क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतीय स्त्रीयांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक सौ.वर्षाताई भोसीकर

 

*कंधार  (प्रतिनिधी)*
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतीय स्त्रियांसाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक
आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई भोसीकर यांनी प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय, कंधार येथे आयोजित अभिवादन सभेमध्ये बोलताना केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील मुलींचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संजय शिक्षण संस्थाचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर,श्रीमती प्रतिभा बडवणे, सौ.मनीशा कुरुडे,सौ.शामा पाटील शेख यास्मिन आदींसह विद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना सौ.वर्षाताई
म्हणाल्या की,ज्या काळामध्ये स्त्रीयांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, समाजामध्ये स्त्रीयांना सर्व स्तरांमध्ये उपेक्षित ठेवल्या जात होते.त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून त्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या.स्वतः अंगावर दगड माती झेलून त्यांनी मुलींना शिक्षणाचे पवित्र कार्य त्या काळामध्ये सुरू केले.त्यामुळे समाजामध्ये स्त्रीयांना मानाचे स्थान मिळाले. आज स्त्री पुरुष समानतेमध्ये सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे योगदान आहे. आजच्या युगामध्ये स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करू लागली आहे नसून पुरुषांपेक्षाही अधिक वरचढपणे राष्ट्रपती पदापासून ते सैन्यदलापर्यंत स्त्रीयांची मजल पोचली आहे. हे सर्व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे घडले असे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा बडवणे यांनी केले.तर आभार सौ शामा पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *