धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
आज दि. ०७ मार्च रोजी माझे स्नेही प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे सरांचा जन्म दिवस. प्रथमतः सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
“जे जे भेटे भुत,
ते ते मानिजे भगवंत ! ”
आपण सर्व जण हे ऐकून आहोत.
पण गझलकार डॉ. मुकुंद राजपंखे यांच्याकडे पाहताच…
“जे जे भेटे ऱ्हदय,
ते ते मानिजे महोदय !”
असं वाटतं.
मुळात ‘महोदय’ हा शब्द एका विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट प्रसंगी वापरतात. किंबहूना हा शब्द ‘अर्जात’, ‘कार्यालयीन अर्जात’ वापरतात. विषयाची मांडणी होताच, विषय लक्षात आणून दिल्यानंतर लगेचच जी अधिकची माहिती अर्जात नमूद केली जाते, तत्पूर्वी हा शब्द सन्मानाने आणि आवार्जुन वापरला जातो. हा झाला एक भाग.
दुसरा भाग म्हणजे अर्जातील किंबहुना शासकीय कार्यालयापुरता मर्यादित आणि अर्जापुरता बंदिस्त असणारा शब्द, खऱ्या अर्थानं प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे यांनी मुक्त केला.सरांनी या शब्दाला बाहेर आणले. एवढेच नाही तर ‘महोदय’ या शब्दाला ‘व्यवहारात’ आणि ‘बोलीत’ आणले आहे. स्वत:च्या जिभेवर रुळवले आहे. म्हणूनच सर प्रत्यक्ष भेटीत कुणालाही, ‘मास्टर’, ‘सर’ , ‘गुरुजी’, ‘साहेब’ असे संबोधन न वापरता फक्त आणि फक्त ‘महोदय’ हे संबोधन वापरुन थेट संवाद साधतात.
सरांचा ‘महोदय’ हा लाडका शब्द ऐकून मी स्वतः आणि इतर जण सुद्धा आपल्या बोलण्यात आणि संवादातून हा शब्द वापरत आहेत. मी पण यास अपवाद नाही आहे. म्हणजे हा शब्द जणू ‘मन्याडीपासून मांजरसुंभ्यापर्यंत जीभेवर रुळला आहे’. याचं श्रेय अर्थातच फक्त आणि फक्त प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे यांच्याकडे जाते.
दि ०७ मार्च २०२५ रोजी सरांचा जन्म दिवस आहे. त्यानिमित्ताने सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! तसं सरांची ओळख गत २०-२२ वर्षांपासूनची आहे. पण सरांनी गतवर्षी ‘गारपीट’ या माझ्या कविता संग्रहाला छान ‘प्रस्तावना’ लिहिली आणि स्नेहबंध अधिकच घट्ट झाला आहे. दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्याच यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांतील इंग्रजी विभागात मोबाईल कमेऱ्यात घेतलेला एक फोटो.

▪
प्रा. भगवान कि. आमलापुरे,
फुलवळ
द्वारा- कै. शं. गु. ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी, ता. परळी, वै. जि. बीड.
पीन क्रमांक : ४३१५१५
संपर्क : ९६८९०३१३२८

