हा विषय लिखाणाचा होवू शकतो ??
माझ्या पुरूष मित्रांनो तुम्हीही आवर्जून वाचा बरं का… कारण काल तुमच्यापैकी कोणाच्या तरी बायकोने मला वैयक्तिक मेसेज केला होता.. तो मेसेज असा होता ,” माझा नवरा तुमच्या साडी फोटोवर मेसेज करतो , पण मला कधीही छान म्हणत नाही.. माझे सिलेक्षन छान नाही कि कलेक्षन छान नाही ??… हाहाहा.. कदाचित त्यांनी केलेले नवरा नावाचे सिलेक्षन चुकले असावे… मला वैयक्तिक इतके फनी मेसेजेस येतात कि हसून हसून लोटपोट होते.. आणि मित्रांनो मला मेसेजेस कराच पण तुमच्या बायकोलाही सुंदर दिसते असं म्हणा रे.. तिचाही हक्क आहे.. तिलाही अजून छान दिसायला हुरूप येईल.. आता पावसाळी साडी सेल लागेल तेव्हा गाडीत बाहेर थांबण्यापेक्षा दुकानात जाऊन साड्या घ्यायला तिला मदत करा.. भले तुमची लुडबुड तिला आवडणार नाही तरीही प्रेमाने मदत करा.. सचिनला मी सोबत नेत नाही for your kind information..हेहे… मी बऱ्याचदा कुठल्यातरी रसिक मित्राला घेउन जाते कारण घरोघरी त्याच परी.. नवरा हा नवराच असतो रे.. आणि मित्र मित्रच..
आता साडी कलेक्षन कडे वळूयात.. काल एका महिलेने मेसेज केला होता.. आमच्याकडे कोल्हापूरमधे प्लेन साड्या मिळत नाहीत.. तुम्ही कुठून घेता ??.. मी कधी ol मागवते आणि काही वेळा भलताच रंग येतो तोही आवडतो कारण तुम्ही साडी कशी नेसता आणि कॅरी कशी करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.. आणि सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे ब्लाउज हटके हवेत म्हणजे साधी साडी सुध्दा खूपच एलीगंट दिसते.. मी पुण्यात दुकानात जाऊन खरेदी करते.. बरेच दुकानदार माझे वाचक , फॉलोवर्स आहेत त्यामुळे स्पेशल ट्रीटमेंट मिळते.. माझ्याकडे दोनच प्रकारचे कलेक्षन आहे.. एक तर प्लेन साड्या नाहीतर हेव्ही रीच सिल्क आणि पैठणी.. कार्यक्रमाना ह्या साड्या मी नेसते.. ( साडी घालत नाही बरं का. तर नेसायची असते ) नाहीतर शर्टपॅंट नेसावा लागेल… आणि फिरायला जाताना म्हणजे खास फोटो रिल्ससाठी प्लेन साड्या वापरते.. मधला साड्यातला प्रकार माझ्याकडे नसतो..
आपल्याला उंची , फिगर नुसार ब्लाउज आणि साड्या सिलेक्ट कराव्यात म्हणजे दिसायला छान दिसतात.. आता येणार माझ्या आवडीच्या विषयाकडे तो म्हणजे उत्तम आहार आणि व्यायाम कारण उत्तम फिगर असेल तर कुठलेही कपडे चांगलेच दिसतात त्यामुळे आधी त्याच्यावर काम करा.. कारण कपड्यात शरीर कोंबण्यापेक्षा सुंदर बांधेसूद शरीरावर कुठलाही अगदी साधा ड्रेसही छान दिसतो.. संध्याकाळी ६ च्या आत डिनर त्यानंतर तोंडाला कुलूप आणि सकाळी तासभर वेगवेगळ्या पद्धतीने आलटूनपालटुन व्यायाम .. its that simple..
लिखाणाचा हाही विषय होवू शकतो कि नाही पहा बरं.. जशी डिमांड तसा सप्लाय..https://www.facebook.com/sonal.s.godbole
https://www.instagram.com/godbolesonal?igsh=Y3dvazd0Y3UzcW84
https://youtube.com/@sonalcreations2874?si=jP6Ft3TECNOcUi_n
#SonalSachinGodbole
#Reel_Master
#YouTuber
#Publishersonalcreations
#AnimalCommunicator
#SonalCreations – my YouTube channel
#SexEducation as a counselor
#ProudToBeATranswoman – book
#Beyondsex – novel
#Fantasies_And_Beauties_In_Sex – novel
#Anira – novel
#Indradhanu – book
#13000km – my life journey book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marital_affairs
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi – चारोळ्यासंग्रह
#Abhisarika – काव्यसंग्रह
#Counselor
#Nutritionist

