सुनो सब स्त्री जाती
शस्त्र उठालो
मेहंदी छोडो
खडग उठालो
खुद हि अपना शिरीर बचालो
द्युत बिछाय बैठा है बलाक्तारी
मस्तक सब बिक जायेंगे
सुनो सब स्त्री जाती शस्त्र ऊठालो
अब कोई तुम्हे बचाने न आयेंगे
सरकारने महिला अत्याचार कायदा केलेला आहे पन पुरूष ऐकायला तयार नाहीत. बलाक्तार्याला
दिवसेंदिवस महिला वरील अत्याचार कमी होत नाहीत तर ते वाढतच आहेत अत्याचाराची हि मालिका वाढतच आहे सुशिक्षित समजल्या जाणार्या घरात किंवा मोठ्या हुद्यांवर काम करनारी ही पुरूष मंडळी घरच्या स्त्रीला आता सुध्दा पायातल पायतन समजतात. आतातरी महिलांना शस्त्र बाळगायला परवानगी द्यावी अशी सर्व महिलांची मागनी आहे.
मेणबत्ती पेटवनारे आता कुठे आहेत.ज्या लोकांना महाराष्ट्र असुरक्षित वाटत होता ते कुठे लपले आहेत त्यांनी ह्या विषयावर काहीही बोलू नये का?
आदिवासी आमदार खासदार नुसते बुजगावने च का ?
दिल्ली तील निर्भया ला मेणबत्ती पेटवनारे मनिषावर गप्प का?
महात्मा ज्योतिबा फुले,सावित्री बाई फुले डाॅ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महान महानायीका व नायक ह्यांनी समाजातील असमानता बंद व्हावी व स्त्रीला समान दर्जा मीळावा ती फक्त ऊपभोगाची वस्तू नसुन तीला सुध्दा तेवढाच अधिकार आहे हे पटवून दिले पन षुरूषी असंकारी मानायला तयार नाहीत डाॅ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या मुळे महिलांना त्यांचे हक्क मिळाले आणि त्याचे कायद्यात रूपांतर झाले.
देशात सतत अश्या घटना घडत असतात दिल्ली ची निर्भया, कोपर्डीची श्रध्दा हैद्राबाद ची डाॅ प्रियंका आणि आता हतसर मधील घटना मुंग्या येतात डोक्यात डोळ्यातुन अश्रू गालावरून वहातात
कसे मुलींना शिकवावे व कसे वाचवावे
बेटी बचाव बेटी पढाव सगळ कागदोपत्रीच का ?
ते कागदावर न राहता सत्यात उतरवण्यासाठी समाजातील सामाजिक महिला संघटना पक्षाच्या महिला आघाडीने हा प्रश्न जोर लावून धरला पाहि भरपुर संघर्ष करावा लागेल. नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी
आणि प्रत्येक ठिकाणी पुरूषी भावना किंवा पुरुषी अहंकार कमी करण्यासाठी शाळेत महाविद्यालयात सर्व ठिकाणी जनजागृती करने अभ्यासक्रमात समतावादी समाज निर्मातीसाठी काही प्रमाणात बदल करने शासकिय ठिकाणी जनजागृती करने चांगले कार्यक्रम ठेवने दाखवने व समाजात प्रबोधन करने हि काळाची गरज आहे.
बलात्कार झालेल्या मुलीचं आयुष्य उध्वस्त होतय ती ह्या दुनियेतून जाते. आणि आपल्याकडे गुन्हेगाराला शिक्षा मिळणं कठीण झाले आहे.
स्त्री म्हणून तीने जन्म घेतला व ती ह्या समाजाचा हिस्सा झाली पन तीला ह्या समाजातील लोकांनी कधीच ते स्थान दिल नाही ज्याची ती हकदार आहे.
ती फक्त चुल व मुल ह्या पुरतीच मर्यादेत ठेवली.आज काल थोडा समाजात बदल झाला आहे पन, स्री ला हिनं नजरेने पहाने टिंगल टवाळी करने तीच्या शरीरावराची वाईट शब्दाने वाच्चता करने आता सुध्दा बरेच प्रकार चालू आहेत.
स्त्रीया असो महाविद्यालयीन तरूनी असो ह्या प्रकाराला कंटाळलेल्या आहेत अश्या प्रकाराला आळा बसावा व पिडीतेला न्याय मीळावा म्हणून मोठ मोठे मोर्चे काढले जातात चार दिवस खुप लिहून येत आणि मग सगळे विसरून जातात.
मुलींनी महिलांनी कस राहायच ते समाज ठरवतो.
ती बघा कशी राहते हि शद्ब प्रथम घरातच कुनी तरी तीला बोलत आणि तीच खच्चीकरण तिथंच सुरू होत अंगभर कपडे घालून फिर, ओढनी नाही घेतली पदर, बुरखा किती किती तीची मुस्कटदाबी जसे ते मुलींना समजुन सांगतात तीच्यावर सारखी नजर ठेवली जाते अस मुलांच्या बाबतीत होत नाही त्यांना नाही समजुन सांगतील जात की समाजात कसा वावरला पाहिजे त्यांची विचारसरणी कशी असली पाहिजे समाजात कसा वागला पाहिजे हे सर्व बालमनाला सतत त्याच्या डोक्यात हे विचार बालपनापासुन किशोर अवस्थेत येईपर्यंत त्याच्या मनावर बिंबविले पाहिजेत. जसे तुम्ही मुलींना बिंबवता तुला हे बर दिसतं नाही तुला ते बर दिसतं नाही हे सर्व मुलांना पन सांगीतले पाहिजे मुलांना सारखं समजावले पाहिजे म्हणजे पुढे तो एक चांगल्या विचाराचा व मानुस बनेल आणि त्याच्या हातून काही वाईट घडनार नाही.
प्रत्येक ठिकाणी मुलीलाच चुकीच समजल जात ती काही तरी वेगळे वागली असेल म्हणून तीच्या सोबत असे घडले असा बोललं जात
प्रत्येक ठिकाणी मुलीच्या बाबतीत पुरुषी मानसिकता कधी समाज सावरनार ह्या विचारातुन.
सर्व विशेष अधिकार पुरूषांना का हवेत पुरूष सर्व मोकळे आणि स्त्रीया मात्र बंधनातच हि मानसिकता समाजाने बदलायला हवी
मुलींना अमक करू नये मुलींनी तमक करू नये खाली मान घालून जाव
लग्न करायच मुलगा पाहायला येतो तोच पसंती दर्शवीतो आता सुध्दा मुलींच्या आवडीचा विचार होत नाही तीची चर्चा अशी होते खुप मुल आली पन पसंत करत नाहीत आणि मग ती तिथेच मोडून पडते हि समाजातील विचारधारा पुर्ण पणे बदलली पाहिजे.
मुली चांगल्या नीट नेटके ड्रेस डिझाईनर कपडे घालून फिरु नये का?
तीला मन नाही का ? तीच्या मनाचा विचार केव्हा होनार?
का कधीच नाही होनार हे कुजके सडके विचार आता माझ्या माय सावल्यांनी बदलायला हवेत.
बलाक्तार झाला कि चार दिवस बोंब नंतर जैसे थे. बलाक्तारी मोकळे सांडा सारखे.
मुलींनी त्यांच्या सीमा ओलांडू नये. मुलींनी सीमा ओलांडणे म्हणजे पुरुषाला आमंत्रण देणे अशी जिथे मानसिकता बनवली जाते. तिथे बलात्कार ही सामान्य बाब असते.
अजूनही चौकात, पानटपरीवर आणि कुठे पन हे टोळकं ऊभ सार्वजनिक ठिकाणी मुद्दाम बलात्काराचा मुद्दा असाच बोलायचा आणि लोकांच्या मनातील विचार त्याच्या प्रतिक्रिया ऐकायच्या आणी मुलीची चुक होती स्वताचे मत बनवायच.
अशा नालायक मानसिकतेने समाज घडत नसतो पुरुषांनी आणि त्यांना घडवणाऱ्या स्त्रियांनी हे लक्षात घ्यायला हव
भावपुर्ण शिवांजली .
लेखिका कवयित्री साहित्यिक सा.कार्यकर्ता
सुरेखा रावणगावकर