(कंधार: विश्वंभर बसवंते)
“एका घरात दोन पक्ष चालत नाहीत”, हे माझ्यासाठी नसून, ते केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,मा.खा.रक्षाताई खडसे, यांच्या घराविषयी मा.आ. अमर राजूरकर यांनी बोलले आहे. माझ्या घरासाठी त्यांनी बोलले नसून, अजून त्यांच्या अंगावरची हळद निघाली नाही, तर त्यांना भाजप पक्ष काय कळणार आहे? असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना कंधार – लोहा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
कंधार येथील नगरेश्वर मंदिर येथे दि.१०जानेवारी रोजी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत चिखलीकरांचे नाव न घेता एका घरात दोन पक्ष चालणार नाहीत, असे वक्तव्य केले होते, या विषयावर दि. ११ जानेवारी रोजी कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार चिखलीकर यांना या विषयावर पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले ती वक्तव्य माझ्या घरासाठी नसून मा.आ. राजूरकर यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेतेमंडळींच्या घराविषयी बोलून त्यांना छेडले आहे. त्यामुळे माझा काहीही संबंध नाही.तसेच नांदेड जिल्ह्यात भाजप पक्ष कोण वाढवला आहे, हे नांदेड जिल्ह्यातील नेत्यासह जनतेला माहित आहे. हे काँग्रेस पक्ष नाही, तर भाजपाच्या पक्षात असल्याची त्यांना आठवण राहावी, तसेच त्यांच्या नेत्याला त्यांनी काय बोलावे, हे अगोदर विचारून घ्यावे, ते कंधार – लोहा मतदारसंघात पक्ष वाढविण्यासाठी येत नाहीत तर चिखलीकर यांना विरोध करण्यासाठी येतात असेही पत्रकारांशी बोलताना आमदार चिखलीकर म्हणाले.