महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध ;अध्यक्ष जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर यांची पुनश्च निवड

  • लोहा शहरामध्ये केमिस्ट बांधवांच्या वतीने फटाके वाजवून जल्लोष साजरा केला

लोहा: प्रतीनिधी-

द महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची कार्यकारिणी आणि सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यात 2020 ते 2023 या कालावधी साठी निवडणूक अधिकारी दिलीप कदम यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आप्पासाहेब तर सचिव पदी अनिल भाऊ नावंदर यासह सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. लोहा तालुका केमिस्ट संघटनेच्यावतीने फटाके वाजवून जल्लोष साजरा केला,

राज्य केमिस्ट संघटनेची कोविड १९ च्या पाश्वभूमीवर प्रशासनाच्या निर्देशा प्रमाणे ऑनलाइन मिटिंग घेण्यात आली. संघटनेचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून दिलीप कदम, सुनिल भाई छाजेड यांनी कामकाज पाहिले. प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज आल्याने आजच्या आयोजित सर्वसाधारण सभेत नावे जाहीर करण्यात आली. अध्यक्ष जगन्नाथ शिंदे कल्याण, उपाध्यक्ष मुकूंद दुबे चंद्रपूर, अरुण बरकसे बीड, सचिव अनिल नावदंर खामगाव, सह सचिव प्रसाद दानवे मुंबई, खजिनदार वैजनाथ जागुष्टे रत्नागिरी, संघटन सचिव मदन पाटील कोल्हापूर तर पीआरओ पदी अजित पारख याचे नाव जाहीर करण्यात आले.


तत्पूर्वी आजच्या कार्यकारणी सभेत ऑनलाइन फार्मसी विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. कोविड 19 अंतर्गत केमिस्ट ने केलेल्या कार्याची दखल शासनाने घेतली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. करोना ची लस सर्व केमिस्ट च्या माध्यमातून वितरित करण्याबाबत देखील विचार मांडण्यात आले. ऑनलाइन फार्मसी वर तात्काळ प्रतिबंध न आणल्यास भविष्यात वेगळी नीती अवलंबण्यात येईल असे जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले. सचिवांचा अहवाल गत तीन वर्षांचा लेखाजोखा अनिल नावदंर यांनी मांडला. आभार अरुण बरकसे यांनी मांडले.

लोहा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने लोहा तालुका संघटनेचे अध्यक्ष संजय मोटे पाटील व तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी फार्मसी कैन्सील चे कार्यकारी सदस्य रामदेव दाड दिपक पावडे मराठवाडा उपाध्यक्ष अनील तोष्नीवाल सहसचिव सुधाकर काळे व संजय बुलबुले. जाधव यांनी आपाच्या पुनच्छे निवडीबद्दल आनंद व्यक्त करुन सत्कार करण्यात आला व जगनाथ आप्पा शिंदे यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *