कुटूंबाची पल्वा न करता सेवा बजावणा-या कोरोना योद्धांचा समाजाने आदर्श घ्यावा – सौ.चित्ररेखा गोरे
कुंडलवाडी
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी,नागरीकांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेताना नगरपरिषदेचे अधिकारी व सफाई कर्मचारी,आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी,पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी व पत्रकार बांधव आपल्या परिवाराची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले अशा कोरोना योद्धांचे कार्य वाख्यांजोगे आहे.असे मत कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील योगधाम सभागृहात नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने दि.2 ऑगस्ट रविवारी रोजी शहरातील
कोविड योद्ध्यांचे गौरव,रक्षाबंधन वृक्षारोपण निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक तथा भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चैत्राताई पाटील गोरे यांनी प्रतीपादन केले.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड होते तर प्रमुख अतिथी आरळी जि.प.सदस्य.तथा रूग्ण कल्याण समिती अध्यक्ष लक्ष्मणराव ठक्करवाड,भिलवंडे,
भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे.आनंदराव बिरादार,दत्ताराम बोधने,उमाकांत गोपछडे,राजेंद्र रेड्डी तोटावार,
आदीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना गोरे म्हणाले कोरोना काळात देवारे बंद होते पण नगरपरिषद,
दवाखाने.पोलीस ठाणे,पत्रकारांचे नागरीकांना जनजागृती करणारे प्रसिद्धी माध्यमे चालू होते.अपुर्या व्यवस्थेतही विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तन मन-धनाने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.या सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी खासदार चिखलीकरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आहे असे ते म्हणाले.व लक्ष्मण ठक्करवाड याच्या सुरेख नियोजन बद्दल त्यांचे कौतूक व अभिनंदन केले.
यावेळी लक्ष्मण ठक्करवाड.डाॅ.सातमवाड यांनी आपापले विचार मांडले.
यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चैत्राताई पाटील गोरे व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.मान्यवराना महिलांनी राख्या बांधले.तसेच कोविड योद्धा म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड,डाॅ.विनोद माहूरे,
नगर परिषद मुख्याधिकारी जी.एस.पेन्टे,सपोनी.सुरेश मान्टे,पत्रकार मोहम्मद अफजल,नागोराव लोलापोड,संतोष मेहरकर,अमरनाथ कांबळे,सिद्धार्थ कांबळे,रूपेश साठे,मित्र फाऊंडेशनचे प्रशांत पांडे,मैत्री फाऊंडेशन चे साईनाथ येपुरवार,
न.प.अधिकारी रेंगडे,कर्मचारी धोंडीबा वाघमारे,छाया धात्रक,सावित्रा सम्मेटवार,संध्या माहेवार,प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी,जाधव सी.एन,मुढे ए.एच,कलूरे एस.एस,गायकवाड आर.बी,शेख.ए.ए,पवळ जे.के,सौ.गायकवाड एम.एन,माळोदे एस.के,गलांडे बी.जी,साठे एल.डी,करडे सी.के,ढगे जी.डी,आचेगावे जि.एम,वानोळे ए.डी,सावंत एस.डी,देवकांबळे व्हि.जी,पडलवार एन.एम,अमेटवार एस.जी,दत्ताहरी आनंदा,देशमुख संतोष आदी कोविड योद्ध्यांना गौरवपत्र देवून सम्मानीत करून गौरव करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन सौ.चौधरी मॅडम तर आभार सौ.गादगे मॅडम मानले.