महान तपस्वी संत रामराव महाराज

संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे मुंबई येथे ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामरावबापू महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून अस्थिर होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे लिलावती रुग्णालयात उपचारही करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले होते. त्यात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, ३० आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्यासोबत महंत शेखर महाराज होते. डॉ. रामराव महाराज हे १९४८ मध्ये पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते.

बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री ११ वाजता जगाचा निरोप घेतला. रामराव महाराज यांच्याविषयाी बंजारा समाजात अपार श्रद्धा असून, त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या परिवाराकडून सांगण्यात आले.

गुरुपौर्णिमेला ७ जुलै १९३५ रोजी जन्मलेल्या रामराव महाराजांनी कोजागिरी पौर्णिमेला रात्री ११ वाजतादरम्यान मुंबई येथील लिलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. महाराजांचा ओढा बालपणापासूनच अध्यात्म, मानव कल्याणाकडे असल्यामुळे आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन डॉ. रामराव महाराज यांनी केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८ मध्ये तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील आदिशक्ती माता जगदंबा तथा क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांचे पुजारी व मठाधिपती म्हणून संपूर्ण भारत आणि विदेशातही रामराव महाराजांना मान्यता होती. मागील एका वर्षापासून प्रकृती अस्थिर असतानाही बंजारा समाजाचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी आजारी अवस्थेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट यावर्षी मार्च महिन्यात घेतली होती. दरम्यान, संत रामराव महाराज यांचे पार्थिव शनिवारी रात्री पोहरादेवी येथे येत असून, रविवारी पोहरादेवी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी कुटुंबाकडून तसेच भाविकांकडून पूजाआरती होणार आहे. दरम्यान पोहरादेवीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासन तेथे तळ ठोकून आहे. गर्दी टाळण्यासाठी पाेलीसांच्यावतिने पाेहरादेवीमध्ये नाकाबंदी सुध्दा करण्यात आली आहे.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या शोक संवेदना
धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. संत रामराव महाराज हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थानचे प्रमुख होते.

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना ऑक्टोबरला उपचारासाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र
देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे ३९ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. त्यामुळे देशभरातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे. रामराव महाराजांनी १९४८ मध्ये पोहरादेवी येथील गादीवर बसल्यानंतर अन्नत्याग केला. त्यानंतर ते फक्त कडूनिंब, दूध आणि फळांचे सेवन करत होते. गेल्या काही महिन्यांपासून दूध घेतानाही त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे ते फक्त कडूनिंब आणि ज्यूस घेत होते. मात्र त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाणी बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात. तसेच देशातील अनेक राजकीय नेत्यांचीही या ठिकाणी उपस्थित राहतात. संत रामराव महाराज संत सेवालाल महाराजांचे वंशज असल्यामुळे त्यांच्याविषयी बंजारा समाजाची अपार श्रद्धा असल्याचे दिसून येते.

बंजारा समाजाचे रामराव बापू महाराज यांचा जन्म ७ जुलै १९३५ ला पोहरादेवी येथे झाला होता. रामराव बापू महाराज यांना पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गादीवर परिसरातील ५२ गावाच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर वयाच्या १४ व्या वर्षी १९४८ मध्ये बसविले. १२ वर्ष अनुष्ठान आणि १२ वर्ष मौन धारण केल्यावर रामराव महाराज यांनी देश भ्रमण सुरू केले.

गोर बंजारा धर्मपिठाचे पहिले धर्मगुरू, पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे मठाधिपती परमपूज्य संत परमपूज्य रामराव बापू हे गोर बंजारा समाजाचे एकमेव धर्मगुरू होते. रामराव बापू हे बाल ब्रह्मचारी होते. त्यांनी आजवर कुठल्याही प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं नव्हतं. फक्त दूध आणि फळांचे सेवन ते करायचे.
गोर बंजारा समाज, सेवालाल महाराजांचे विचार-कार्य याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम त्यांनी आजन्म केलं. बंजारा समाजाला नवी दिशा आणि बळ देण्याचं काम रामराव बापू यांनी केलं. बंजारा समाजामध्ये रामराव बापू यांचा शब्द अंतिम मानला जायचा. बंजारा समाजाचा बरोबरच इतर धर्मीयांमध्येही परमपूज्य रामराव बापू यांचं एक आदराचे स्थान आहे. संत रामराव बापू महाराज यांच्या कार्याची दखल घेत कर्नाटकमधील गुलबर्गा विद्यापिठाने त्यांना डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले होते. केंद्र सरकारने रामराव बापू यांचा पद्मभूषण पुरस्कारांने गौरव केला होता.

रामराव महाराज या थोर संताच्या जाण्याने बंजारा समाजाची मोठी हानी झाली आहे. परमपूज्य रामराव बापू यांची पोहरादेवी येथे भव्य समाधी उभारली जाणार असून ती गोर बंजारा समाजासाठी श्रद्धास्थान आणि प्रेरणास्त्रोत असेल’ असं किसनराव राठोड यांनी यावेळी सांगितलं.

भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉ.रामराव महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ‘बंजारा समाजाचे आद्य धर्मगुरू संत रामराव महाराज पोहरादेवीकर, यांच्या दुःखद निधनाने एका महान तपस्वीला आम्ही समस्त भक्तगण मुकलो आहोत. त्यांचे विचार, तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव प्रेरणा देत राहतील’ अशी भावना व्यक्त करत पंकजा मुंडे यांनी रामराव महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

केवळ बंजारा समाजाची नाही, तर माझी सुद्धा वैयक्तिक हानी!
माझ्यावर वडिलांप्रमाणे प्रेम करणारे संत रामराव बापू महाराज यांना विनम्र श्रद्धांजली! – देवेंद्र फडणवीस

श्री क्षेत्र पोहरादेवी (जि. वाशिम) संस्थानचे प्रमुख आणि देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या संत रामराव महाराज याची निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. अध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचं कार्य कायम स्मरणात राहील. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो. ॐ शांती. – चंद्रकांत बावनकुळे

बंजारा समाजाचे धर्मगुरू, संत, तपस्वी डॉ.रामरावजी महाराज यांच्या निधनामुळे थोर समाज सुधारक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक हरपले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लाखो अनुयायी असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे – अशोक चव्हाण

संत सेवालाल महाराजांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव बापू महाराज यांचे निधन दुःखद आहे. लोकशिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे महत्कार्य त्यांनी घडविले.
तपस्वी रामराव बापू महाराजांवर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या अनुयायांच्या दुःखात सहवेदना! भावपूर्ण श्रद्धांजली! – शरद पवार

बंजारा समाजाचे धर्मगुरू तसेच पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे मठाधिपती डॉ. रामराव महाराज यांच्या निधनामुळे बंजारा समाजाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असणारे, समाजाला नवी दिशा देणारे महान तपस्वी काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली – बाळासाहेब थोरात

देशभरातील बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान, वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी संस्थानचे प्रमुख आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू संत रामराव महाराज यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या अनुयायांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. – अनिल देशमुख

पोहरादेवी संस्थानचे मठाधिपती, बंजारा समाजाचे ऊर्जास्त्रोत धर्मगुरु डॉ.रामराव बापु महाराज यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. मला त्यांचे सान्निध्य, आशीर्वाद लाभले हे माझं भाग्यच! डॉ.रामराव बापू महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. – धनंजय मुंडे

Shri Ramrao Bapu Maharaj Ji will be remembered for his service to society and rich spiritual knowledge. He worked tirelessly to alleviate poverty and human suffering. I had the honour of meeting him a few months ago. In this sad hour, my thoughts are with his devotees. Om Shanti. – Narendra Modi

संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा बंजारा समाजाचे धर्मगुरु, आदरणीय रामरावबापू महाराज यांचं निधन ही देशाच्या सामाजिक,अध्यात्मिक,सांस्कृतिक,मानवतावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांनी केवळ बंजारा समाजाच्याच नव्हे तर, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केलं.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! – अजित पवार

संत डॉ.रामरावजी महाराज यांचे लाखो अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यात असून, ते बंजारा समाजाचे शक्तिस्थान होते. त्यांच्या निधनामुळे आज प्रत्येक वाडी-तांड्यावर शोककळा पसरली आहे. संत सेवालाल महाराज यांचा वारसा त्यांनी समर्थपणे चालवला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, महिला अत्याचार, हुंडाबळी, अनिष्ट प्रथा व रूढींचे उच्चाटन आदींबाबत त्यांनी जनजागरणाचे मोठे कार्य केले. वाडी-तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाची प्रगती करायची असेल तर समाज शिक्षित झाला पाहिजे, त्यांच्यावर नव्या विचारांचे संस्कार झाले पाहिजे, ही भूमिका मांडून त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार केला व बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांचे कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नव्हते; तर इतर समाजांसाठीही ते प्रेरणास्थान होते.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
१.११.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *