यशस्वी कार्यक्रमाबद्दल सर्व स्तराकडून होत आहे कौतुक
मुखेड: (दादाराव आगलावे) आपले आयुष्य सुंदर व मौल्यवान आहे उतार वयात टेंशन फ्री राहून स्वतः साठी जगा व आनंदी रहा असा मौलिक मंत्र गुरुवर्य सर्वश्री मारुतीराव धुप्पेकर, मारुतीराव चांडोळकर, टि.व्ही सोनटक्के सर यांनी दिला.
मुखेड नगरीचे भुमीपुत्र जे 1974 साली इयत्ता दहावी पास झाले. या बॅच ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्व मित्रांनी मिळून मुखेड येथे दि.25 डिसेंबर रोजी हिब्बट रोडवरील चौधरी फंक्शन हाॅल मध्ये सुवर्ण महोत्सव अत्यंत आनंदात साजरा केला.
या समारंभासाठी तत्कालीन गुरुजन मारुतीराव धुप्पेकर सर, मारूतीराव चांडोळकर सर, टि.व्ही.सोनटक्के सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आशीर्वादरुपी मार्गदर्शन करताना बोलत होते.
धुप्पेकर सर म्हणाले की, जगात सुखी कोणीच नसतो. सुख मानण्यात असते. चिंता करू नका, मनमोकळे वागा जीवनात कधीच कमी पडणार नाही.आनंदी राहून मैत्रीचे वातावरण तयार करा.
चांडोळकर सर म्हणाले की, सुवर्ण महोत्सवासाठी नाताळ सणाचा योग साधला छान झाले. बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो ही विचारसरणी ठेवावी.
यावेळी वर्ग मित्रांचा परिचय असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन
करण्यात आले, उपस्थितांना स्मृतिचिन्ह, स्मरणिका व ग्रुप फोटो देण्यात आला.प्रास्ताविक माजी कृषि संचालक सुरेश आंबुलगेकर यांनी सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमा मागील भूमिका विशद केली. 10 वीच्या बॅचला 1974 साली 210 वर्ग मित्र होते. त्यातील 110 मित्रांनी सहभाग घेतला. 50 वर्षात अनेक बदल झाले. एकमेकांना सहकार्य करता यावे यासाठी हा महोत्सव घेतला. अविस्मरणीय समारंभासाठी सर्वांचे सहकार्य प्रेम लाभले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
यावेळी दिवंगत 50 वर्ग मित्रांना दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संत अंबादास देशमुख,मल्लिकार्जुन एकाळे, शिवराय मुगावे, जगदीश बियाणी, प्रभाकर रेणगुंटवार, ओंकार जोशी, साजिद, बालाजी मामडे, यानी मनोगत व्यक्त केले.
जगदीश बियाणी, मल्लिकार्जुन एकाळे, शिवराज मुगावे यांनी उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले. सुत्र संचालन संत अंबादास देशमुख यांनी केले. अमृतवार यांनी नांव नोंदणी केली.प्रारंभी विरभद्र स्वामी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले. मधुसूदन कलंत्री यांनी सर्वांना स्मृतिचिन्ह दिले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जगदीशशेठ बियाणी, सुरेश आंबुलगेकर, महंमद चौधरी, मल्लिकार्जुन एकाळे, प्रभाकर रेणगुंटवार, सुरेश काचावार, जगन्नाथ अमृतवार व सर्व वर्ग मित्रांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर विरभद्र स्वामी मंदिर ते प्रमुख रस्त्यांवरुन शहर फेरी काढण्यात आली . डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप झाला.मुखेडचे भुमिपूत्र असलेले नागनाथ उमाटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून मंत्रालयात उत्कृष्ठ कार्य केले आहे. सुरेश आंबुलगेकर हे कृषि संचालक म्हणून, जगदीशेठ बियाणी हे मुखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, अनेक वेळा सदस्य, एक यशस्वी व मनमिळावू व्यापारी म्हणून नावलौकिक कमावला आहे. रमेश भुरेवार हे पोलिस उप अधिक्षक, जगन्नाथ अमृतवार विद्धूत मुख्य अभियंता, माधव कवटिकवार बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, संत अंबादास देशमुख हे न्यायालयात प्रबंधक म्हणून सेवानिवृत्त झाले सध्या ते उच्च न्यायालयात वकिली करतात. सुरेश काचावार हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून, शिवराज मुगावे कृषि अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. प्राध्यापक म्हणून शाहू देसाई, मुख्याध्यापक म्हणून बालाजी ढगे, राम पाळेकर, मल्लिकार्जुन एकाळे, रमाकांत परकंठे, फंक्शन हाॅल चे संचालक महंमद चौधरी हे नगरसेवक होते, स.मौलाना हे शहर अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले. मधुसूदन कलंत्री हे यशस्वी उद्योजक म्हणून जिल्ह्यात सर्व परिचित आहेत. रामलिंग हिरेमठ बॅंकेचे संचालक आहेत. गोविंद महेंद्रकर, माधव गौंड यांनीही आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून मुखेड नगरीचा नावलौकिक केला आहे. सदरील कार्यक्रम यशस्वी साठी माजी उपनगराध्यक्ष जगदीश शेठ बियाणी यांनी अथक परिश्रम केले.