कंधार ;
सध्या कोरोना महामारीच्या संकट समयी 22 मार्च पासून जनता संचारबंदी,लाॅक डाऊन,अनलाॅक मध्ये शाळा बंद कराव्या लागल्या.जवळपास सहा महिन्याचा कालखंड झाला. विद्यार्थी अन् शाळेचा प्रत्यक्ष भेटच झाली नाही.या वेळात भारतीय अर्थव्यस्था पार खिळखिळीच झाली.देशाचे अर्थशास्त्रच कोलमडले आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र व्यवस्थीत समजावे या साठी ज्यनिअर विभागाचे अर्थशास्त्राचे उपक्रमशील प्रा.तुळशिराजी चौथरे सर यांनी आपली कल्पकता वापरुन विद्यार्थ्यांना सहज अर्थशास्त्राचा आभ्यास करता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अर्थशास्त्राची स्वाध्याय पुस्तिका सहज अन् सोपी वापरुन 100 प्रतित स्वखर्चातून तयार केली आहे.प्रा.चौथरे सर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी चंदनासम झिजणारे आदर्श व्यक्तीमत्व या पुर्वी त्यांनी विविध उत्पादन व बाजारभाव त्यातून मिळणारा नफा-तोटा हे एका प्रदर्शन ज्यनिअर काॅलेज मध्ये भरवले होते.
त्या प्रदर्शनाचे उद्धाटन संस्था सचिव माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेबांच्या समर्थ हस्ते उदघाटन केले. सचिव साहेबांनी त्यावेळी प्रा चौथरे सरांचे कौतूक केले. दि 1ऑक्टोंबर 2020 रोजी विद्यालयाचे प्रधानाचार्य अनिल वट्टमवार सर व उप प्रधानाचार्य बाबुराव बसवंते सर यांच्या समर्थ हस्ते सरांचा उपक्रमा बद्दल योथोचित सत्कार करण्यात आला.प्रातिनिधीक स्वरुपात कु.वाखरडे पुजा,सकपाल प्रिया,वाखरडे वैष्णवी आणि वन्नाळे शुभम यांना वाटप मु.अ.साहेब व उप मु.अ.साहेबांच्या समर्थ हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर बंधु-भगिनी उपस्थित होते.
उर्वरित स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून सोशल डिस्टन्स व सॅनिटाजर वापर शासनाच्या नियमांच्या अधिन राहून बारुळ,कौठा,वरवंट,औराळ,नंदनवन,राऊतखेडा,काटकळंबा येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहेत.या अनोख्या विद्यार्थ्यांच्या हितकारक उपक्रमाचे बारुळ पंक्रोशितील पालक कौतुक करत आहेत.छसुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या वतीने उपक्रशिल प्राध्यापकांचे अभिनंदन