कोरोनाची लस कधी येणार? कुणाकुणाला मिळणार?

कोरोना या जागतिक महामारी पसरविणाऱ्या विषाणूचा जन्म चीनमधल्या वुहान या शहरात झाला. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी वुहान शहरात संक्रामक कोरोना व्हायरस आढळल्याची पुष्टी केली. ३० जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ह्या विषाणूचा उद्रेक हा सार्वजनिक आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे जाहीर केले. ११ मार्च २०२० रोजी सदरचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे जाहीर करण्यात आले. २९ जानेवारी २०२० रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला.  महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये ९ मार्च २०२० रोजी आढळून आला. महाराष्ट्रातील पहिला बळी १६ मार्च २०२० रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला.

कोरोनाने जगभरात मृत्यूचे थैमान घातले आहे. भारतात थंडीच्या लाटेसोबतच कोरोनाची भयंकर लाट येण्याची शक्यता आहे अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या या महाभयंकर राक्षसाचा नि:पात करण्यासाठी लसीशिवाय पर्याय नाही हे आता पूर्णपणे सर्वच देशांच्या लक्षात आले आहे. कोरोना व्हायरसच्या लसींवर संपूर्ण जगभरातील वैज्ञांनिकांचे काम सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षींच्या मध्यापर्यंत कोरोना लसीचे व्यापक लसीकरण अशक्य आहे. सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणं अशक्य आहे. त्यासाठी आरोग्य तज्ज्ञांकडून सगळ्यात आधी लस कोणाला दिली जाणार हे निश्चित केलं जाणार आहे. जागतिक स्तरावरिल आरोग्य तज्ज्ञांच्या एका टीमने लसीच्या वितरणावर योजना तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. लस वितरणासंबंधी या मॉडेलला तज्ज्ञांनी ‘फेयर प्रायॉरिटी मॉडल’ असं नाव दिलं आहे. या मॉडेलचे उद्दिष्ट भविष्यकाळातील कोरोना संकटांना तोंड देण्याचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस पहिल्यांदा गंभीर आजारांनी पिडित असलेल्या लोकांना देण्यात यावी.
दुसऱ्या टप्प्यात आर्थिक स्थितीवरून लसीचे वितरण केलं जावं असे तज्ज्ञांचे मत आहे. या स्टेजमध्ये गरिबांना लस देण्यासाठी जास्त प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून गरीब कुटुंबातील लोक माहामारीचे शिकार होणार नाहीत. गंभीर आजारांनी पिडीत असलेल्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीचे वितरण कम्युनिटी ट्रांस्फरचा धोका लक्षात घेऊन करण्यात येणार आहे. जेणेकरून व्हायरसला एका देशातून इतर देशात पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. दरम्यान व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच देशांना लसीची आवश्यकता भासणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या योजनेनुसार प्रत्येक देशात ३ टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाला सुरूवात व्हायला हवी. त्यानंतर लोकसंख्या लक्षात घेऊन व्यापक लसीकरण केलं जावं. अमेरिकेतील पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटीचे प्रमुख शोध लेखक ईजेकीन जे. एमानुएल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लसीचे वितरण निष्पक्षतेनं करायला हवं. शारीरिक स्थिती नाजून किंवा गंभीर असलेल्या व्यक्तीला लस सगळ्यात आधी दिली जावी. यामुळे माहामारीकाळात वाढणारा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. 

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. याच दरम्यान कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी आपल्या सर्वांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. आहे. पुढच्या वर्षीच भारतात कोरोनाची लस मिळेल, अशी आशा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, “पुढच्या वर्षी सुरुवातीलाच भारतात कोरोनाची लस उपलब्ध येईल. एकापेक्षा अधिक कंपनीच्या कोरोना लशी उपलब्ध होतील. ही लस देशभरात कशी वितरित करायची याबाबत तज्ज्ञांची समिती योजना तयार करत आहे”  याआधी बोलताना डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतात  ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना असल्याचं सांगितलं होतं. जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली तेव्हा, उन्हाळा येताच अथवा गरमीच्या दिवसांत कोरोना नष्ट होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, तसे झाले नाही आणि आता जगभरात कोरोनाने जवळपास अकरा लाख लोकांचा बळी घेतला आहे. हा व्हायरस एअरोसॉल पार्टिकल्सच्या माध्यमाने गरमीच्या दिवसांत पसरत होता. आता श्वसन क्रीयेद्वारे बाहेर पडणाऱ्या थेंबांच्या माध्यमाने  थंडीच्या दिवसांत तो पसरण्याचा वेग अधिक वाढेल. या थेंबांच्या संपर्कात आल्याने कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता एका ताज्या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे. हे संशोधन नॅनो लेटर्स जर्नलने प्रसिद्ध केले आहे.

या अहवालांत सांगण्यात आले आहे, की सोशल डिस्टंसिंगसाठी ज्या नियमांचे पालन केले जात आहे, ते पुरेसे नाही. या संशोधनातील एक संशोधक यानयिंग झू यांनी सांगितले, की हे थेंब सहा फुटांपेक्षाही अधिक दूर जातात हे त्यांच्या संशोधनातील अधिकांश प्रकरणांत दिसून आले आहे. एवढे अंतर अमेरिकेच्या CDCने (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. 

घर आणि इमारतीत वॉक-इन फ्रिज आणि कूलर अथवा जेथे तापमान कमी आणि आर्द्रता अधिक असते, अशा ठिकाणी हे थेंब सहा मीटरपर्यंत (१९.७ फूट) जाऊ शकतात. यानंतर ते जमिनीवर पडतात. अशात, हा व्हायरस काही मिनिटांपासून ते एक दिवसापर्यंत संक्रमक होऊ शकतो, असे झू म्हणाले.
गरमीच्या दिवसांत अथवा कोरड्या ठिकाणी या थेंबांची लवकर वाफ होते. असे झाल्याने ते व्हायरसचा भाग मागेच ठेऊन जातात. नंतर ते दुसऱ्या एअरोसॉलबोरोबर एकत्र होतात. हे एअरोसॉल बोलणे, शिंकणे, खोकलल्याने अथवा श्वासाने सोडले गेलेले असतात. संशोधनाचे मुख्य लेखक लेई झाओ म्हणाले, हे अत्यंत छोटे आहेत. सर्वसाधारणपणे, दहा मायक्रॉनपेक्षाही छोटे आहेत. हे तासंतास हवेत राहतात. यामुळे श्वसनाच्या माध्यमाने हे मानवाला संक्रमित करू शकतात.

गरमीच्या दिवसांत एअरोसॉल ट्रान्समिशन अधिक धोकादायक असते, तर थंडीच्या दिवसांत थेंब. सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण जेथे राहतो, तेथील तापमान आणि हवामानाप्रमाणे आपल्याला आपला बचाव करावा लागेल. जेणे करून व्हायरसच्या पसरण्याला आळा घालता येईल. थंड आणि गरम खोलीत सोशल डिस्टंसिंग अधिक असायला हवे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

कोरोनाने  गेल्या  ७ ते -८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. आता भारतात हिवाळा सुरू होणार असल्यामुळे हिवाळ्यात कोरोनाचा प्रसार वाढणार?, कमी होणार? की आहे त्या स्थितीत राहणार असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सुपर कम्प्यूटरकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हायरसच्या प्रसार होण्यासाठी  आद्रतेचा खूप मोठं स्थान असते. त्यामुळेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते. याआधीही वैज्ञानिकांनी हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढण्याबाबत धोक्याची सुचना दिली होती. 

आद्रतेचा परिणाम व्हायरसच्या प्रसारावर होतो.  त्यामुळे अशा वातावरणात व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. फुगाकू नावाच्या जपानी सुपर कम्प्यूटरने दिलेल्या माहितीनुसार ६० टक्के आद्रतेच्या तुलनेत हवेत आद्रता कमी झाल्यास व्हायरसच्या कणांचा समावेश वाढण्याची शक्यता असते. या अभ्यासातून दिसून आलं की, खिडकी उघडणं किंवा व्हेंटिलेशन शक्य नसेल तर ह्यूमिडिफायर्सचा वापर करून व्हायरसचा धोका कमी करण्यावर भर दिला जाऊ शकतो. रिकेन आणि कोब युनिव्हर्सिटीकडून हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित लोकांच्या माध्यमातून व्हायरसचे कण हवेत पसरतात. फूगाकू सुपर कंम्प्यूटरने याबाबत विश्लेषण केले होते. या अभ्यासात दिसून आलं की, फेस शिल्ड, फेस मास्कप्रमाणे प्रभावी ठरत नाही. या अभ्यासानुसार बंद हॉटेल्समध्ये एकाचवेळी जास्त लोक गेल्यास किंवा एसी सुरू असल्यास कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. रिकेन आणि कोब युनिव्हर्सिटीकडून याआधीही याप्रकारचं संशोधन करण्यात आलं होतं. त्यातून दिसून आलं की ट्रेनमध्ये प्रवास करत असताना खिडकी उघडल्यास संक्रमणाचा धोका कमी होतो. 

कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात कोविड-१९ विरोधातील रोगप्रतिकारशक्ती किती दिवस राहते हे जाणून घेण्यासाठी अमेरिकी संशोधकांनी सहा हजार कोरोनाबाधितांचे नमुने घेतले होते. त्यामधून कोरोनामुक्त व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती किमान पाच महिन्यांपर्यंत राहते, असे समोर आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनामधील भारतीय वंशाच्या असोसिएट्स प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले होते.

या संशोधनादरम्यान, संशोधकांना दिसून आले की, SARC-CoV-2 विरोधात व्यक्तीच्या शरीरात विकसित होणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) सुमारे पाच महिन्यांपर्यंत राहतात. प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांनी सांगितले होते की, SARC-CoV-2 चा संसर्ग झाल्यानंतर शरीरामध्ये पाच ते सात महिन्यांपर्यंत उच्च दर्जाच्या अँटीबॉडी तयार होताना आम्ही स्पष्टपणे पाहिले आहे. 

जर्नल इम्युनिटी मध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये भट्टाचार्य यांनी सांगितले की, कोविड-१९ विरोधात रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत राहत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या अभ्यासाचा विचार केला आहे. त्यात आम्हाला दिसून आले की, शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाल्यानंतर किमान पाच महिन्यांपर्यंत ती टिकते. हे संशोधन प्राध्यापक जान्को निकोलिच जुगिच यांच्याकडून करण्यात आले  होते. 

भारतात कोरोनामुळे होत असलेल्या मृतांचे आकडे पाहिल्यास दिसून येईल की, मंगळवारी मगील  दीड महिन्यांपासून सगळ्यात कमी मृत्यूंची नोंद झाली होती. मंगळवारी देशभरात ७०६  कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर १.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. डायबिटिस, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार,  हृदयासंबंधी आजार असलेल्या लोकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. 
समोर आलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसने संक्रंमित झाल्यास या आजारांनी ग्रासलेल्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. या आजारातील  १७.९ टक्के रुग्णांनी कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर आपले प्राण गमावले आहेत. ज्यांना कोरोनाशिवाय इतर  कोणतेही आजार नव्हते अशा लोकांपैकी १.२ टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांवरून दिसून येत की भारतात दोन्ही प्रकारच्या आजारांनी मिळून एकूण १.५ टक्के लोकांचा मृत्यू झाला.

४५ ते ६० वर्ष वयोगटातील मृतांची संख्या १३.९ टक्के आहे या वयोगटातील अनेक लोक हे गंभीर आजारांनी पीडित होते. तर १.५ टक्के लोकांना कोणताही दुसरा आजार नव्हता. ६० वर्षावरील मृतांमध्ये  २४.६ टक्के लोक कोरोनासह गंभीर आजारांनी पीडित होते. तर ४.८ टक्के लोकांना कोणतेही आजार नव्हते. ४५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मृतांमध्ये ८.८ टक्के लोकांना कोरोनासह इतर आजार उद्भवले होते. तर  ०.२ टक्के लोकांना कोणतेही आजार उद्भवले नव्हते. हर्ड इम्यूनिटीबाबत WHO ने दिली धोक्याची सुचना, कोरोनाबाबत गैरसमज ठेवल्यास पडेल महागात
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येतं की, जास्त प्रमाणात तरूण कोरोना संक्रमित होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होत असलेले ५३ टक्के लोक ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांमध्ये ७० टक्के पुरूष असून ३० टक्के महिलांचा समावेश आहे. 

 देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा  पाऊण कोटीवर पोहोचला आहे. चोवीस तासांत कोरोनाचे हजारो नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर शेकडो जणांचा मृत्यू होतो आहे.  कोरोनामुळे देशभरात तब्बल १,१०,५८६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात आणखी वाढ होऊ शकते.  अशातच चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाची पुन्हा लागण होत असल्याची माहिती मिळत आहे. 
देशात कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग होण्याची माहिती मिळत आहे. तसेच देशात दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा कालावधी शंभर दिवस निश्चित करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला शंभर दिवसांनंतर पुन्हा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे अशी माहिती आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हाँगकाँगमध्ये याआधी अशा केसेस समोर आल्या होत्या. त्यानंतर आता भारतात आल्या आहेत. 

कोरोना लशीबाबत एक पॉझिटीव्ह बातमी आहे. आता लवकरच कोरोना लस येण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्डच्या कोव्हिशिल्ड लशीवरील चाचणी यशस्वी झालीय. लशीच्या ट्रायल्स अनेक ठिकाणी घेण्यात आल्या. त्यामध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीयेत. त्यामुळं कोरोनावर लस लवकरच येईल अशी आशा व्यक्त केली जातेय. प्रत्येक देश कोरोना लशीबाबत संशोधन करतायत. अजूनही यशस्वी लस आलेली नाही. पण, कोव्हिशिल्ड लशीच्या यशस्वी चाचणीमुळं दिलासा मिळालाय.

कोरोनाने अनेकांना देशोधडीला लावलं आहे. लस कधी येणार हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. पण, कोविशिल्ड लशीबाबत यशस्वी चाचणी झालेली आहे.  मागील महिन्यात २५ सप्टेंबरपासून लशीची चाचणी सुरू करण्यात आली. लस दिल्यानंतर ९७ स्वयंसेवकांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. २५ सप्टेंबरपासून आजपर्यंत ६५ जणांवर लशीची चाचणी केली. त्यापैकी ५३ जणांना लशीचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. आता फेज २ आणि ३ ची चाचणी करण्यासाठी ३०० स्वयंसेवक सहभाग घेणार आहेत. ऑक्सफर्डच्या कोव्हॅक्सिनची चाचणी यशस्वी झाल्यास लवकरच ही लस येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनाच दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे गेले सात महिने कित्येकांना घरी बसावं लागलंय. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्यायत. ही लस लवकर उपलब्ध झाली तर कोरोना महामारीतून बाहेर पडता येणं शक्य आहे.

मात्र एक धक्कादायक बातमी सुद्धा आहे. जगभरात कोरोनाच्या तब्बल दोनशे लसींवर संशोधन सुरू असल्याची माहिती आहे. मात्र सध्या चाचण्या सुरू असलेल्या कोणत्याही लसीची गॅरंटी आम्ही घेत नसल्याचं वक्तव्य WHO कडून आलं आहे. 

कोरोनावर मात करण्यासाठी भारतासह जगभरात लसींवर संशोधन सुरू आहे. रशियामध्ये लसी देण्याचं काम सूरू असून अनेक देशांच्या लसीही अंतिम टप्प्यात आहेत. मात्र असं असताना जागतिक आरोग्य संघटनेनं मात्र या लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जगभरातील कोणतीही लस कोरोनावर अचूक उपचार करू शकेल याची आम्ही गॅरंटी घेत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. 

कोरोनावर जगभरात सध्या २०० लसींवर संशोधन सुरू असलं तरी अनेक देशांमध्ये लसींची अंतिम चाचणी सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे, रशियामध्ये लसी देण्याचं काम सुरू असून लस शोधल्याचा अमेरिकेनंही दावा केला आहे. मात्र, यातली कोणतीही लस कोरोनावर उपचार करेल याची गॅरंटी नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. 

 चीनमधून संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने घेतलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना तसेच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी जीवघेण्या कोरोना व्हायरसवर लस विकसित केल्याचा दावा करण्यात आला होता.   
 कोरोना व्हायरस कोविड-19 च्या लसची घोषणा होण्याची शक्यता आहे.  इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीत काम करणारे इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चमध्ये कोरोना व्हायरसवर रिसर्च सुरु आहे. या रिसर्चमध्ये इस्रायलच्या शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसचे गुण आणि जैविक तंत्रज्ञान समजून घेण्यात मोठं यश मिळालं आहे.आता त्यावर वैज्ञानिक क्षमतेसह एंटीबॉडीज लस विकसित करण्यात आली आहे.
 विकसित करण्यात आलेल्या लसवर महत्त्वपूर्ण परीक्षण आणि प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच ही लस रुग्णांसाठी किती सुरक्षित आहे, याबाबत स्पष्ट होईल. दरम्यान, कोरोना व्हायरसचं संक्रमन अनेक देशांमध्ये झालं आहे. चीननंतर कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रुग्ण इटलीत आढळले आहेत. यानंतर इराण, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि भारतासह जवळपास शंभर देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.
जगभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. युरोपियन देशांमध्ये ३५ कंपन्यांनी औषधं बनवत आहे. यूके सरकारने कोरोनाव्हायरसच्या लसीसाठी निधीही दिला आहे. चीनहून  जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसवरील  उपचार जगभरातील शास्त्रज्ञ शोधत आहेत. लंडनच्या  शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसची लस तयार केल्याचा दावा केला आहे. या लसीची स्वत:वर चाचणी करून घेणाऱ्याला लाखो रुपये दिले जाणार आहेत.
 व्हाइटचॅपेलमधील क्विन मेरी बायोएंटरप्रायझेस इनोव्हेशन सेंटरने (Queen Mary BioEnterprises Innovation Centre) कोरोनाव्हायरसविरोधातील लसीच्या चाचणीसाठी २४ लोकांना बोलवलं होतं. जो कोणी या लसीची चाचणी स्वत:वर करून घेईल, त्याला ३,५०० पाऊंड म्हणजे तब्बल तीन लाख रुपये दिले जाणार होते. मात्र त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, यासाठी त्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसने संसर्ग करून घ्यावा लागेल.
ज्या व्यक्ती या चाचणीत सहभागी होतील त्यांच्या शरीरात कोरोनाव्हायरसचा कमजोर असा स्ट्रेन (strain) टाकला जाईल. ज्यामुळे त्या व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणाची शक्यता वाढते. जेव्हा कोरोनाव्हायरसचा प्रभाव या व्यक्तीवर दिसून येईल, तेव्हा त्याच्यावर एचव्हीव्हो (Hvivo) कंपनीने तयार केलेल्या लसीची चाचणी केली जाईल.
एचव्हीवो कंपनीने सांगितलं की, ‘२४ लोकांवर कोरोनाव्हायरस लसीची चाचणी केली जाईल, ज्यांना १४ दिवसांसाठी वेगळं ठेवलं जाईल. दोन आठवडे या कोरोना संक्रमित व्यक्तींवर काही परिणाम होतो का याचा अभ्यास केला जाईल’ जगभरात कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढतो आहे. युरोपियन देशांमध्ये ३५ कंपन्यांनी औषधं बनवत आहेत.  यूके सरकारने कोरोनाव्हायरसच्या लसीसाठी निधीही दिला आहे. पण आजपावेतो याबाबत कसलीही बातमी नाही.

 रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या ‘लस’ची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. जगातील पहिला देश म्हणून रशिया ठरला आहे. रशियाने या ‘लस’साठी मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या ‘लस’ला मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा ही लस देण्यात आली आहे, असे पुतिन यांनी सांगितले. 

चीनमधूल कोरोनाचा प्रवास  जगभर झाला. या कोविड-१९ ला रोखायचे कसा असा प्रश्न  जगाला पडला होता. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हजारोने लोकांचे बळी गेलेत. कोरोनाची बाधा होणारी संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यात यश आले तरी प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे कोरोनावर औषध तयार करण्यासाठी जगात स्पर्धा लागली. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, भारत आदी देशांत यावर संशोधन करण्यात येत आहे. मात्र, अमेरिका ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाने कोरोना व्हायरसवरील लसची निर्मिती केली. त्याची अधिकृत नोंदणीही केली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपासून या लसची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस  होता. रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकच गोष्ट म्हणाले होते की, कोरोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला कोरोनावर लसीची निर्मिती करायची आहे. 

रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसची मानवी चाचण्या झाली आहे. लस सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लस देण्याचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दिवसाला हजारो नवीन रुग्ण भारतात समोर येत आहेत. अशा वेळी सर्व जगाचं लक्ष कोरोनाच्या लशीकडे लागलं आहे. बाजारात कधी उपलब्ध होणार आणि प्रत्येक नागरिकापर्यंत ती कशी पोहोचणार यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाच्या बैठका होत आहेत.

भारतात सध्या बायोटेक कंपनीच्या लशीची चाचणी सुरू आहे. तर ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लशीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आहे. कोरोनावरची लस भारतात उपलब्ध व्हावी यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. ही लस प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार काय आणि कशी उपाययोजना करील हाही प्रश्न आता जिवंत असलेल्या हरेक भारतीयांना पडलेला आहे. 

 भारत सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखण्याचं काम सुरू आहे. याशिवाय वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, विविध संस्थांचे अधिकारी यांच्यासोबत बैठक सुरू आहे. ही लस कशी प्रत्येक भागात आणि घरात पोहोचवता येईल यासंदर्भात विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.  सरकारनं दोन कमिट्या स्थापन केल्या आहेत. पहिल्या कमिटीमध्ये पंतप्रधान आणि वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर के. विजयराघवन आहेत. हे कोरोनाच्या लशीच्या चाचणीवर लक्ष ठेवून आहेत. भारतात आणि जगभरात होणाऱ्या लशीच्या चाचण्यांवर त्यांचं लक्ष आहे.
लस तयार झाल्यानंतर लोकांना लस कशी उपलब्ध करून द्यावी याबाबत काम सुरू आहे. कोणत्या प्रकारचे कोल्ड स्टोरेज ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील मॉडर्ना लस उणे ७० अंश सेल्सिअस ठेवणे आवश्यक आहे, परंतु ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि भारत बायोटेकमध्ये असे नाही. या व्यतिरिक्त ही समिती प्रथम लसीचा डोस कोणाकडून दिला जाईल यावरही विचार करत आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर बरा झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का असा प्रश्न अनेकांना पडतो.  गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने थैमान  घातलं आहे. कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही महिन्यापासून कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. आता भारतात कोरोनाचं रिइंफेक्शन म्हणजेच पुन्हा संसर्ग होण्याचे  तीन संशयित रुग्ण समोर आले आहेत. त्यातही धक्कादायक म्हणजे पुन्हा होणारा कोरोनाचा संसर्ग गंभीर असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.

पुन्हा कोरोनाचं संक्रमण झालेली दोन  रुग्ण मुंबईत तर एक रुग्ण अहमदाबादमध्ये आढळून आला आहे. आयसीएमआरने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लॅसेंट या वैद्यकिय नियतकालीकात कोरोनाच्या संक्रमणाबाबत हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो आणि त्याची लक्षणं अधिक गंभीर होतात असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

युएसच्या नेवाडातील २५ वर्षीय तरूणाला कोणताही आजार नव्हता. एप्रिलमध्ये कोरोनाचं संक्रमण झालं होतं. क्वारंटाईनमध्ये या तरूणाची स्थिती चांगली झाली. त्या व्यक्तीच्या दोन आरटी-पीसीआर टेस्ट नेगेटिव्ह आल्या. मात्र ४८ दिवसांनंतर ती व्यक्ती पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचं दिसून आलं. दुसऱ्यांदा कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासल्याचे या रिपोर्टमध्ये दिसून आलं आहे. 

रिइन्फेक्शन किती दिवसांनी होतं, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं कोणतीही माहिती दिलेली नाही, असं आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी सांगितले. संशोधक अनंत भान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ” कोरोना संसर्गातून बाहेर आल्यानंतर पुन्हा संसर्ग होत असेल तर रोगप्रतिकारकशक्ती कालावधीसाठी राहते असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून हर्ड इम्युनिटीसाठी नैसर्गिक इम्युनिटीवर अवलंबून राहण्याऐवजी लसच सुरक्षित आहे.
कोरोनाच्या संकटात संपूर्ण जग अडकलंय. त्यामुळे, प्रत्येकजण लसींचीवाट पाहतोय. अनेक देशांच्या लसी दृष्टीक्षेपात असल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळतोय, मात्र कोणतीही लस कोरोनावर उपचार करू शकण्याबद्दल खुद्द जागतिक आरोग्य संघटनाचं सांशक असल्याने आपण काळजी घेणं इतकंच आपल्या हातात आहे. 


गंगाधर ढवळे,नांदेड 

संपादकीय

१६.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *