कंधार ;दिगांबर वाघमारे
मिनी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत नामदेव महाराज मठसंस्थान उमरज मार्फत शंभू कडा महादेव घागरदरा येथील मंदिर परिसरात गाईंचे गेली पन्नास वर्षापासून संवर्धन करण्यात येते. आज घडीला या गोसंवर्धन केंद्र मध्ये तब्बल २५० गाई तर तीन वळूंचा समावेश असून हा सर्व खर्च उमरज संस्थानाच्या माध्यमातून केला जातो.
संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरजच्या अंतर्गत शंभूकडा महादेव मंदिर घागरदरा परिसरात श्री संत नामदेव महाराज गोसंवर्धन केंद्र गेली पन्नास वर्षापासून चालत असून आज घडीला या व संवर्धन केंद्रात २५० गाई ३ वळू व ७० कालवड व गोरे यांचा समावेश आहे. त्यांची देखभाल करण्यासाठी पाच कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली असून यांच्या वैरणीच्या सोयीसाठी संस्थानाच्या २६ हेक्टर जमिनी पैकी चार हेक्टर जमिनीत गजराज यशवंत पारनेर या जातीच्या गवतांची लागवड करण्यात आली आहे,चार हेक्टर जमीन ही चराईसाठी राखीव ठेवण्यात आली आहे तर एक हेक्टर मध्ये व गोसंवर्धनासाठी लागणारे शेड उभारण्यात आले आहे.
*दुध विकले जात नाही ;
श्री संत नामदेव महाराज गोसंवर्धन केंद्रात २५० लालकंधारी गायींपैकी २५ गायी या दुधत्या, ५० गाई गाबण, १२३ दूध देणाऱ्या तर ५२ गायी भाकड आहेत.ज्या गायी दुभत्या आहेत त्याचे दुध काढून विकण्या ऐवजी वासरांना भरपूर पाजले जाते.
*उन्हाळ्याची गवत व चा-याची सोय
२०१९-२० उन्हाळ्याच्या मार्च, एप्रिल,मे व जुन या चार महिन्यांच्या काळात गोसंवर्धनासाठी ५० क्विंटल मका,३० क्विंटल गहू,१६ क्विंटल ज्वारी,८ क्विंटल सोयाबीन व ४० क्विंटल आली पेंड इ.खाद्याची खरेदी करण्यात आली होती.अशाच प्रकारे दरवर्षी शासनाचा एकही रुपया न घेता संबंधित गोवसंवर्धनावर संस्थानामार्फत लाखो रुपये खर्च केला जातो.आधूनिक यंत्य सामुग्री चा वापर करुन चा-याची विल्हेवाट लावली जाते.
* दुधाची गाय घेऊन जा
ज्या शेतकऱ्यांना गाईचे संगोपन होत नाही ते या शाळेत गाईंना आणून सोडतात तर ज्यांना दुधाची आवश्यकता आहे असे येथुन गायी घरी नेतात.पुन्हा दुध बंद झाल्यावर येथे आणुन सोडतात.जे शेतकरी मित्र गोसंवर्धन केंद्राला वैरण,चारा,कडा आणुन देतात त्यांना शेणखत मोफत दिला जातो.हे गोसंवर्धन केंद्र केवळ सेवाभाव या उद्देशानेच राबवीला जातो.
मुरघास पध्दतीने चारा साठवणूक
४ हेक्टर जमीनीत लागवड केलेल्या चाऱ्याला जास्त काळ टिकविण्यासाठी मुरघास पध्दतीचा वापर केला जातो या पध्दतीत ताडपत्री व मेनकापडाचा आधार घेतला जात असून केंद्रातील कडबाकुट्टीने चारा बारीक करुन या ताडपत्री व मेनकापडामध्ये भरुन वरुन माती अंथरुन ठेवल्यास हा चारा वर्षभरही टिकून राहू शकतो व पोषक व चविष्टही राहू शकतो.
* आधुनिकीकरण करणार
काळ बदल्या प्रमाणे नांदेड जिल्हात सर्वात सदरील गोशाळा मोठी आहे .सुमारे २५० गायीची संख्या आहे.त्यासाठी मानसाच्या हस्ते काय करण्या ऐवजी मानसाच्या निगराणी खाली आधुनिक मशीनच्या साहाय्याने भविष्यात करण्याचा मानस असल्याचे श्री संत एकनाथ महाराजानी सांगितले .
* शासनाच्या अनुदानाची गरज
गेल्या अनेक वर्षापासून सदरील आमच्या गोशाळेसाठी शासनस्तरावर अनुदान मिळावे म्हणून योग्य त्या कागदपत्र द्वारे पाठपुरावा केला .परंतु सत्तेतील राजकीय पुढारी आपच्या काही गोशाळेचा विचार करत नाहीत .शासना कडून मदत निधी मिळाल्यास भविष्यात शेतखतापासून बॉयोगँस,विद्युत ,गोमुत्रावर प्रक्रीया ,व औषधी आणि दुधाची निर्मीती आणि पदार्थ तयार करणे ,व सर्वात महत्वाचे नामशेष होत जात असलेले गोसंवर्धन करण्यासाठी संशोधन करण्यासाठी लाभ होणार आहे.त्यामुळे अनुदान मिळावे.या वर्षी मुखेडच्या आमदारानी आपली ताकत पणाला लावून एक कोटीचा निधी मिळवला आहे जर तो आपणास मिळाला असता तर पै पैसा शासनाचा कामाला आला असता असे श्रि संत एकनाथ महाराजानी सांगितले .
* आवाहन
श्री संत नामदेव महाराज व संवर्धन केंद्राकडून शासनाचा रुपयाही नघेता येथील गायींवर दरवर्षी दहा लाख रुपये खर्च केला जात असून या ठिकाणी असलेल्या कोणत्याही गायीचे दूध काढले जात नाही.माझी सर्व गोसंगोपन धारकांना विनंती आहे की,भाकड झालेल्या गायी खाटकाला न विकता आमच्या गोसंवर्धन केंद्रात आणून सोडाव्यात आम्ही त्यांचे मोफत संगोपन करु.
संत एकनाथ गुरू नामदेव महाराज
(मठाधिपती श्री संत नामदेव महाराज मठसंस्थान उमरज.)
****************** viodeo news *****