(कंधार ; दिगांबर वाघमारे )
लोहा विधानसभा मतदारसंघातील कंधार तालुक्यावर नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट कोसळले असून, दि. 27,28 व 29 ऑगस्ट रोज शुक्रवारपर्यंत ढगफुटी होऊन, या आसमानी नैसर्गिक संकटातील ढगफुटीमुळे 23 गावातील घरात पाणी शिरले असून, मोठा पूर आल्यामुळे 8 गावातील संपर्क तुटला तर 81 जनावरे पुरात वाहून गेले असून, 68351 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाले व पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालय कंधार यांच्याकडून मिळाली आहे.
या अस्मानी संकटात काटकळंबा, लाडका, हळदा, दहीकळंबा, भूकमारी, धानोरा कवठा, चौकी महाकाया, मंगल सांगवी, गोणार, शेल्हाळी, चौकी धर्मपुरी, देवईचीवाडी, गुंडा, जाकापूर, चिखली, नारनाळी, आलेगाव, बारूळ, पेठवडज, औराळ, नंदनवन, शिरसी (बु.), येलूर, मंगनाळी या 23 गावांमध्ये पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.तर लाडका, मानसिंगवाडी, रुई, मोहिजापरंडा, गंगनबीड, शिरसी (बु.), फुलवळ, कंधारेवाडी येथे मोठा पूर आल्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे.
चिखली- 2 गाई, 2 वासरे, 2 बैल
घोडज- 20 म्हैस, 7 बैल, 4 गाई, कवठा – 2 गाय, 1 बैल, 1 वासरू
पातळगंगा- 8 शेळ्या
चिखलभोसी- 10 म्हैस, 1 शेळी, 4 गाय, 2 बैल, 4 वासरे
दुर्गातांडा- 2 गाय, 1 वासरू
पांगरा तांडा – 3 म्हैस, 2 गाय
कुरुळा 2 गायअसे एकूण 81 जनावरे वाहून गेले आहेत.
या ढगफुटीमुळे कंधार तालुक्यातील सर्व लहान- मोठे नाले व नदींना मोठा पूर आला असून, बहादरपूर येथील मन्याड नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे नदीकाठावरील नागरिक व शेतकऱ्यांनी नदी काठावर जाऊ नये असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नागरीकांना केले आहे.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समवेत तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी जगतुंग सागर व बाधित पिकांचा पाहणी दौरा करून, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आपणास भरीव मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सांगत पशुपालक व शेतकरी यांना मोठा धीर दिला आहे. त्याचबरोबर येत्या दोन दिवसातही अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी नदीकाठावरील लोकांनी सतर्क राहून, शक्यतो नदीकाठी जाण्याचे टाळावे असे आवाहन केले.
#flood #rainydays #rain #rainyweather #HeavyRainfall #ProtectFamily #rainfallalert #mahayutisarkar #help #Loha #nandedkar #kandhar #nanded
.
.
.
Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे Chandrashekhar Bawankule Dattatray Bharane NCPSpeaks_Official

