लाखो फेसबुक युजर्संनी घेतलं कपल चॅलेंज!#couplechallenge

#couplechallenge

काल फेसबुक उघडलं आणि एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण व्हावी अशा पद्धतीनं सगळीकडे जोडप्यांचा कपल चॅलेंज घेत असल्याचा धुमाकूळ सुरू होता. आपल्याकडे कोणता ट्रेंड कधी येईल, तो पसरेल किंवा लोकप्रिय होईल याचा नेम नसतो. मोठ्या चढाओढीत महाराष्ट्रातल्या सुंदर सुंदर जोडप्यांचे विविध विषयांवरील, कारणान्वये फोटो पहावयास मिळाले. जे सहभागी झाले नव्हते ते फोटो पाहत बसले.
‘जीवनात जोडीदार मनासारखा भेटला ना की आयुष्य सुंदर व्हायला वेळ लागत नाही’ हे विधान अनेकजणांना आवडले.
ते काॅपी पेस्ट करून आपापले फोटो शेअर केले. या चॅलेंजमध्ये तुलनेने बायकाच आघाडीवर होत्या. भारतीय संस्कृतीत रुढी परंपरा याशिवाय कोणताही ट्रेंड नव्हता. परंतु या बाबतीत एकमेकांविषयी प्रेम दाखवत, पती-पत्नीमधील नात्याचा पवित्रपणा, सांस्कृतिक अधिष्ठान याचे संदर्भ देत अनेकांनी फोटो शेअर केले. तरुणाईच्या ट्रेंडमध्ये आम्हीही सहभागी असे म्हणून महाराष्ट्रातील जुन्या जाणत्या, शहाण्यासुरत्या लोकप्रिय लोकांनीही हे #couplechallenge स्विकारलं होतं. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेही फोटो दिसले. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी असे बरेच सोशल मीडियावर ट्रेंड येत असतात परंतु मी सहसा शेअर करत नाही….. पण आज आपणही करून बघूया म्हटलं, असे म्हणत आपल्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला.

भारती बलकवडे या सद्गृहिणीने अत्यंत भावनाशील आणि महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. मैत्रिणींनो घेतले हे चॅलेंज! माझ्यासाठी हे चॅलेंज चॅलेंज म्हणून नाहीच आहे मला सर्वात मोठा आनंद म्हणजे बलकवडे आहेत म्हणजेच माझी लाईफ लाईन आहे कुठल्या जन्मीचे काय पुण्य असेल माहीत नाही परंतु देवाने मला एक परफेक्ट लाइफ पार्टनर दिला म्हणून किती आभार मानावे आणि कसे म्हणावे हे मला खरंच सुचत नाही.‌ आणि परफेक्ट एकमेकांसाठी बनलो आहोत. आता तुम्हाला असं वाटेल आमचे आता फक्त आणि फक्त प्रेमाचेच संबंध आहेत. असा अजिबात नाही की एक दिवस भांडण नाही असा तर दिवस पण नाही आणि एक दिवस अबोला आहे असा दिवस सुद्धा आमच्या आयुष्यात नाही आमच्या लग्नापेक्षा एक वर्ष अधिक आमच्या मैत्रीला पूर्ण झाले आणि आम्ही एकमेकांच्या हृदयात जास्त जगतो असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीचे पाच वर्ष हे कायम माझ्यापेक्षा मोठे होते आणि मी यांच्या पेक्षा लहान. नंतर ते बरोबरच कधी रूपांतर झाले ते आम्हाला कळले सुद्धा नाही. आणि आता तर कधीकधी मी त्यांच्या आईची जागा घेते किंवा तसे होण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असतं ; आपल्या वडिलांप्रमाणेच आपली काळजी घेणारे आपल्या आयुष्यात कोणीतरी असावं. माझ्या आजारपणात हे नेहमीच माझ्या वडिलांच्या भूमिकेत असतात काळजी घेतात. कधी ओरडतात खरेतर बलकवडे मुळेच मी जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला शिकले माणसांना ओळखायला शिकले चांगल्या वाईटाची जाणीव मला यांच्यामुळे झाली म्हणूनच अल्लड भारतीचे रूपांतर एक खंबीर भारती सहनशील भारतीत झाले आहे. अजून खरंच खूप काही आहे आमच्या जोडीबद्दल लिहिण्यासारखा एक कपल चॅलेन्ज मला असं वाटतं आयुष्यभरासाठी एकमेकांनी एकमेकांसाठी घ्यायला हवं आणि ते खऱ्या अर्थाने निभावून एकमेकात सामवावे हेच खरे जीवन आहे.💞💞💞💞💞💞💞💞💞

सगळ्यांनी सुरू केलं तर आपण का मागे राहावं बा….! आपल्याला तर निमित्त हवं असतं, असं म्हणत लाखोजण पुढे आले परंतु काही जणांनी टीका केली. त्यात सिंगल पोरंच जास्त होते. हे नेमकं कधी सुरू झालं याचा वेळ काळ माहीत नसला तरी Try it ही सुविधा फेसबुकनेच उपलब्ध करून दिली होती. गतवर्षीही सिनेजगतातील हौशींनी हे चॅलेंज घेतलं होतं. इन्स्टाग्रामवरतर याचा महापूरच ओसंडून वाहत होता. यात विधुर, विधवांनी दुःख व्यक्त केलं. ज्यांच्यात वितुष्ट आलं आहे, एकमेकांना त्यांनी टाकलं आहे, घटस्फोट झाला आहे किंवा होणार आहे अशा भांडकुदळ्या लोकांनी या ट्रेंडकडे तिरकस नजरेने पाहिलं. नुकतेच लग्न न झालेल्या जोडप्यांना ही सुवर्णसंधी होती तर ज्यांचे अजुनही जुळले नाही किंवा वय झाले नाही अशा धुंदफुंदांनी आपला जळफळाट करुन घेतला. त्याची काही उदाहरणे :
१) आता आम्ही सिंगल मुलांनी काय जिव द्यायचा का रताळ्यांनो ! 🤕🤕 २) हेच खरं #single_challenge #अतिसिंगलता #couplechallenge जो like ,React करणार नाही त्याची बायको दुसर्यासोबत पळून जाईल .ज्याची gf आहे त्यांचे ब्रेकप होईल आणी सिंगल असणाऱ्यांना आयुष्यभर मिंगल होऊ नये असा श्राप लागेल.‌ ३) चॅलेंज असावं गुपचूप गर्लफ्रेंड सोबतचा फोटो टाकण्याचं…४) काही जोड्या #नरकातंच बनलेल्या असतात! जशी ही #खैसालानव्हतीबायको #अन्हडळीलानव्हता_नवरा! ५)तमाम सिंगल्याना जळवणाऱ्या ट्रेंड तयार करणाऱ्या झुक्याचा जाहीर #णिषेध #मिपनसिंगल. फक्त सिंगल्यानं like करावं…६)बंद करा राव तो जोडप्यांच्या फोटोंच्या ट्रेण्ड 😏आम्ही कोणासोबत काढायचा फोटो 🙄 ही काही मोजकी उदाहरणे आहेत. यांना उत्तरेही अगदी मिश्किलपणे मिळाली आहेत.

ट्विटरवर या ट्रेंडवर टीका झाली. १)देश मुश्किल में है…और पढ़ी लिखी मॉडर्न पीढ़ी…सारी चैलेंज, कपल फ़ोटो चैलेंज, ओल्ड फेसबुक फोटो चैलेंज लोगो को देकर बकवास ट्रेंड सोशल मीडिया मे फैला रहे है! देश मुश्किल में है जिम्मेदार नागरिक बनो गरीबों की मदद करो, नहीं कुछ तो कम से कम पीएम केयर या सीएम रिलीफ फंड में. २)कपल चॅलेंज टाकायला वेळ आहे शेतकऱ्याच्या लेकराला पण वावरात उभं पीक पाण्यानं खराब होऊन मोड फुटलीत ते टाकू वाटल नाही किंवा नुकसान भरपाई मागावं वाटली नाही… कदाचीत यामुळेच शेतकरी वरचेवर खचतोय. नवरा बायकोतील एक संवाद फार महत्त्वपूर्ण वाटला. ३) नवरा : कुटुंबातील एक जण तरी संकटात असेल, तर खांद्याला खांदा लावून आपण त्याच्या आरोग्याची काळजी घेतो. आपला भारत देशपण आपलं कुटुंबचं आहे. त्यातील बरेच जण आज अडचणीत आहेत. अशावेळी त्यांना आधार देणं गरजेचं आहे ? की ग्रुपवर मिळणारी चॅलेंज पूर्ण करणं. शेवटी तुझी चॉईस. बायको :देश आधी ४) नवरा : हेही दिवस जातील. मात्र येणारी पिढी जेव्हा प्रश्न करेल की, जगभरात ज्या संकटाने मृत्यूचं थैमान घातलं होतं, त्यावेळी तुम्ही काय करत होतात ? तेव्हा काय उत्तर देणार ? साडी चॅलेंज खेळत होते ? कपल सेल्फीसाठी कपडे प्रेस करत होते ? की स्वादिष्ट पदार्थाचे फोटो अपलोड करत होते ? ५) टाळ्या थाळ्या वाजवायला सांगितल्याबद्दल त्याचा भावार्थ लक्षात न घेता मुर्खात काढणारे अतिशहाणे आता कोरोनामुळे देश संकटात असताना आपले फारच प्रेम ऊतू जात असल्याचे दाखवत आहेत. देश मरत आहे आणि ह इकडे काहीच झाले नसल्यासारखे अतिआनंदानं सण साजरे करीत आहेत, मेंढरं कुठले? ६मैंने व्हाट्सएप/फेसबुक पे कपल पिक्चर चैलेंज की चैन तोड़ दी फ्रेंड्स । मैंने फ़ोटो नही डाली और समाज को इस चैलेंज रूपी कोरोना से बचाया 🤣😂🙏

काही आंबेडकरवादी फेसबुकींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईच्या संदर्भात लिहिले.‌ हे चॅलेंज त्यांनी अशा प्रकारे स्विकारले. #couplechallenge 💙best couple in the world💙 💙We Are….Because He Was..!! 💙 Jay bhim jay bharat..🇮🇳 ज्या काळात भारत देशात स्त्री पुरुष भेदभाव केला जात होता त्या काळात देशाची प्रगती मोजण्याची फुटपट्टी काय असावी याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की , ‘ ज्या देशात स्त्रीयांची आर्थिक व सामाजिक प्रगती झाली असेल तोच देश प्रगत मानला पाहीजे’. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव न करता समान कामाला समान दाम कायदा आणला. जो पती एखादया पत्नीला मानसिक अथवा शारिरीक त्रास देत असेल तर तिला त्याच्यापासुन फारकत घेण्याचा अधिकार त्यांनी मिळवुन दिला. महिला कामगारांचे संरक्षण कायदा , महिला प्रसुती पगारी रजेचा ठराव असे विवीध कायदे व ठराव संसदेत मांडून ते त्यांनी ते संमत करुन घेतले.

अमेरिकेसारख्या विकसित देशातही महिलांना मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला होता. मात्र भारतीय महिलांना भारतीय संविधानातून मतदानाचा हक्क देवुन त्यांचे सबलीकरण करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने भारत देशातील समस्त स्त्रीयांचे उद्धारकर्ते झाले. खेद एवढ्याच गोष्टीचा वाटतो की, ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या स्त्रीयांच्या उद्धारासाठी रात्रंदिवस जागून कष्ट केले ,पुरुषसत्ताक मानसिकतेच्या विरोधात जाऊन स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवुन दिले. या कार्यात त्याना वेळोवेळी साथ त्यागमूर्ती आई रमाई यांनी दिली. त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती आई रमाई यांच्या कार्याची जाणीव भारतातील बहुसंख्य महिलांमध्ये क्वचितच असल्याचे दिसून येते. “मानवतेच्या कल्याणासाठी पती-पत्नीने केलेल्या असीम त्यागाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती आई रमाई यांना कोटी-कोटी त्रिवार वंदन..!!!” # याला म्हणतात-#couplechallenge! हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.आजकाल आॅनलाईन शिक्षणाचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात फोफाला आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईसारखे फुले दांपत्याबाबत कुणी काही लिहिलेले आढळले नाही.

हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून सर्वत्र लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, इन्स्टाग्राम, अशा इतर ‘सोशल नेटवर्क’वर देखील लोकप्रिय होताना दिसत आहे, सोशल नेटवकिंग साईटवर एखादी माहिती पोस्ट केली जाते, माहितीच्या सोबत आपणास # चिन्हाला जोडून काही शब्द लिहिलेले आढळतात, त्यास ‘हॅशटॅग’ असे संबोधले जाते. जी माहिती दिली जात आहे, त्या माहितीचा विषय कोणता आहे? यावरून लक्षात घेऊन ते हॅशटॅग दिलेले असतात. शब्दाच्या सुरवातीला ‘#’ हे चिन्ह वापरलयास हॅशटॅग तयार होतो, तयार झालेला हॅशटॅग निळ्या रंगात दिसतो, दोन शब्द किवा अधिक शब्द वापरायचे झाल्यास ते शब्द एकत्र जोडून लिहावे लागतात, हॅशटॅग वापरताना दोन शब्दांमद्धे अंतर दिल्यास पहिल्या शब्दाचा हॅशटॅग तयार होतो, त्यामुळे शब्द एकत्र जोडून लिहिणे गरजेचे असतात.

‘#’ हे पाऊंडचं चिन्ह म्हणून ओळखलं जातं, पण सोशल मिडियावरील वापरामुळे सध्या या चिन्हाला पाऊंडपेक्षा हॅशटॅग या नावाने जास्त जास्त ओळखलं जातं. सोशल मीडियावर जेव्हा हे हॅशटॅग टाकले जातात तेव्हा ते निळ्या अक्षरात दिसतात. पण जर शब्द हॅशटॅगशिवाय असेल तर तो काळ्या रंगात दिसेल. हॅशटॅग वापरलेल्या शब्दाची एक वेगळीच लिंक तयार होते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तो हॅशटॅग किती लोकांनी वापरला हे तुम्हाला दिसून येतं, सोशल मीडियाच्या सर्च बॉक्समध्ये जर तो हॅशटॅगसह शब्द शोधलात तर जगभरातील लोकांनी त्याचा वापर करून लिहिलेल्या गोष्टी वाचायला मिळतात, पर्यायाने हॅशटॅगमुळे माहिती लिहिलेली माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. उदा. – कोणत्याही शब्दाच्या आधी हॅशटॅगचं चिन्ह वापरलं जातं आणि नंतर बनतो हॅशटॅग. समजा विकिपीडिया हा नुसता शब्द आहे पण या शब्दाच्या पुढे # हे चिन्ह लावलंत तर ‘#विकिपीडिया’ असा हॅशटॅश तयार होईल, आणि दोन शब्द वापरायचे असल्यास ते जोडून लिहावे लागतात ‘विकिपीडिया’, ‘संपादक’ या दोन शब्दांचा हॅशटॅग बनवायचा झाल्यास तो ‘#विकिपीडियासंपादक’ असं तयार होईल. आपण वापरलेला हॅशटॅग जर पूर्वी वापरला गेला नसेल आणि पहिल्यांदा एखाद्याने तो वापरला असता त्या हॅशटॅगचे तुम्ही निर्माते होता, पण या हॅशटॅगचे प्रथम उपयोगकर्ता म्हणून जरी कोणी असेल तरीदेखील कोणतीही व्यक्ती तो हॅशटॅग वापरू शकते. समंधीत हॅशटॅगचा वापर जितकी जास्त लोकं करतील तितकाच तो हॅशटॅग प्रसिद्ध होत जाईल.

राजकिय घडामोडी असो किंवा मनोरंजन विश्वातील अपडेट ट्विटरवर नेहमीच प्रत्येक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी ट्रेंड होत असतात. असाच ट्विटरवर ट्रेंड होणाऱ्या हॅशटॅगनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड झाला. ठाकरे सरकारची मुघल राजशी तुलना करणाऱ्या व्यक्तीविरोधात मुंबईत तक्रार दाखल झाल्यानंतर हा हॅशटॅग ट्रेंड झाला. माजी क्रिकेटपटू युवराजसिंग यांच्या बाबतीत ट्विटरवर #युवराजसिंहमाफीमांगो हा हॅशटॅग ट्रेंड झाला. रोहित शर्मासोबत युवी लाइव्ह चॅट करत होता. यावेळी युवराज सिंगने मस्करीमध्ये ‘भंगी’ असा आक्षेपार्ह शब्द उच्चारला होता. त्या शब्दामुळे एखाद्या समाजाचा अपमान होऊ शकतो, किंवा त्यांचा अपमान झाल्याचे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे ट्विटरवर #युवराजसिंहमाफीमांगो हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. सोशल मीडियावर जर एखाद्याकडून चूक झाल्यास त्याला ट्रोल केलं जातं. तसा एक ट्रेंडच तयार होतो आणि अत्यंत वेगाने व्हायरल होतो.

बऱ्याच सर्वेक्षणानुसार असं लक्षात समोर आलं आहे कि , सध्याची तरुणपिढी हि नशेच्या आहारी गेली आहे . हि सवय शरीरासाठी , आरोग्यासाठी अतिशय घातक आहे . या गोष्टींवर निर्बंध घालण्यासाठी तरुणाईला शोभेल असा उपाय केला गेला आहे . संत गुरमीत रामरहीम सिंग ह्यांनी ट्विटरवर #नशोंसेआजादी नावाने एक उपक्रम राबवला आहे . ह्या उपक्रमाला फार मोठा प्रमाणात पाठिंबा असून सध्या हा उपक्रम ट्रेंडिंग आहे. तरुणपिढी जेव्हढी बेरोजगार आहे, आहे तेवढीच ती नशाबाजीच्या आहारी गेली आहे. बेरोजगारीसंदर्भात देशाच्या विविध भागातून सूर उमटतो आहे. गेल्या ९ सप्टेंबरला याच विषयाला धरून रात्री ९ वाजता ९ मिनिटं हा ट्रेंड चालवण्यात आला. या मोहिमेला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. यानुसार आपापल्या घरी वीजपुरवठा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर, ट्वीटरवर ९ वाजता ९ मिनिटं ट्रेंड होऊ लागलं. देशातल्या असंख्य तरुणांनी तसंच अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात ट्वीट करायला सुरुवात केली. यामुळे हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. कंगना राणावत प्रकरण बाजूला पडून सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला. लोकांनी हातात मेणबत्ती घेतल्याचे फोटो शेअर केले. बुधवारी रात्री ११ वाजेपर्यंत या हॅशटॅगसह दहा लाखाहून अधिक ट्वीट करण्यात आले होते. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मेणबत्ती पेटवून तरुणांना पाठिंबा दिला.

मेरा आंगण, मेरा रणांगण’ अशी भूमिका घेत भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी काळे मास्क, काळे शर्ट घालून काळे फलक झळकावत राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनावरून सोशल मीडियात भाजपला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. भाजपच्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडला. #महाराष्ट्रद्रोहीBJP हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड बनला. अवघ्या काही तासांत हा हॅशटॅग वापरून तब्बल एक लाखाच्यावर ट्विट करण्यात आलं होतं. यात भाजपाच्या आंदोलनाची एकप्रकारे खिल्लीच उडवण्यात आली होती. साेशल मीडियावर अत्यंत सक्रिय असलेले पंतप्रधान नरेंद्र माेदींनी मागे एका साेमवारी रात्री आश्चर्याचा धक्का देत आपण साेशल मीडिया सोडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. रात्री ८:५६ वाजेच्या ट्विटमध्ये ते म्हणाले, ‘येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम व यूट्यूब साेशल मीडिया अकाउंट्स सोडण्याचा विचार करतोय.’ यानंतर तर्क-वितर्कांना ऊत आला. पाठीराख्यांनी त्यांना असे न करण्याचा आग्रह केला. रात्री १२ वाजेपर्यंत ‘#NoSir’ टाॅप ट्रेंडवर गेले. बहुतांश युजर्सच्या मते, साेशल मीडियावरील विखाराने उद्विग्न होऊन मोदींनी ही इच्छा व्यक्त केली होती.

लग्न समारंभाच्या हंगामात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वेडिंग इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देत लग्नास परवानगी दिल्यानंतर वेडिंग प्लॅनर्स देखील नवीन संकल्पना घेऊन आले आहेत. लग्नाची जुनी परंपरा परत आली असून, केवळ जवळच्या नातेवाईकांनाच बोलवत आहेत. घराच्या छतावर, लॉन अथवा गार्डनमध्ये कार्यक्रम करत आहेत. आता लग्नात लाईव्ह स्ट्रिमिंग, मास्क, सॅनिटायझर देखील सवयीचे झाले आहे. वेडिंग प्लॅनर्सचे म्हणणे आहे की कोव्हिड-१९ नंतर लग्नाच्या जुन्या परंपरा परतत आहेत. मायक्रो वेडिंगची नवीन संकल्पना ट्रेंडमध्ये असून, लोक मोजक्याच नातेवाईकांना लग्नात बोलवत आहेत. घराच्या अंगणातच लग्न करत आहेत. डेकोरेशनमध्ये देखील कमी खर्च करत आहेत.

लग्न समारंभाच्या हंगामात कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे वेडिंग इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये सूट देत लग्नास परवानगी दिल्यानंतर वेडिंग प्लॅनर्स देखील नवीन संकल्पना घेऊन आले आहेत. लग्नाची जुनी परंपरा परत आली असून, केवळ जवळच्या नातेवाईकांनाच बोलवत आहेत. घराच्या छतावर, लॉन अथवा गार्डनमध्ये कार्यक्रम करत आहेत. आता लग्नात लाईव्ह स्ट्रिमिंग, मास्क, सॅनिटायझर देखील सवयीचे झाले आहे. वेडिंग प्लॅनर्सचे म्हणणे आहे की कोव्हिड-१९ नंतर लग्नाच्या जुन्या परंपरा परतत आहेत. मायक्रो वेडिंगची नवीन संकल्पना ट्रेंडमध्ये असून, लोक मोजक्याच नातेवाईकांना लग्नात बोलवत आहेत. घराच्या अंगणातच लग्न करत आहेत. डेकोरेशनमध्ये देखील कमी खर्च करत आहेत.

नेमकं ट्रोलिंग करण्याचे कारण काय असू शकतं?
नेटकरी ट्रोलर मंडळी कोणाचा, कधी आणि कसा ट्रोल करतील हे काय सांगता येत नाही. मागे एकदा अगदी तसेच झाले. एबीपी माझाच्या ज्ञानदा कदम या वृत्तअँकर बाबतीत झाले असे कि, हल्ली पुर्ण जग कोरोनामुळे बेजार झालेले आहे आणि भारतात ही लॉकडाऊन झाले आहे, त्यामुळे सर्व जण घरीच आहेत आणि कार्यक्रमाचे ही शूटिंग होत नसल्यामुळे टीव्हीवर फक्त बातम्या पहिल्या जातात. मराठी बातम्यासाठी आपण सर्व जास्त करून एबिपी माझा पाहतो आणि त्यामुळे जास्त करून एकाच वृत्तअँकरला पाहून पाहून (तसेच लॉक डाउनमुळे ट्रोलकरी मंडळींना दुसरे काही ट्रोल करायला मिळाले नाही) तिला ट्रोल करण्यात आले आणि ट्रोल करणाऱ्यांनी कोणत्याही प्रश्नावर, मुद्यावर मुद्दाम असे विचारले कि, “काय सांगशील ज्ञानदा ?” आज काल सोशल व्हायरल होण्यासाठी एवढं कारण पुरेस आहे. या सोबत एक हश टॅग पण जोडला गेला #कायसांगशीलज्ञानदा? हे वाक्य होते याच वहिनी वरील दुसरे अन्कर प्रसन्न यांच्या तोंडचे. अशा प्रकारे या मॅडम सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

व्हॅलेंटाईन डे चा ट्रेंड सोशल मीडियाचा धुमाकूळ तेवढा नव्हता त्या काळात मोठ्या प्रमाणावर पसरला होता. जागतिक स्तरावर व्हॅलेंटाईन डे मोठय़ा खुशीत, धामधुमीत साजरा करण्यात येतो. आपल्याकडे तो कमीअधिक प्रमाणात लपूनछपून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईनला आपल्याकडे होणारा विरोध लक्षात घेऊन तरुणाईने त्यावर एक उपाय शोधला आहे. तरुणाईने केवळ १४ फेब्रुवारीचा एक दिवसाचा व्हॅलेंटाईन डे मोडीत काढण्यासाठी आता सात दिवस व्हॅलेंटाईन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यास सुरुवात केली. त्यातील पहिला दिवस सात फेब्रुवारीला ‘रोझ डे’ म्हणून साजरा करण्यात आला. आठ फेब्रुवारीला प्रपोज डे, नऊ फेब्रुवारीला चॉकलेट डे, १० फेब्रुवारीला टेडी डे, त्यानंतर प्रॉमिस डे, आजचा हग डे, बुधवारी किसिंग डे आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे. त्यामुळे संस्कृतीच्या नावावर प्रेमी युगुलांना त्रास देणाऱ्या सनातन्यांचा पुरता फज्जा उडाला.

