ठाणे;
दिनांक 30/10/2020 रोजी ठाणे ग्रंथालय विभाग आढावा बैठक माननीय प्रदेश अध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्हा प्रभारी श्री संतोष दगडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय डोंबिवली पश्चिम येथे पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली.
रमेश दिनकर यांनी प्रस्तावना केली. प्रभाग तेथे ग्रंथालय अशी संकल्पना मांडली प्रत्येक पदाधिकारी यांचे ग्रंथालय असावे असे प्राधान्याने मांडले,यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती सारिका गायकवाड माजी जिल्हाध्यक्ष कुसुम गेडाम यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रभारी संतोष दगडगावकर यांनी विविध ग्रंथालयीन प्रश्नावर विचार मांडले प्रामुख्याने अनुदान वाढ,अनुदान दुप्पट,दर्जावाढ,नवीन ग्रंथालयाचे प्रस्ताव मागविणे,गाव तेथे ग्रंथालय व शहरात प्रभाग तेथे ग्रंथालय संकल्पना राबविणे यावर भर दिला.
यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष प्रभु नारायण उरडवड ,जिल्हा अध्यक्ष ग्रंथालय एडवोकेट प्रकाश गावडे, रोहिणी सामंत ,अल्पेश पटेल ,इरफान सेठ ,सुरेश भोसले ,ललित साळुंखे, संगीता मोरे ,ज्योती गायकवाड, गीता चापके ,मयुरी मोरे, वैष्णवी गावकर, मालती भिशे, सुनिता देशमुख ,ज्ञानेश्वर पाटील, सुशील सामंत ,तुषार मानकामे मोगल इत्यादी उपस्थित होते.