लाॅकडाऊन मध्ये करण्यासारखे वर्षानुवर्ष आरोग्यदायी आठवणीत राहिल असे अॉक्सीजन हब
– सरपंच महेश ढाकणे
कमी पाणी,कमी जागा,१० पट वृक्षवाढ आणि ३० पट आक्सीजन !================
अहमदपूर ( गोपाळ काळे ) तालुक्यातील ग्रामपंचायत येस्तार-पार येथे ‘१४ वा वित्त आयोग’ आणि ‘महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान’ या दोन्ही योजनांचा निधी एकञ करुन ३०x६० फुट एवढ्या जागेत साधारण १६ प्रजाती ३०० वृक्षांची लागवड १५ आॅगस्ट २०१९ रोजी केली.साधारण एक वर्ष या प्लांट ला पुर्ण होत असुन एका वर्षात वृक्षांची झालेली वाढ अतिशय समाधानकारक आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील येस्तार -पार येथील सरपंच महेश ढाकणे यांच्या संकल्पनेतुन वर्षानुवर्षे आठवणीत राहील असे झाडांच्या रूपाने ऑक्सीजन हब तयार करण्यात आले आहे त्या वृक्षलागवडीची पद्धत त्यांनी खालील प्रमाणे सांगीतली आहे १) ज्या ठिकाणी वृक्षलागवड करायची आहे तो जमिनीचा पृष्ठभाग साधारण हौद केल्यासारखा १ मिटर खोदुन घ्यावा,जास्त खोदला तरी चालतो.
२) खोलीकरण झालेल्या जागेत ७०% माती किंवा गाळ,२०% भुसा किंवा गुळी,१०% शेणखत,आणि १०० लिटर गोमुञाचे मिश्रण करुन खड्डा भरुन घ्यावा.
३) त्यावर १x१ मिटर चौकोन आखुन घ्यावा,ज्यात मोठे झाड,मध्यम झाड आणि झुडुप अशी ३ झाडांची लागवड करावी.आंबा,कदंब,बेल,कवठ,नांदुर्की,चाफा,जांभुळ,चिकु,जांभ,पारिजात,चिंच,कडुनिंब,कडीपत्ता,शेवगा,चंदन,कन्हेर,बकुळ,कांचन,नारळ,आवळा या व अशा विविध फक्त भारतीय जातींची लागवड करावी.
४) प्रत्येक झाडाजवळ बांबुची काठी रोवुन झाड सुतळीने हलकेशे बांधावे,जेणेकरुन वादळ पेलु शकते आणि झाडांना आधार मिळतो.त्याचबरोबर वृक्षलागवडीनंतर सदरील जागेवर पुर्णपणे सुका कचरा किंवा वाळलेले गवत/उसाचे पाचट याचा थर द्यावा,जेणेकरुन उन्हाची तिव्र किरणे जमिनिवर पडणार नाहीत आणि पाण्याचे बाष्पीभवन होणार नाही.पुढे याच आवरणाचा खात होतो.वर्षातीन दोनवेळा असे आवरण करावे.
५) वृक्ष शक्यतोवर भारतीय जातींच्या झाडांची लागवड करावी,त्याहुनही चांगला परिणाम साधायचा असेल तर आपल्या परिसरात ज्या झाडांच्या जाती पुर्वपार वाढत आलेल्या आहेत त्या झाडांटी लागवड करावी जेणेकरुन आपल्या मातीत ते जोमाने येतील आणि तिथे जैवविविधता वाढण्यास मदत होईल.पक्षी,फुलपाखरे,सरडे,लहान जीव तिथे सहवास करु लागतील.
६) सदरील ट्री प्लांट ला तारेचे किंवा ईतर कुंपन असणे गरजेचेच आहे.नाहीतर झाडे जगणे आणि टिकणे खुप कठीण आहे.
७) झाडांना ठिबक असेल तर उत्तम नाहीतर आठवड्यातुन २ वेळा भरपुर पाणी द्यावे.
मिञहो शासनाने मागील ७० वर्षात करोडो झाडे लावली माञ आजची परीस्थिती पाहता ती झाडे गेली कुठं ? हा प्रश्न पडतो.याला मुख्यत: जमिनीचा पोत,पाण्याचा अभाव,संरक्षण जाळीचा अभाव ही मुख्य कारणे आहेत.ज्यामुळे आज त्यातली १०% झाडे सुध्दा जगली नाहीत.
एक संकल्प करा आपल्या देशात साधारण ७ लक्ष ग्रामपंचायती आहेत.एका ग्रामपंचायतीने किमान ५०० झाडे ” मियावाकी मेथड ” प्रमाणे लावली तर करोडो वृक्षलागवडीचा संकल्प काही वर्षात पुर्ण होईल.मियावाकी मेथड प्रमाणे वृक्षलागवड खर्चीक असली तरी यामुळे होणारी झाडांची वाढ आणि झाडे टिकण्याचे प्रमाण ९९% आहे.ज्यामुळे कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याचा उद्देशही पुर्ण होतो.सर्वसाधारणपणे १० वर्षात जी झाडाची वाढ होते तेवढी वाढ या पध्दतीने वृक्षलागवड झाल्यास केवळ २ वर्षात होते.हे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.*
आपणही आपल्या खाजगी जागेत,शासकीय कार्यालय,शाळा,महाविद्यालय,ग्रामपंचायत,नगरपालिका,महानगरपालिका च्या मोकळ्या जागेत ” मियावाकी मेथड ” प्रमाणे वृक्षलागवड करा.आपल्या पुढील पिढीसाठी उत्तम आॅक्सीजन आणि परिणामी आरोग्य देण्याचा संकल्प करुया असे आवाहन सरपंच महेश तुकाराम ढाकणे येस्तार,ता.अहमदपूर, यांनी केले आहे