वर्ष सरताना..

आपल्या जगण्यात , आपल्या असण्यात , आपल्या घडण्यात हजारो , लाखो हात आणि हृदय असतात. जसं चित्रपटात नायक नायिका लक्षात रहातात पण त्यामागे लाखो लोकांचा हात असतो आणि म्हणूनच आपण वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत असतो पण तरीही बऱ्याच जणाना वाटतं , हे माझ्यामुळे झालं.. जिथे मी येतो तिथे कृतज्ञता भाव रहात नाही आणि जो सतत कृतज्ञता व्यक्त करतो त्याची जडणघडण वेगळीच असते.. आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही मेहनतीने घडत असली तरीही त्यामागे अनेक व्यक्ती , घटना , भगवंत , निसर्ग , कर्म , या सगळ्याचा मोठा प्रमाणात हात असतो.. माझ्याही बाबतीत हेच आहे.. सफाई कामगार , वेश्या , तृतीयपंथी , अंध अपंग , वाचक , चाहते , मित्रपरिवार , नातेवाईक , ट्रोल करणारे , साहित्य , चांगल्या वाईट घटना , भगवंत , निसर्ग , माझे आईबाबा सगळ्यामुळे मी आहे आणि त्यांनीच मला जगायला शिकवलं.. आजपर्यंत मनापासून जगले आणि माझ्या जगण्यातुन अनेक जण इनस्पायर झाले.. कायमच सकारात्मकतेने सगळ्या घटनांकडे पाहिलं हेही अनेकांना फॉलो करत.. प्रजापिता ब्रह्मकुमारी.. सरश्री ( हॅपी थॉट्स) , भगवद्गीता , भागवत , इस्कॉन , अनेक कीर्तनकार , अनेक वक्ते , अनेक कवी , लेखक यातुन मी अनेक गोष्टी वेचत आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला प्रत्येकाने भरभरुन दिलं.. त्या सगळ्याची मला जमेल तशी कृतज्ञता व्यक्त करत असतेच पण अनवधानाने कोणाबद्दल व्यक्त व्हायचं राहिले असेल तर या सरत्या वर्षात मी कृतज्ञ आहेच आणि आभारी आहे… नवीन वर्षात नवीन पुस्तकेही वाचकांना वाचायला मिळणार आहेत. त्यासाठी लिखाण करत आहे… भरपूर व्यायाम करायचा आहे. भरपूर वाचायचे आहे… नवीन तुमच्याकडून शिकायचे आहे. वाचक अनेक विषय सुचवतात म्हणुन मी विवीध विषय हाताळु शकते.. भरपूर भटकंती करायची आहे..
भरपूर फोटो काढायचे आहेत.. सामाजिक काम करायचय..
भरपूर मोठी लिस्ट डोक्यात आहे त्यामुळे तुमची साथ हवीच आहे.. तुम्ही आहात म्हणुन मी आहे आणि भगवंत आहे म्हणुन आपण सगळे आहोत. भगवंताने तुम्हा सगळ्याना सुखी , निरोगी ठेवावं हीच सदिच्छा..
असच प्रेम करत रहा आणि नवीन वर्षाचं प्लॅनिंग करायला सुरुवात करा..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि या वर्षात कोणाला दुखावलं असेल तर मनापासून माफी मागते..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *