे यांचं वाक्य आठवलं, ” नोकरी , व्यवसाय आपल्याला जगायला उपयोगी येतात पण कुठलीही कला ही आपण का जगावं हे शिकवते.. ”
सचिन नावाचा माझा मित्र माझ्याकडे कायम तक्रार करतो , सोनल तुझ्याकडे किती कला आहेत गं , देवाने मला एकही कला दिली नाही .. तो बऱ्याचदा हे बोलून दाखवतो आणि दुखी होतो…. मला नेहमी वाटतं , अंगात एखादी तरी कला असायला हवी नसेल तर ती डेव्हलप करता येते का पहावी..
कला या सगळ्याकडे नसतात .. बऱ्याचदा त्या उपजत असतात.. घरात आईवडील पैकी कोणीही कलाकार नसतो तरीही मुल कलाकार असतं.. माझं माहेर सासर हे कलेने समृध्द आहे.. गायन , वादन , अभिनय , लेखंन , शिल्पकार , डांसर , निवेदक अशा समृध्द घरात मी रहाते पण अशी काही मंडळी आहेत ज्यांच्याकडे कला आहेत पण त्या कलेला घरुन विरोध असतो.. म्हणजेच काय तर आपली घाणेरडी मानसिकता असे कलाकार मारुन टाकते.. कलेतुन पैसा मिळत नाही, कलाकारांना व्यसनं लागतात , कलाकाराना स्थिरता नसते , एक ठरावीक उत्पन्न नसल्याने त्यांना लोन मिळत नाही , त्यांच्याशी कोण लग्न करत नाही अशा अनेक विचारांनी कलाकार जीवंतपणीच मरतो.. त्यापेक्षा नोकरी कर , व्यवसाय कर , सरकारी नोकरी असेल तर उत्तमच असे सल्ले घरुन आणि आजूबाजूच्या लोकांकडून दिले जातात.. यातल्या काही गोष्टी काही अंशी खऱ्याही असतात पण असे अनेक खेळाडू ,कलावंत नावारूपाला आलेले आपण पहात आलोय.. कुठल्याही गोष्टीला अपवाद हा असतोच.. आपली कर्म आहेत.. विधीलिखीत काही गोष्टी आहेत.. एखाद्या क्षेत्रात करिअर करायला बरेचसे पालक आडकाठी आणतात आणि नाईलाजाने तो नोकरीची वाट धरतो.. तिथेही तो फार रमत नाही .. कधी कधी कंपनीमधे ही कलाकराच्या कलागुणांना वाव मिळतो त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जीवंत रहातात.. जगायला पैसा लागतोच पण अंगात एखादी कला असेल तर माणूस मानसिकदृष्ट्या अधिक बलवान होतो… जगात अनेक उदाहरणे आहेत.. अगदी आपल्या फिल्मलाईंनला सुध्दा अनेक कलाकार आहेत जे शाकाहार पसंत करतात.. पार्ट्याना जात नाहीत.. स्मोक , ड्रिंक करत नाहीत याउलट सरकारी नोकरदार रोज संध्याकाळी बार मधेही दिसतात म्हणजेच काय तर या कुठल्याही क्षेत्रावर माणूस ठरत नाही.. त्याची मानसिकता काय आहे ??.. त्याची जडणघडण कशी झालेय ?.. त्याचं कर्म आणि त्यानुसार घडणाऱ्या घटना या सगळ्याचा इंपॅक्ट आपल्या जीवनावर पडत असतो.. ज्यांच्याकडे कला आहेत त्यांनी त्या जोपासा कारण आपण या जगातून जाताना कला आपण मागे सोडून जाऊ शकतो .. त्याच कलेतुन आपण जीवंत राहू शकतो.. ज्यांच्याकडे पैसे आहेत पण कला नाहीत त्यांनी गरीब कलाकारांना मद्त करुन त्यांच्यातील कला जोपासायला मदत करावी.. गरजूंना उपयोगी पडणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे ही सुध्दा कलाच आहे…
बऱ्याचदा कलाकारांना शापही असतो त्याचीही असंखय उदाहरणे आपण पाहिलेली आहेत.. जेव्हा आपल्याकडे काही असतं तेव्हा आपले पाय जमिनीवर असणारे कलाकार शेवटपर्यंत सेवा करत रहातात कारण त्यांना माहित असतं कि कला ह्या सगळ्याना मिळत नाहीत . श्रीकृष्णाने सांगितलय , प्रत्येक गोष्ट मला समर्पित कर , माझ्यासाठी कर , त्यानुसार जर आपण वागलो तर आपल्या डोक्यात हवा जात नाही .. सगळं तो करतोय .. आपलं कर्तृत्व काहीही नाही हे जेव्हा आपल्याला समजेल त्यावेळी आपण त्याचं क्रेडीट घेणारच नाही त्यामुळे गर्व , अहंकार आपल्याजवळ फिरकत नाही.. आपण प्रत्येकजण आपल्याला नेमून दिलेलं काम करायला पृथ्वीवर आलो आहोत ते झालं की आपल्याला इथून एक्झीट घ्यायचा आहे इतकच लक्षात ठेवायचं आणि मनमुराद जगायचं अगदी माझ्यासारखं..
जगा आणि जगू द्या..
( तळटिप.. कधी कधी आईवडिलांचाही निर्णय चुकु शकतो नाहीतर आईवडीलांनी ठरवलेली प्रत्येक लग्न टिकली असती किवा प्रत्येक जण सुखी राहिला असता त्यामुळे ढवळाढवळ नकोच )

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *