कंधार तालुक्यातील दिग्रस बु.येथील शेतकऱ्यांच्या सुपुत्राची गगणभरारी….
माधव गिते यु.पी.एस.सी.परीक्षेत देशात 210 रँक; जिल्हाधिकारी पदी निवड.
कुरुळा ; श्रीराम फाजगे
येथुन जवळच असलेल्या मौजे दिग्रस बु ता.कंधार येथील निरक्षर व अपंग असलेल्या शेतकरी विठ्ठल गिते यांचा लहाना मुलगा माधव विठ्ठल गिते यांनी बुध्दीमत्ता, चिकाटि,मेहनत च्या पंखाच्या बळावर गगणभरारी घेत भारतातुन 210 व्या र्ँक मिळवत जिल्हाधिकारी पद मिळवून आपल्याकष्टकरी आई वडीलांचा पांग फेडले आहे.सदरील परीक्षेचा निकाल दि.४ अॉगस्ट रोजी जाहीर झाला आहे.
वडील विठ्ठल राव अल्प भूधारक व निरक्षर पणव्यवहारात हुशार ,घरात अठरा विश्व दारीद्रयशेती कोरडवाहू ,आई तुळसाबाई दोघेही शेतात राबत.त्यांना एकुण पाच अपत्य तीन मुली व दोन मुले.संसाराचा गाडा रेटता रेटेना नाकीनऊ येत अशी वेळआपल्या मुलाबाळांच्या नशिबी येवू नये त्यांनाशिक्षणाशिवाय पर्याय नाही हे अडाणी बापाला उमजले.सर्व लेकरं हुशार मोठा मुलगा भिवाजी विठ्ठल गिते दहावी शिकुन नंतर आय टी.आय करून कंपनी त नौकरी करून बापालाहातभार लावत नंतर तो सार्वजनिक बांधकाम विभागात ड्राफ्टमन म्हणून काम करतो. तिन्ही मुलीचा विवाह झाला.माधव लहानपणापासून चणास्क बुध्दी मतेचा चौथी पर्यंत गावातील जि.प.शाळेत शिकला नंतर शिवाजी मा. शाळा दिग्रस बु. बारावी विज्ञान जवळच असलेल्या जळकोट येथील गुरुदत्त उच्च. मि.विध्यालयात दहावी , बारावीला विशेष प्राविण्य सह उतीर्ण बारावी त असताना आईचे छेत्र हरवले. परंतु धिर न खचता नव्या उमेदिने अभ्यास केला. जिद्द, कष्ट, मेहनत हे वडिलांनी दिलेली संस्काराची शिदोरी, नंतर परभणी येथील शासकीय पाँँलटेनिकल काँलेजमधून डिप्लोमा विशेषगुणवतेसह उतीर्ण झाला. नंतर सिंहगड इंजिनिअरींग कँपज पुणे येथून साँफ्टवेअर बि.ई.उतीर्ण. कँपमधुन साफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कंपनीत निवड झाली.पगारचांगला मात्र माधवचे स्वप्न भारतीय प्रशासन सेवेतनौकरी करायचे त्याला थांबवत नव्हते. नौकरी चाराजीनामा देऊन दोन वर्षे केला यु. पी.एस.सी.अभ्यासकठीण मेहनतीच्या पाठबळावर दुसऱ्या च वर्षी गाठलेयशाचे शिखर 2018 च्या परीक्षेत IRS इंडियन आँडिट अँड अकाउंट सर्व्हिस मध्ये निवड झाली तर या वर्षी च्या यु.पी.एसी.परीक्षेत गरुडझेप घेत भारतातुन 210 रँकने जिल्हाधिकारी पदाचे स्वप्न साकार केले.
आई वडिलांचे पोरानी पांग फोडले….
अंगी अफाट ईच्छा शकती असल्यास उच्च पद्धीजाण्यासाठी गरीबी, खेडेगाव, शाळा, कुठल्याहीमर्यादा येत नाहीत. फक्त कठीण मेहनत जिद्दीनेकरावी अशि ग्रामीण भागातील मुलांना एकप्रकारचीप्रेरणादायी उदाहरण म्हणून माधव घेता येईल. हे त्यांनी दाखवून दिले.त्याच्या येशाचे कौतुक दिग्रस नगरीतच नाही तर जिल्हासह मराठवाड्यातुन शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.
प्रतिक्रिया –
वडील माधव गिते.
आज मला माझ्या जिनवातला सगळ्या त मोठा आनंद आहे. माझ्या लेकाने आटकेपार झेंडा लावत आमच्याकष्टाच सोनं केल.फक्त एका गोष्टीच दुःख आहे. माझीपत्नी घरासाठी अहोरात्र राबणारी तिच्या नशीबाला हेमुलाच कौतुक पाहाता आल नाही.