जिवनात यशस्वी होण्यासाठी आचार विचार आणि संस्कार या  त्रिसुत्रीचा अवलंब करणे आवश्यक  – माजी नगराध्यक्षा तथा संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ.अनुराधा केंद्रे यांचे प्रतिपादन

 

कंधार ; प्रतिनिधी

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार येथे आज 24 जानेवारी रोजी  ” आनंद नगरी ” विद्यार्थी पालक सुरेश गित्ते यांच्या हस्ते उदघाट्न करून साजरी करण्यात आली . दरम्यान दि २३ जानेवारी रोजी स्कुल डे साजरा करण्यात आला . त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंधार नगरपालीकेच्या माजी नगराध्यक्षा तथा संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ अनुराधा केंद्रे मॅडम यांनी मार्गदर्शन केले . जिवनात यशस्वी होण्यासाठी आचार विचार आणि संस्कार चा  त्रिसुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले .

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जे जी केंद्रे सर, एच के केंद्रे सर, जि टी गुट्टे सर, ए टी गित्ते मॅडम, सि बि जाधव सर, फिरदोस शेख सर,के पी आगबोटे सर व्ही डी चव्हाण सर,बि एस मुंढे सर,के जी देशमुख सर, सेवक ईबू केंद्रे विध्यार्थी व पालक उपस्थित होते .

 

 

स्वयंशासन दिन उत्साहात 

#स्कुलडे #school_day
महात्मा फुले विद्यालय संभाजीनगर कंधार या विद्यालयात school day स्वयंशासन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी #कंधार नगरपालीकेच्या माजी #नगराध्यक्षा तथा #संत_गाडगेबाबा_शिक्षण_संस्थेच्या #संचालिका सौ .#अनुराधा_केंद्रे मॅडम यांनी मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक जे जी केंद्रे साहेब  ,महात्मा फुले प्राथमिक शाळा मुख्याध्यापक वाघमारे डी .जी आदीसह स्कुलडे मध्ये सहभागी विद्यार्थी मुअ व शिक्षक उपस्थित होते . सुत्रसंचलन व आभार  जि टी गुट्टे यांनी केले 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *