पालकांची लेखी परवानगी आवश्यक..!
मंबई ;
टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार शाळा-महाविद्यालये तसेच, अन्य शैक्षणिक संस्था १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मुभा देण्यात आली असून, निर्णयाची जबाबदारी राज्य सरकारांकडे सोपविण्यात आली आहे.
शाळा, महाविद्यालये, शिकवण्यांचे वर्ग १५ ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने सुरू करता येऊ शकतील. पण त्यापूर्वी शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापकांची सहमती गरजेची असेल. तसेच, विद्यार्थ्यांनी पालकांच्या लेखी परवानगीनेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.