भारतात मोठ्या प्रमाणावर हा दिवस प्रेमी युगलांकडून साजरा केला जातो. तथापि, ‘व्हॅलेन्टाईन्स डे हा आपल्या संस्कृती विरूद्ध आहे’ असे म्हणून भारतातील बजरंग दल व इतर कट्टरता वादी हिंदू धार्मिक संघटनांना याला विरोध करतात आणि प्रेमी युगलांना धमक्या देत मारहाण करतात. असे असतानाही व्हॅलेंटाईन डे भारतामध्ये जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहे. राज्यात हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना-भाजप युतीची पहिल्यांदा सत्ता आली, त्यावेळी सांस्कृतिक परंपरेच्या नावाखाली शिवसेनेने व्हॅलेंटाइन डेला कडाडून विरोध केला. हातात दांडुका घेवून युवक-युवतीच्या मागे धावणारे शिवसैनिक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांनी अनुभवले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेत असताना विद्यार्थी सेनेकडून व्हॅलेंटाइन डेला जोरदार विरोध केला. मात्र युवासेनेची धुरा ज्यावेळी आदित्य ठाकरेंनी स्वीकारली. त्यावेळी व्हॅलेंटाईन-डेला असलेला शिवसेनेचा विरोध मावळला. त्यामुळे व्हॅलेंटाइन डे साजरा करताना निर्माण होत असलेली भीती आता लोप पावली आहे. परंतु असे असले तरी आजही दरवर्षी कोणत्या न कोणत्या पक्षाकडून या दिवसाला विरोध केला जातो. दहा-बारा वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेच्या पाश्चात्य संस्कृतीमुळे तरुण पिढी बिघडत चालल्याचा आरोप सातत्याने व्हायचा. आजही काही लोकांकडून हा आरोप होतो. मात्र तरुणांकडून व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्याचे पाहायला मिळते. व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रियकर-प्रेयसीसाठी नाही तर आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीसाठी आहे, अशी भावना आपल्यात निर्माण झाली आहे. महाविद्यालयांमध्ये तर हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा होतो. केवळ हा दिवसच नाही, तर संपूर्ण व्हॅलेंटाईन व्हिक तरुणाई मोठ्या उत्साहात साजरा करते.

जून महिन्यात काही दिवसांपासून अनेक महिला इंस्टाग्राम, फेसबुक सहित सोशल मीडियावर ब्लॅक आणि व्हाईट मोनोक्रोम मध्ये फोटो पोस्ट करत आहेत. तुम्हालाही असे अनेक मॅसेज आले असतील, ज्यात असे चॅलेंज करून फोटो पोस्ट करायला सांगितला जात असेल. #WomenSupportingWomen अशा हॅशटॅग सह हे फोटो पोस्ट केले जात आहेत, आता हा नेहमीप्रमाणेच एखादा ट्रेंड आहे की यामागे काही अर्थ आहे याच्या कुतूहलापोटी आम्ही थोडा रिसर्च केला असता काही महत्वाची माहिती समोर आली आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार हा ट्रेंड साधारण एक ते दीड आठवड्याच्या आधी सुरु झाला आहे. ब्राझीलच्या च्या पत्रकार Ana Paula Padro यांनी हा ट्रेंड सुरु केला होता. यामागे जगभरात महिलांनी महिलांसाठी पुढाकार घेऊन पाठिंबा द्यावा अशी भावना आहे. सोशल मीडिया Influencers च्या माहितीनुसार, यामागे जगभरात महिलांच्या विरुद्ध घडलेल्या अन्यायाची काही उदाहरणे आहे.

२०१७ च्या ऑक्टोबरमध्ये सोशल मिडियावरून व्हायरल झालेली लैंगिक शोषणाच्या विरोधातील मोहीम प्रामुख्याने परदेशी आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होती. त्यातूनच हार्वे विन्स्टीन या हॉलिवूडमधील बड्या निर्मात्याच्या भोवती गंभीर आरोपांचे जाळे विणले गेले. बिल कॉस्बीसारखा नामवंत कलाकार गजाआड झाला. आपल्याकडे हे सारे केवळ हॉलिवूडशी निगडीत असल्याचा समज करून घेऊन पाहिले गेले. खरेतर महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधातील आवाज ही या ‘मी टू’ मोहिमेची ओळख होती. त्या आंतरराष्ट्रीय प्रकरणात आपल्याकडील प्रियांका चोप्रा आदी मोजक्याच लोकांनी मते व्यक्त केली आणि काही महिन्यांच्या आत हा आवाज क्षीण बनला. अर्थात भारतात मोठ्या प्रमाणात घडणाऱ्या बलात्काराच्या विरोधात उठवलेला आवाज, कार्यालयीन परिसरात शालीनतेला भंग करणाऱ्या कृत्यांना आळा घालण्यासाठी उचललेल्या पावलांना या मोहिमेशी जोडता आले तर ते योग्य ठरेल.

ऑक्टोबर २०१७ मध्येच अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग (#) वापरला.
या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू (#MeToo) वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.
१८ ऑक्टोबर २०१७ ला ऑलिम्पिक जिमनॅस्टिक्स खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नासर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असरे नास्सर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी ॲन्थनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्याविरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नंतर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले. यानंतर अनेक व्यवसायांतील बड्या धनदांडग्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडिओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली.

महिलांवर होत असलेल्या लैंगिक अन्यायाला वाचा फोडणारी ‘मी टू’ मोहीम बारा वर्षांपासून सुरू आहे. परंतु ती व्हायरल झाली ती ट्वीटर या माध्यमामुळे. त्यानुसार, भारतात एका मुलाखतीवरून या आवाजाला नवे बळ मिळाले असे दिसते. आता देशभरात या मोहिमेने चांगलेच मूळ धरले असून अवघ्या काही दिवसांतच त्याचे व्यापक रूप दिसले. गतकालीन तारका तनुश्री दत्त हिने परदेशाहून परतल्यानंतर एका मनोरंजन वाहिनीला मुलाखत देताना दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार नोंदवली होती, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे सांगितले. तेथपासून सुरू झालेली ही #मीटू मोहीम पुन्हा चित्रपट क्षेत्रापुरती मर्यादित आहे, असे वाटत असताना गेल्या तीन चार दिवसांत त्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले. त्यात चित्रपट क्षेत्रातील काही दिग्गज नावांबरोबरच पत्रकारिता क्षेत्रातीलही मोठी नावे उघड व्हायला सुरुवात झाली. त्याचे पडसाद अन्य क्षेत्रातही दिसतील, याबद्दल शंका वाटत नाही. आरोप झालेल्या मुस्लीम महिलांच्या तलाकविषयक धोरण असो की समलैंगिकता आणि स्त्रीपुरुष संबंधात असलेले गुन्हेगारीचे अंग बाजूला करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय, आपण समाजातील नेहमी दृष्टीआड करू पाहणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्यास अधिकाधिक सक्षम होत आहोत याचेच ते द्योतक आहे. या ‘#मीटू’च्या मोहिमेकडे तसेच पाहायला हवे. यात ज्यांना आतापर्यंत आपल्यावरील अत्याचाराच्या दु:खात कुढत राहावे लागले, त्यांना मोकळेपणे व्यक्त होता यावे. अत्याचार करणाऱ्यांना योग्य शिक्षा व्हायला हवी. त्यासाठी या मोहिमेला थिल्लर स्वरूप प्राप्त होऊ नये आणि याकडे जुने हिशोब चुकते करण्याची संधी म्हणून पाहिले जाता कामा नये. तसे करणाऱ्यांनाही दंड व्हायला हवा. कारण सन्मान केवळ स्त्रीचा किंवा पुरुषांचा असतो असा नाही. तो सगळ्यांचाच असायला हवा. तथापि, याला स्त्री विरुद्ध पुरुष असे स्वरूप प्राप्त होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. आरोपामुळे स्त्री असो वा पुरुष, दोघांचीही तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही आयुष्ये उद्ध्वस्त होतात. अखेर स्त्री आणि पुरुष यांचे मैत्रीपूर्ण सौख्य आणि एकत्रित कार्यामुळे समाज बळकट होणार आहे. त्याला बाधा येऊ न देण्याची काळजी घ्यायला हवी.

एक वर्षात भारताती मीटू चळवळ मरणासन्न झाली. नाना पाटेकर, गौरांग दोशी, विकास बहल, सुभाष कपूर, अन्नू मलिक, साजिद खान, सुभाष घई, कैलाश खेर, राजकुमार हिरानी, विनोद दुआ, आलोकनाथ, रजत कपूर वगैरेंना मीटू चळवळ जेव्हा जोरात होती तेव्हा काही कामे मिळत नव्हती. ती मिळणे सुरू झाले. नाना पाटेकर यांच्या बाबतीत मुंबई पोलिसांनी कोर्टाला ‘चौकशी बंद’चा रिपोर्ट सादर केला. तनुश्री दत्ता परदेशात जिथे होती, तिथे निघून गेली. जेव्हाजेव्हा भारतात येते तेव्हातेव्हा पत्रकारांना ‘मी शेवटपर्यंत लढणार आहे’ची बातमी देऊन परत जाते.

ज्या गौरांग दोशीवर फ्लोरा सैनीने आरोप केले होते, त्याला अबू धाबीच्या शाही फॅमिलीकडून मोठी गुंतवणूक मिळाली. २०१९ सालच्या सुरुवातीलाच ‘सुपर 30’ चित्रपट ज्या कंपनीने बनवला तिने ‘अंतर्गत चौकशी चालू आहे’चा बहाणा करून दिग्दर्शक विकास बहाल याला ‘क्लीन चिट’ दिली. आमिर खानसारख्या बड्या चित्रपट निर्मात्याने सुभाष कपूरला आपल्या चित्रपटांत घेतले आहे. आमिर खानच्या कृतीचा परिणाम असा झाला की मीटूचे सर्वात गंभीर आरोप ज्याच्यावर आहेत तो अन्नू मलिक याच्यासाठी ‘लाॅबीइंग’ सुरू झाले. त्याला संगीत स्पर्धांमध्ये परत आणण्यात आले. अन्नू मलिकवर कोणत्याही कोर्टात दावा उभा न झाल्याचे या स्पर्धांच्या आयोजकांनी दाखवून दिले.

साजिद खानवर तीन अभिनेत्रींनी आरोप केले होते. त्याचे पुन:स्थापन करण्यावे प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांची सुरुवात तमन्ना भाटियापासून झाली. चंकी पांडेनेही त्याला ‘क्लीन चिट’ दिली. जाॅन अब्राहम साजिद खानच्या एका चित्रपटाची निर्मिती करीत आहे. सुभाष घई हे जॅकी श्राॅफ आणि अनिल कपूर यांच्याबरोबर ‘रामचंद किशनचंद’ नावाचा चित्रपट बनवत आहेत. कैलाश खेर हे सरकारी कार्यक्रमांतून गाणी गात आहेत.
राजकुमार हिरानी ‘मुन्नाभाई’ मालिकेला तिसरा चित्रपट बनवण्यात दंग आहेत. बाकी आरोपींचे वकील रेंगाळत चाललेल्या कोर्टांच्या कारवायांनंतर आरोपींची सोडवणूक करण्याच्या बेतात आहेत. कंगना राणावतने काम मिळण्यासाठी हिरोसोबत झोपावे लागते असे म्हटले होते. आता अनुराग कश्यपला घेरण्यात आले आहे.

येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवाती पासून ते पुढील महिनाभर सर्वत्र एक पोस्ट व्हायरल होताना दिसणार आहे, ती म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ (No Shave November). मागील काही वर्षात परदेशात चालू असणारा हा ट्रेंड अलीकडे भारतातही आवर्जून पाळला जातो. वास्तविक ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेंड नसून त्यामागे एक सामाजिक उपक्रम आहे. संपूर्ण महिनाभर पुरुष मंडळींनी दाढी न करता त्यासाठी लागणारे पैसे कर्करोगग्रस्त (Cancer Patient) रुग्णांना देण्याची संकल्पना या ट्रेंडमध्ये आहे.या सोबतच पुरुषांचे आरोग्य जपण्याच्या हेतूने सुद्धा ही मोहीम जागृकता निर्माण करण्याचे काम करते. सामान्यपणे आपल्याकडे सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की तो ट्रेंड फॉलो करण्याची पद्धत आहे. यामुळे बहुधा त्या ट्रेंडची पूर्तता होते पण त्यामागील मूळ उद्देश काय आहे हे समजून घेतल्यास या आपण फॉलो केलेल्या ट्रेंडचा उपयोग आणि त्यामुळे मिळणारे  समाधान ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य होतात. चला तर मग आजपासून सुरु होणाऱ्या या नो शेव्ह नोव्हेंबर चा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया.

१९९९ साली मेलबर्न येथील काही तरुणांनी एकत्र येऊन कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही मोहीम सुरू केली. या मोहिमेचा मुख्य हेतू असा होता की कॅन्सरग्रस्त रुग्णांचे केस गळू लागतात. तर चेहऱ्यावर वाढणाऱ्या केसांसाठी खर्च होणारे पसे एक महिनाभर बाजूला टाकून ते कॅन्सर संदर्भातील मोहिमेला दान करायचे. हे पैसे कॅन्सरग्रस्तांना आणि पुरुषांना होणाऱ्या आजाराच्या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांना दान केले जातात. या संस्थेला २००४ पासून मोव्हेंबर हे नाव देण्यात आले. यातलं मो म्हणजे मुस्टॅचेस म्हणजेच मिशा आणि व्हेंबर हे नोव्हेंबर महिना दर्शवणारे शब्द एकत्र करून हा शब्द शोधण्यात आला. कालांतराने या मोहिमेतून कॅन्सर रुग्णांच्या सोबतच पुरुषांच्या वाढत्या आत्महत्येसाठी सुद्धा काम करण्यास सुरुवात केली आहे. अधिक माहितीसाठी no-shave.org या संकेत स्थळावर नक्की भेट देता येईल.

दरम्यान, या महिन्यात आपण हा ट्रेंड फॉलो करत असताना छान दाढीवाला लूक बनवून स्टाईल करू शकता. तुम्हीही हा ट्रेंड फॉलो करणार असाल तर #NoShaveNovember या हॅशटॅगचा वापर करून सोशल मीडियावर आमच्यासोबत फोटो शेअर करायला विसरू नका. अशी आहे सोशल मीडियावरची अजब गजब दुनिया. तुम्ही आम्ही यातून सुटण्याची शक्यता नाही.

गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
२३.०९.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *