नांदेड –
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाकडून शिक्षक दिनानिमित्त आदर्श पुरस्कार प्राप्त सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य समन्वयक कवी बी.सी.पाईकराव तसेच पत्रकार रणजीत गोणारकर यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, तुषार पंडित, भाऊ पाईकराव, एकनाथ कार्लेकर, निवृत्ती कांबळे आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने देण्यात येणारा २०२० चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बी. सी. पाईकराव यांना मिळाल्याबद्दल आणि मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार पत्रकार रणजीत गोणारकर यांना मिळाल्याबद्दल सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. पाईकराव हे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील कै.बापूराव देशमुख मा.व उच्च माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर पत्रकार गोणारकर हे उमरी तालुक्यातील बळेगाव येथे कृष्णामाई माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी विद्यार्थी विकास, नवोपक्रम, गुणवत्ता विकास, सामाजिक कार्य, देशभक्ती आणि समाज यांत प्रेमभावना वाढविणे या बाबतीत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याबरोबरच कोविड-19 या आपत्ती जनक परीस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, सचिव पांडुरंग कोकुलवार, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, कार्याध्यक्ष मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, महिला समन्वयिका रुपाली वैद्य/ वागरे यांनी अभिनंदन केले आहे.