जि.प. प्रा. शाळा केरूर या शाळेच्या प्रयोगाची राज्यस्तरासाठी निवड

मुखेड: ( दादाराव आगलावे)

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केरुर येथील विद्यार्थ्यांचा नांदेड येथे संपन्न झालेल्या 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण असा “बहुउद्देशीय संगणक” या प्रयोगाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने प्राथमीक गटातून जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळवून या शाळेची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

या प्रयोगात सलमान निजाम शेख व यश चांदू सोनकांबळे हे होते. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यात शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पांचाळ, मार्गदर्शक श्री हिरामण आडे, विज्ञान विषय शिक्षिका
सौ.रेखा तमशेटटे (साधू) यांनी तसेच शाळेतील श्री हणमंत चांडोळकर, श्री तुकाराम गुंडे, श्री धनराज कानवटे, सौ.संगिता चिंदे व सौ. अनुसया धडे या सर्वांनी परिश्रम घेतले. शाळेच्या यशाबदल पं. स. मुखेडचे गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम, केंद्रप्रमुख शिवाजीराव येवतीकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री यशवंत नरवाडे व पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ सर्व शिक्षक संघटना यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *