नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तपासनी अधिकारी रामपुरे सेवानिवृत
बिलोली :
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सगरोळी येथे कार्यरत व रामपुर (मजरा) ता.बिलोली येथिल तपासनी अधिकारी व्हि.बि.रामपुरे हे आज दि.३१ जुलै रोजी सेवानिवृत झाले आसुन त्याना सगरोळी येथे विविध शाखेच्या वतिने प्रदिर्घ सेवा निवृतीस निरोप देण्यात आले.
जिल्ह्यातील विविध शाखेमध्ये गेल्या तिस वर्षा पासुन सेवा बजावत आसताना व सध्या सगरोळी येथिल शाखेत जवळपास गेल्या १३ वर्षा पासुनच्या सेवाकार्यकाळात सगरोळी बँक शाखे अंतर्गत शेतकरी खातेदाराची थकीत कर्ज वसुली अथवा नुतन कर्ज मंजुरी प्रकरण आसतील आशा विविध कामा बाबत माञ शेतक-यांमध्ये व खातेदारांशी योग्य पध्दतीने विश्वासहर्तेची भुमिका निभावत संबधीत शेतक-यांशी कायमचा सलोखा ठेऊन आपला सेवा कार्यकाळ निष्कलंक यशस्वीपणे पार पाडलेल्या आशा या मनमिळावु वृतीच्या सेवा निवृती अधिका-यांचा शाखा सगरोळी,बिलोली,कुंडलवाडी ,कासराळी च्या वतिने व विविध सेवा सोसायटी,मिञ परीवाराकडुन दि. ३१ आँगस्ट रोजी शाखा सगरोळी येथे यतोचित सत्कार समारंभात सेवानिवृतीस निरोप देण्यात आले.यावेळी जिल्हा शाखा तपासनी अधिकारी एस.व्हि.जाधव कुंडलवाडी तपास अधिकारी ए.जी. साखरे, सगरोळी शाखा अधिकारी ए.जी. देशमुख बिलोली शाखा अधिकारी एस.जी.पटेल, सगरोळी सरपंच प्र.व्यंकटराव सिद्धनोड पञकार राजु पाटील शिंपाळकर ,गणेश गिरगावकर ,सगरोळी सेवा सोसायटी सचिव सायलु आंबेपोड आदमपुर सेवा सेसायटी चेअरमन अंबादास शिनगारे,कार्ला खु.चेअरमन बाबुराव देशमुख ,थडीसावळी चेअरमन संजयसिंग ठाकुर, मुतन्याळ चेअरमन सोमदास ,पी.बि.इबितदार ,सि.एच .वाघमारे, राजु पाटील लघुळकर ,गणेश पाटील केसराळीकर,शिवराज पा.शिंदे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.Attachments area