*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*
नगरपरिषद संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कंधार येथे वाचनसंकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत मा.अनुष्का शर्मा प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपरिषद कंधार यांच्या मान्यतेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे दि.३० व ३१ डिसेंबर रोजी असे २ दिवसीय नविन ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहेत.
यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे अविरत वाचक कांबळे माधव कंधारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच मोहम्मद रफीक सत्तार सह ग्रंथपाल व उपस्थित वाचकांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण केले.यानंतर मोहम्मद रफीक सत्तार यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या उपक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली.यावेळी मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कर्मचारी दत्ता माधव ऐनवाड,मिलिंद वसंतराव महाराज,श्रीमती कमलबाई शिवाजीराव जाधव,श्रीमती वंदना संजय फुले,यांनी परिश्रम घेतले.