मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात कंधार शहरात चिंतन बैठक संपन्न ; सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगीती दिलेले मराठा आरक्षण लवकरच मिळणार – विनोद भैय्या पाटील

कंधार ; दिगांबर वाघमारे 


मराठा समाजाला दिलेले आरक्षणास केवळ राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे स्थगीती देण्यात आली .जेवढी राज्यातील सत्ताधा-याची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी विरोधी पक्षाची ही आहे.कारण केंद्रात त्यांचे सरकार असल्याने आरक्षणासाठी मदत करावी लागेल .राज्यात ठिकठिकाणी  चिंतन बैढका चालु असून निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असल्याने सकल मराठा सामाजाने धिर सोडू नये असे प्रतिपादन मराठा अरक्षण स्थगितीचे याचीकाकर्ते विनोद भैय्या पाटील यांनी कंधार येथे केले.

कंधार शहरातील नामदेव महाराज सभागृहात दि.(११) रोजी मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात चिंतन बैठकीचे आयोजन कंधार तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने  करण्यात आले होते.यावेळी मराठा अरक्षण स्थगितीचे याचीकाकर्ते विनोद भैय्या पाटील उपस्थिती सकल मराठा समाज बांधवाना मार्गदर्शन करताना बोलत होते.या बैठकीला  श्याम पाटील वडजे, बाळासाहेब औताड, संदिप फाजगे,कुणाल पाटील,अक्षय शिंदे , मधुकर महाराज बारुळकर ,बळीराम पाटील पवार आदी मान्यवर उपस्थित होती.


पुढे ते बोलताना म्हणाले की मराठा आरक्षणासाठी राज्यभर सकल मराठा समाजाच्या वतीने मुक मुर्चे काढून आंदोलने करण्यात आली होती.नुकतेच सर्वेच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्यभरातील मराठा समाजात असंतोष निर्माण झाले आहे.मराठा आरक्षण हे कायद्याच्या चौकटीत राहूनच देण्यात आले होते. सभागृहात मराठा आरक्षणाला मंजुरी देण्यात आली होती.पण सरकारच्या हलगर्जीपणा मुळे या अरक्षणाला स्तथगती देण्यात आली आहे.

जेवढी सत्याधाऱ्यांची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी राज्यातील विरोधी पक्षाची आहे. कारण त्यांचे केंद्रात सरकार असल्यांने अम्हाला आरक्षणासाठी मदत करावे लागेल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला.तसेच सकल मराठा समाजातील तरुणांनी टोकाचे पाऊल न उचलता सयंम बाळगावे .स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न  जाता अभ्यासात सातत्य ठेवावे निश्चितपणे आरक्षण मिळणारच आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यत सकल मराठा स्वस्थ बसणार नाही असे आश्वासनही यावेळी दिले.
या चिंतन बैठकीची प्रस्तावना बळीराम पाटील पवार यांनी केले तर आभार  नितीन कोकाटे यांनी मानले.यावेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे, अशोक पा.कदम,प्रदिप पा.हुंबाड, ओमराजे शिंदे,, नितीन पा.कोकाटे, श्रीकांत पा.बस्वदे सह आदीसह कंधार तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उ पस्थित होता.

*******

व्हिडीओ बातमी ;कंधार मराठा आरक्षण चिंतन बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *