अहमदपूरात साकारतोय ” फकिरा ” चित्रपट.


अहमदपूर ; प्रा.भगवान आमलापुरे

सिद्धहस्त वास्तववादी लेखक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या ओजस्वी वाणीतून आणि तेजस्वी लेखणीतून प्रकाशित, महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांङमय पुरस्कार प्राप्त कादंबरी ” फकिरा ” या कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट ” फकिरा ” अहमदपूरात साकारतो आहे.


फकिरा या मराठी चित्रपटाची पटकथा आणि गीतलेखन प्रतिथयश ग्रामीण कवी आणि गीतकार प्रा रामदास केदार सर उदगीर,लिहीत आहेत. तर संगीत दिग्दर्शन प्रा माधव जाधव सर, कंधार ,हे पाहणार आहेत. संयोजक म्हणून माजी प्राचार्य तुकाराम हारगीले सर, अहमदपूर, युद्ध पातळीवर काम आणि जुळवाजुळव करीत आहेत.
आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, ही भावना मनात तर होतीच.

शिवाय समाजाची सुप्त इच्छा होती की साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा ‘ फकिरा ‘ हा नायक चित्रपट रुपाने पडद्यावर पहायचा. समाजाची ही इच्छा आम्ही साकार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. गतवर्षी जन्म शताब्दी वर्ष होते. त्यामुळे ही इच्छा प्रबळ झाली. पण कोरोना या जागतिक महामारीमुळं प्रत्यक्ष कृती लांबणीवर पडली आहे.


शशी कपूर साहेबांचा ‘ फकिरा ‘या नावाचा हिंदी चित्रपट येउन गेला. तो मी आवार्जुन खुपदा पाहिला. मात्र त्या फकिराचा या फकिराशी तीळमात्र संबंध नाही आहे. कारण तो महालातील चित्रपट आहे तर हा चित्रपट झोपडीतील आहे. अशी भावना माजी प्राचार्य तुकाराम हारगीले सरनी प्रा भगवान आमलापूरे यांच्या जवळ जागतिक मराठी रंगभूमी दिनाच्या पुर्व संध्येस व्यक्त केली.


अँड आर एस वाघमारे, दक्षता अधिकारी डी जी वरवटे, माननीय भारत घेरे, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ राजकुमार मस्के, डॉ माधवराव गादेकर, लातूर आणि प्रा दयानंद कांबळे, यांचे ” फकिरा ” या चित्रपटास मार्गदर्शन लाभणार आहे.
आदित्य चित्रनगरी कोल्हापूर प्रस्तुत ( बँनरखाली ) तयार होणाऱ्या फकिरा या चित्रपटाचे निर्माते आकाराम पाटील , सहनिर्माते माजी प्राचार्य तुकाराम हारगीले सर तर दिग्दर्शन उपप्राचार्य डॉ राजकुमार मस्के सर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *