मुंबई ;
सनदी लेखापाल (सीए) होऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना आता दहावीनंतरच परीक्षेची नोंदणी करता येणार असून त्यामुळे एकूण अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिन्यांनी कमी होणार आहे. सध्या बारावीनंतर सीएच्या परीक्षा साखळीतील फाऊंडेशनच्या टप्प्यासाठी नोंदणी करता येते. मात्र, आता दहावीनंतरच ही नोंदणी करण्याची तरतूद ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया’ने कायद्यात केली आहे.
त्यामुळे अकरावी आणि बारावी ही दोन वर्षे फाऊंडेशन परीक्षेची तयारी करू शकतील. मात्र, परीक्षा बारावी झाल्यानंतरच देता येईल. दहावीनंतर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली तरी त्यांचे प्रवेश बारावीनंतर निश्चित होतील.