प्रेमाच्या अलवार लाटा..

 

काल माझ्या मित्राने मला एक व्हीडीओ पाठवला आणि त्याच्याखाली बघ असा मेसेज केला.. कोणी स्पेसीफीक बघ म्हटलं तरच मी व्हीडीओ ओपन करते नाहीतर क्लीअर चॅट..
अर्थातच साऊथकडचा व्हीडीओ होता.. भगवंताच्या सांगण्यावरुन ब्र्हमाजीनी जेव्हा मनु आणि शतरूपाची निर्मिती केली तेव्हाच हे सौंदर्य रुजायला लागलं असणार कारण इतक्या वर्षानी मुरल्यावर त्यात आलेला सौंदर्याचा तवंग राधा कृष्णाइतकाच पवित्र आणि सुंदर भासला.. कमळाच्या पाकळ्यानी अलगद मिटावं आणि चंद्राने त्यात डोकावताना कमळाचा गुलाबी रंग त्याला लागावा आणि तो गुलाबी चंद्र फक्त माझ्याच नजरेस पडावा कारण कुठेही सौंदर्य असतच पण आज ते मांडताना माझी लेखणीही गुलाबी झाली… हिरो , हिरॉईन प्रेमाच्या लाटेवर अलगद हेलकावे घेत होते आणि ते नयनरम्य दृश्य टिपायला एखादा आण्णाच असायला हवा ना .. त्या दोघांच्या सौंदर्याने कॅमेराही तरुण झाला असेल आणि त्यातील बारकावे टिपतांना डिरेक्टरला कृष्णा व्हावे लागले असेल कारण सुंदर नखशिखांत राधेला टिपायला फक्त कृष्णालाच यायलाच हवं.. कोरीओग्राफी आणि त्यातील नजाकत म्हणजे नजरेची नजर काढावी इतकं ते लोभसवाणं कॉंबीनेशन.. तिच्या केसापासुन पायापर्यत फिरणाऱ्या त्याच्या ओठानी त्यानंतर पुन्हा कधीही कोणालाही स्पर्श करु नये आणि बेंबीवर असलेल्या गुलावाच्या पाकळीचं नशीब पाहून वाटलं , भगवंताने आताच मोक्ष दिला तरी चालेल..यापेक्षा सुंदर काहीही नसावं.. ज्या नजाकतीने तो पाकळी तोंडात घेतो ना…….. अहाहा
तिच्या रंगीबेरंगी कॉच्युमनी इंद्रधनुष्यला टक्कर दिली आणि डोळ्यातुन गालावर ओघळणारा तिचा एक अश्रू म्हणजे………. त्या सागराने सुध्दा त्याक्षणापासुन खारटपणा सोडला असेल कारण ते पेटंट तिच्या नावावर लिहीले गेले.. जिथे सागरही नतमस्तक झाला तिथे साउथ शब्द बर्फासारखे गार पडले .. ते समजण्याची गरजच काय कारण सुंदर निसर्ग , पाणी आणि पांढऱ्या शुभ्र बेडवर पाकळ्यानी काढलेला हृदयाचा आकार पाहून अनेकांची हृदय काही क्षणासाठी तिथेच थांबली असतील.. कदाचित हृदयाच्या ठोक्याच्या आवाजात प्रेमाचा लडीवाळ स्वर लपायला नको… इतकं कोणी सुंदर असतं का ???.. त्याहीपेक्षा सुंदर त्याची भारदस्त छाती आणि त्याच्यावर पहुडलेली ती ……. डोळ्यातील काजळ सुध्दा ते पहाताना लाजलं असेल कारण याआधी काजळाला काळजीने प्रेम करताना कोणीही दिसलं नसेल..

आता लिहीताना शब्द म्हणत आहेत , बस कर ना सोनल यार.. …… तुझ्या वाचकांना त्याचा आनंद घेउदेत ना.. काही गोष्टी शब्दातीत होत नाहीत तरीही हा वेडा प्रयत्न.. तुम्हीही अशा सुंदर व्हीडीओवर जरुर व्यक्त व्हावं.. फक्त रोमॅन्टिक माणसालाच हे सौंदर्य दिसु शकतं.. काही क्षणासाठी का होइना जरूर रोमॅन्टिक बना आणि त्या कलाकृतीचा मनमुराद आनंद लुटा.

https://www.facebook.com/share/v/19ksKcSA32/
व्हीडीओ लिंक दिली आहे

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *